अरविंद केजरीवाल यांनी ED विरोधात सुप्रीम कोर्टात दाखल केलेली याचिका घेतली मागे

अरविंद केजरीवाल यांनी ईडी विरोधात सुप्रीम कोर्टाच दाखल केलेली याचिका मागे घेतल्याचे वृत्त आहे.

Delhi CM Arvind Kejriwal Arrested : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना गुरुवारी (21 मार्च) ईडीने मद्य घोटाळ्यासंबंधित अटक केली. शुक्रवारी (22 मार्च) अरविंद केजरीवाल यांना पीएमएलए कोर्टासमोर हजर करण्यात आले. दुसऱ्या बाजूला आम आदमी पक्षाचे प्रमुख आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटक केल्याने त्यांच्या समर्थकांनी मोठ्या संख्येने एकत्रित येत रस्त्यावर आंदोलन केले. याशिवाय भाजपच्या विरोधात घोषणाबाजी देखील केली. अशातच असे वृत्त समोर येतेय की, अरविंद केजरीवाल यांनी ईडी विरोधात दाखल केलेली याचिका मागे घेतली आहे.

ईडीकडून सुप्रीम कोर्टात कॅव्हिएट दाखल
आम आदमी पक्षाने (Aam Aadmi Party) सुप्रीम कोर्टात धाव घेतल्यानंतर ईडीनेही कोर्टाची पायरी गाठली आहे. ईडीने सुप्रीम कोर्टात एक कॅव्हिएट दाखल केले आहे. यावेळी ईडीने सुप्रीम कोर्टाला म्हटले की, कोणताही निर्णय सुनावण्याआधी आमचे ऐकून घ्यावे. दरम्यान, आज केजरीवाल यांच्या अटकेविरोधात सुप्रीम कोर्टातील तीन न्यायाधीशांच्या खंडपीठासमोर सुनावणी होणार होती.

अरविंद केजरीवाल यांनी मागे घेतली याचिका
अरविंद केजरीवाल यांनी ईडी विरोधात सुप्रीम कोर्टात दाखल केलेली याचिका मागे घेतली आहे. खरंतर, कनिष्ठ न्यायालयात अरविंद केजरीवाल यांच्या कथित मद्य घोटाळ्यासंबंधितच्या प्रकरणावर सुनावणी सुरू असल्याने याचिका मागे घेतल्याचे सांगितले जात आहे. अरविंद केजरीवाल यांचे वकील अभिषेक मनु सिंघवी यांना राउज एवेन्यू कोर्टात उपस्थिती रहावे लागणार आहे. अशातच अभिषेक मनु सिंघवी सुप्रीम कोर्टात सुनावेळी उपस्थितीत राहता येणार नाही. याच कारणास्तव अरविंद केजरीवाल यांनी ईडी विरोधात दाखल केलेली याचिका मागे घेतली आहे. राउज एवेन्यू कोर्टात सुनावणी पार पडल्यानंतर पुन्हा अभिषेक मनू सिंघवी सुप्रीम कोर्टात धाव घेऊ शकतात.

आम आदमी पक्षाने दिली प्रतिक्रिया
अरविंद केजरीवाल यांच्या अटकेवर टीका मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अटकेला आम आदमी पक्षाने राजकीय कट असल्याचे म्हटले आहे. याशिवाय देशातील काही विरोधी पक्षांनीही अरविंद केजरीवाल यांच्या अटकेविरोधात टीका केली आहे. यादरम्यान दिल्ली सरकारमधील मंत्री आतिशी यांनी म्हटले की, "अरविंद केजरीवाल दिल्लीचे मुख्यमंत्री होते, आहेत आणि राहतील."

आणखी वाचा : 

मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना राजीनामा द्यावा लागणार की तुरुंगातून चालवणार सरकार?

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची जागा कोण घेणार? या दिग्गज नेत्यावर जबाबदारी येण्याची शक्यता

मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना राजीनामा द्यावा लागणार की तुरुंगातून चालवणार सरकार?

Share this article