अमूल डेअरीनंतर आता दुसऱ्या एका दुधाच्या ब्रॅण्डने त्यांच्या भावात वाढ केली आहे. मदर डेअरीने त्यांच्या दुधाच्या दारात दोन रुपयांनी वाढ केल्याची माहिती दिली आहे. त्यामुळे ग्राहकांना दूध घेणे आता महागणार आहे.
देशात उद्या मंगळवारी (४ जून) लोकसभा निवडणुकीचे निकाल २०२४ चे निकाल जाहीर होणार आहेत. मात्र, निकालापूर्वीच देशातील जनतेचा पराभव झाला आहे. जनतेला महागाईचा फटका बसणार आहे. एकीकडे काल अमूलने आपल्या दुधाच्या दरात २ रुपयांनी वाढ केली होती, ती आजपासून लागू झाली आहे. दुसरीकडे, देशातील सर्वात मोठी दूध कंपनी मदर डेअरीने दुधाच्या दरात दोन रुपयांनी वाढ केली आहे. अशातच निवडणूक निकालानंतर वाटल्या जाणाऱ्या मिठाईचे भाव भडकणार आहेत. याशिवाय सर्वसामान्यांना मिळणाऱ्या चहाचा रंगही फिका पडणार आहे.
या दोन दिवसांत सातत्याने होत असलेल्या दुधाच्या दरात होणाऱ्या वाढीमुळे सर्वसामान्यांची तारांबळ उडाली आहे. मदर डेअरीने दिल्ली-एनसीआरसाठी दुधाचे दर वाढवले आहेत. नवीन दरांनुसार सर्व पॅकेज्ड दुधाच्या दरात लिटरमागे दोन रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. ही दरवाढ आज, सोमवारपासून (3 जून) लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ताज नंतर दुधाचे भाव खालीलप्रमाणे बदलले आहेत.
आणखी वाचा -
पाय दाबून घेणाऱ्या पोलिसाला करा निलंबित, आमदार रवींद्र धंगेकर यांनी पोलीस आयुक्तांकडे केली मागणी
अंबानी परिवाराच्या क्रुझ-पार्टीची धूम, भारतातही Cruise वर होणाऱ्या सोहळ्यांमध्ये वाढ होण्याची शक्यता