
अनंत अंबानी यांचा एक जुना व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. गुजरातमधील पदयात्रेदरम्यान त्यांनी कत्तलीसाठी नेल्या जाणाऱ्या कोंबड्यांना वाचवलं होतं. त्यांच्या या भूतदयेचं सर्वत्र कौतुक होत आहे. १ एप्रिल २०२५ रोजी गुजरातच्या देवभूमी द्वारका जिल्ह्यातील खंभालिया शहराजवळ ही घटना घडली होती. रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी हे जामनगर ते द्वारका अशी पदयात्रा करत होते. त्यावेळी त्यांना पिंजऱ्यात कोंबड्या घेऊन जाणारी एक गाडी दिसली.
या कोंबड्यांना कत्तलीसाठी नेलं जात असल्याचं समजताच, अनंत यांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांना ती गाडी थांबवायला सांगितली. व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये ते स्वतः एका कोंबडीला हातात धरून उभे असल्याचं दिसतंय. तसेच, इतर कोंबड्यांना वाचवण्यासाठी ते आपल्या टीमला सूचना देत आहेत. या कोंबड्यांना सोडवण्यासाठी त्यांनी गाडी मालकाला योग्य ती रक्कम देण्यासही कर्मचाऱ्यांना सांगितलं.
या व्हिडिओमध्ये अनंत अंबानी त्या कोंबड्यांशी बोलताना आणि त्यांना सुरक्षित स्थळी हलवण्यासाठी आपल्या टीमला मार्गदर्शन करताना दिसत आहेत. या घटनेत सुमारे २५० कोंबड्या आणि इतर पक्ष्यांचे प्राण वाचवण्यात आले.
अनंत अंबानी ने मुर्गियों से भरा एक ट्रक देखा, जिसे बूचड़खाने ले जाया जा रहा था। उन्होंने तुरंत अपने स्टाफ को ट्रक रुकवाने का निर्देश दिया।
इसके बाद ट्रक में मौजूद सभी मुर्गियों की पूरी कीमत चुकाकर उन्हें खरीद लिया और उनकी जान बचा ली।
अनंत अंबानी बेहद नेकदिल इंसान होने के साथ साथ इतने भोले हैं।! ❤️
@grok अंबानी परिवार क्या चिकन आदि मांसाहार का सेवन नहीं करता है?
— Hemendra Tripathi 🇮🇳 (@hemendra_tri) November 3, 2026
वाचवण्यात आलेल्या या सर्व पक्ष्यांना जामनगरमधील अनंत अंबानी यांच्या 'वनतारा' या अॅनिमल रेस्क्यू आणि रिहॅबिलिटेशन सेंटरमध्ये नेण्यात आलं.
हा व्हिडिओ व्हायरल होताच सोशल मीडिया युजर्सनी त्यांच्या या कृतीचं भरभरून कौतुक केलं. प्राण्यांबद्दलच्या त्यांच्या प्रेमाविषयी लोकांनी कृतज्ञता व्यक्त केली. या निमित्ताने प्राणी कल्याण आणि छोट्या पिंजऱ्यांमधून प्राण्यांची होणारी वाहतूक यावरही अनेकांनी चर्चा सुरू केली.
गुजरातच्या जामनगरमध्ये 'वनतारा' हा एक मोठा अॅनिमल रेस्क्यू आणि केअर प्रोजेक्ट आहे, ज्याची जबाबदारी अनंत अंबानी पाहतात. हे सेंटर प्राण्यांना वाचवणे, त्यांच्यावर उपचार करणे आणि त्यांचं पुनर्वसन करण्यासाठी समर्पित आहे.
कोंबड्यांना वाचवल्याचा हा व्हिडिओ समोर आल्याने त्यांच्या प्राणीप्रेमाची पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर शेअर झाला असून, प्राण्यांवरील अत्याचार आणि त्यांच्या संरक्षणाची जबाबदारी यावरही मोठी चर्चा घडवून आणत आहे. हा व्हिडिओ अजूनही इंटरनेटवर फिरत असून, अनंत अंबानींच्या गुजरात पदयात्रेतील हा सर्वात चर्चेत असलेला प्रसंग ठरला आहे.