इशा फाउंडेशनचे संस्थापक आणि मोटिव्हीशनल स्पीकर सद्गुरू जग्गी वासुदेव यांच्या मेंदूवर ऑपरेशन करण्यात आले आहे. त्यांच्या मेंदूत मोठ्या प्रमाणावर रक्ताची ब्लीडींग होत असल्यामुळे त्यांच्यावर ऑपरेशन करण्याचा डॉक्टरांनी निर्णय घेतला आहे.
इशा फाउंडेशनचे संस्थापक आणि मोटिव्हीशनल स्पीकर सद्गुरू जग्गी वासुदेव यांच्या मेंदूवर ऑपरेशन करण्यात आले आहे. त्यांच्या मेंदूत मोठ्या प्रमाणावर रक्ताची ब्लीडींग होत असल्यामुळे त्यांच्यावर ऑपरेशन करण्याचा डॉक्टरांनी निर्णय घेतला आहे. अशावेळी अचानक त्यांना अपोलो हॉस्पिटल मुंबई येथे ऍडमिट करण्यात आले होते. त्यानंतर जग्गी वासुदेव यांनी पोस्ट केली असून यामध्ये त्यांची तब्येत पटकन बरी होत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
ईशा फाउंडेशनने शेअर केले जग्गी वासुदेव यांच्या हेल्थबद्दलचे अपडेट -
ईशा फाउंडेशनने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर याबाबतची माहिती पोस्ट केली आहे. त्यांनी सद्गुरू यांची तब्येत कशी आहे, याबाबतची माहिती सोशल मीडियावर पोस्ट केली आहे. हे ट्विट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत असून सद्गुरू यांची तब्येत लवकर बरी होईल अशी भक्तांकडून आशा व्यक्त केली जात आहे
सद्गुरुंच्या वैयक्तिक अकाऊंटवरून तब्येतीबाबत देण्यात आली माहिती
सद्गुरूनी सोशल मीडियावरून व्हिडीओ टाकून आपल्या तब्येतीची माहिती दिली होती. त्यांनी पोस्टच्या कॅप्शनमध्ये सद्गुरुंच्या डोक्यात डॉक्टरांना काहीच न मिळाल्यामुळे त्यांनी ते शिवून टाकले असे मजेशीर वाक्य टाकले होते. त्यावरून फॅन्सने हसून प्रत्युत्तर दिल होते.