अदाणी समुहाने लाचखोरीच्या आरोपांचे केले खंडण, आरोप चुकीचे असल्याचे केले स्पष्ट

अदाणी ग्रीन एनर्जीने अमेरिकी न्याय विभागाने गौतम अदाणी, सागर अदाणी आणि विनीत जैन यांच्यावर लावलेल्या लाचखोरीच्या आरोपांचे खंडण केले आहे. कंपनीने स्पष्ट केले की, यूएस डिपार्टमेंट ऑफ जस्टिसच्या कोणत्याही आरोपात या तिघांचा समावेश नाही.

नवी दिल्ली: अदाणी ग्रीन एनर्जीने बुधवारी एक स्टटमेंट जाहीर केले आहे. ज्यात गौतम अदाणी, सागर अदाणी आणि वरिष्ठ डारेक्टर विनीत जैन यांच्यावर अमेरीकी न्याय विभागाने केलेल्या (US Department of Justice) लाचखोरीच्या आरोपाचे खंडण केले गेले आहे.

अदाणी ग्रीन एनर्जी लिमिटेडने एक्सचेंज फायिलिंगमध्ये म्हटले आहे की विविध मिडिया रिपोर्टनुसार अदाणी ग्रुपचे अधिकारी गौतमी अदाणी, त्यांचा भाचा सागर अदाणी आणि वरीष्ठ डारेक्टर विनीत जैन यांच्यावर परदेशी भ्रष्टाचार कायद्यान्वये(Foreign Corrupt Practices Act) लाचखोरी आणि भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. ते पुर्णपणे चुकीचे आहेत.

अदाणी ग्रीन एनर्जीने स्पष्ट केले आहे की गौतम अदाणी, सागर अदाणी आणि विनीत जैन यांच्यावर अमेरिकी परदेशी भ्रष्टाचार कायद्यान्वये लाचखोरीचा आरोप लावलेला नाही. कंपनीने म्हटले आहे की केवळ Azure Power च्या अधिकाऱ्यांवर आणि एक कॅनडाच्या गुंतवणुकदारावर लाचखोरीचे आरोप लावले आहेत.

कंपनीने म्हटले आहे की US Department of Justice च्या कोणत्याही आरोपांमध्ये गौतम अदाणी, सागर अदाणी आणि विनीत जैन यांचे नाव नाही "एफसीपीए चे उल्लंघन केल्याचा कट" आणि "न्यायात अडथळा आणण्याचा कट" च्या आरोपांत या तिघांचे नाव नाही.

भ्रष्टाचार आणि लाचखोरीत अदाणी समुहाच्या कोणत्याही अधिकाऱ्याचे नाव नाही

अदाणी ग्रीन एनर्जीने आपल्या विधानात म्हटले आहे की, भ्रष्टाचार आणि लाचखोरीच्या संबंधित आरोपांमध्ये केवळ अजुर पॉवरचे रंजीत गुप्ता, सिरिल कैबेंस, सौरभ अग्रवाल, दीपक मल्होत्रा आणि रुपेश अग्रवाल आणि सीडीपीक्यू( कैस डे डेपाट एट प्लेसमेंट डू क्यूबेक -कॅनेडियन संस्थात्मक गुंतवणूकदार आणि अजुर चे सर्वात मोठे भागधारक) च्या नावाचा समावेश आहे. तसेच अदाणी समुहाच्या कोणत्याही अधिकाऱ्याचे नाव यात नाही असे देखील म्हटले आहे.

हेही वाचा-

इव्हीएम विरोधात भारत जोडो सारखी रॅली: मल्लिकार्जुन खर्गे

राहुल गांधी यांच्या नागरिकत्वाबाबत इलाहाबाद उच्च न्यायालयाचा केंद्राला प्रश्न

Share this article