पाय दाबून घेणाऱ्या पोलिसाला करा निलंबित, आमदार रवींद्र धंगेकर यांनी पोलीस आयुक्तांकडे केली मागणी

पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांना आमदार रवींद्र धंगेकर यांनी एक ट्विट करून आवाहन केले आहे. संबंधित ट्विटमध्ये एका पोलीस अधिकाऱ्याचे सामान्य पुणेकर पाय दाबून देत असल्याचे दिसून आले आहे. 

पुणे शहरातील पोर्शे अपघातानंतर पुण्यामधील एकामागून एक घटना उघडकीस येताना दिसून येत आहे. कसबा येथील काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी पोर्शे अपघाताचे प्रकरण चांगलेच लावून धरले होते. त्यांनी येरवडा पोलीस स्टेशनच्या दारात धरणे आंदोलन केले आणि त्यानंतर दोन पोलिसांना निलंबित करण्यात आले होते. आता परत एकदा धंगेकर यांनी केलेलं ट्विट चर्चेत आलं आहे. 

काय आहे ट्विट? - 
अमितेष कुमार साहेब आपल्या कर्तबगार पुणे पोलिस दलातील हा कोण पोलीस अधिकारी आहे,जो आम्हा पुणेकरांकडून पाय दाबून घेत आहे..? आपण योग्य दखल घेऊन याची चौकशी कराल, त्यास निलंबित कराल एवढी पुणेकरांच्या वतीने माफक अपेक्षा… नाहीतर आम्ही समस्त पुणेकर या अधिकाऱ्याचा भव्य नागरी सत्कार घेऊ. जय हिंद...जय पुणेकर ...!

रवींद्र धंगेकर यांनी एक व्हिडीओ शेअर केला असून त्या व्हिडिओत एक व्यक्ती पोलिसाचे पाय दाबून देत आहे. तो अधिकारी खुर्चीवर बसला असून सामान्य व्यक्ती त्याचे पाय दाबून देत आहे. हा व्हिडीओ कोणीतरी गाडीमधून काढल्याचे दिसत आहे. या हिडिओमधील सत्यता तपासून घेऊन त्या अधिकाऱ्याला निलंबित करण्यात यावे अशी मागणी धंगेकर यांनी केली आहे. 

या पोस्टवर सामान्य नागरिकांनी कमेंट केल्या असून संबंधित अधिकाऱ्याला निलंबित करण्यात यावे आणि त्याच्यावर कठोरातील कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी रवींद्र धंगेकर यांनी केली. त्यांच्या या व्हिडिओला सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर लाईक्स आणि रिपोस्ट मिळत असल्याचे दिसून आले आहे. 
आणखी वाचा - 
लोकसभा निवडणूक संपताच टोल टॅक्स वाढवण्याची घोषणा : 3 जूनपासून टोलच्या किंमती होणार महाग
अंबानी परिवाराच्या क्रुझ-पार्टीची धूम, भारतातही Cruise वर होणाऱ्या सोहळ्यांमध्ये वाढ होण्याची शक्यता

Share this article