23rd May 2025 Live Updates : नेपाळमध्ये मध्यरात्री दीड वाजल्याच्या आसपास 4.3 रिश्टर स्केलच्या भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. अशाच काही ताज्या आणि ठळक घडामोडींसाठी एशियानेट न्यूज मराठीचे आजचे लाइव्ह अपडेट्स वाचत रहा...

11:45 PM (IST) May 23
यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड तालुक्यात वाळू वाहतूक प्रकरणात १४ हजार रुपयांची लाच घेताना पोलीस उपनिरीक्षक गजानन माळी यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले.
11:34 PM (IST) May 23
३ जून २०२५ पासून काही जुन्या Amazon Fire TV उपकरणांवर नेटफ्लिक्सची सेवा बंद होणार आहे. यात पहिल्या पिढीतील Fire TV बॉक्स, Fire TV Stick आणि Alexa व्हॉइस रिमोटसहचा Fire TV Stick यांचा समावेश आहे.
11:22 PM (IST) May 23
11:18 PM (IST) May 23
10:53 PM (IST) May 23
10:31 PM (IST) May 23
09:44 PM (IST) May 23
09:28 PM (IST) May 23
जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ शिवसेना खासदार श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सर्वपक्षीय शिष्टमंडळाने पत्रकार परिषद घेतली.
09:16 PM (IST) May 23
पुण्यातील वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात तिच्या मोठ्या जाऊ मयुरी हगवणे हिच्या आईने, लता जगताप यांनी, महाराष्ट्र राज्य महिला आयोगाला पाठवलेल्या पत्रात हगवणे कुटुंबावर गंभीर आरोप केले होते.
08:50 PM (IST) May 23
भीलवाड्यातील जैन मंदिरातून १.३ कोटींचे सोने, चांदी आणि दुर्मिळ कासव चोरीला गेले. चोरांची कृती CCTVमध्ये कैद झाली असून, पोलीस तपास करत आहेत.
08:41 PM (IST) May 23
08:30 PM (IST) May 23
भारतीय डाकसेवेने माथेरानसारख्या दुर्गम डोंगराळ भागात ड्रोनद्वारे पार्सल पोहोचवण्याचा यशस्वी प्रयोग केला आहे. यामुळे पारंपरिक वाहतुकीच्या तुलनेत वेळेची मोठी बचत होणार आहे.
08:24 PM (IST) May 23
किम जोंग उन यांच्या उपस्थितीत ५००० टन वजनाची नवी युद्धनौका लाँचिंगच्या वेळी पाण्यात पलटली. उपग्रह छायाचित्रांमध्ये जहाज उलटे दिसले. किम यांनी या अपयशाला "अक्षम्य अपराध" म्हटले आहे.
08:04 PM (IST) May 23
महापालिकेने स्पष्ट केले आहे की, ज्या कुत्रा मालकांनी आपला कुत्रा नोंदवला नाही किंवा परवाना घेतला नाही, त्यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई केली जाईल.
07:38 PM (IST) May 23
वैष्णवी हगवणे प्रकरणात तिच्या वडिलांनी पुणे बार असोसिएशनला पत्र लिहून आरोपी कुटुंबियांसाठी कोणताही वकील काम करू नये अशी विनंती केली आहे. पत्रात त्यांनी मुलीच्या मृत्यूनंतरच्या वेदना आणि हुंडाबळीविरोधातील भूमिका मांडली आहे.
07:38 PM (IST) May 23
जागतिक पातळीवर प्रसिद्धी असलेल्या लेखकांच्या साहित्याकडे परीक्षक सहज लक्ष देतात. पण बानू मुश्ताक यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर फारशी ओळख नव्हती. तरीही त्यांच्या साहित्याने परीक्षकांची मने जिंकली. हे कसे घडले, जाणून घ्या..
05:27 PM (IST) May 23
पंतप्रधान नरेंद्र मोदी २५ मे रोजी दिल्लीतील अशोका हॉटेलमध्ये भाजप नेतृत्वाखालील एनडीए-शासित राज्यांच्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या उच्चस्तरीय बैठकीचे अध्यक्षस्थान करणार आहेत.
05:17 PM (IST) May 23
रोहित शर्माच्या निवृत्तीनंतर, शुबमन गिल भारताचा कसोटी कर्णधार होण्याची शक्यता आहे, तर ऋषभ पंत उपकर्णधार म्हणून काम पाहतील. जसप्रीत बुमराह आणि केएल राहुल यांचाही विचार करण्यात आला होता.
05:17 PM (IST) May 23
04:42 PM (IST) May 23
६० वर्षांचे एक नामवंत वकील आणि ५० वर्षांची महिला डॉक्टर, जी त्यांची बालपणीची मैत्रीण व माजी प्रेयसी होती, दोघं घरदार, संसार, जबाबदाऱ्या सोडून एकमेकांसोबत पळून गेले. मात्र ही प्रेमकहाणी केवळ २४ तासातच संपली.
04:38 PM (IST) May 23
04:13 PM (IST) May 23
पाकिस्तान प्रायोजित दहशतवादाला आंतरराष्ट्रीय पातळीवर विरोध मिळवण्यासाठी आणि द रेझिस्टन्स फ्रंटला दहशतवादी संघटना म्हणून घोषित करण्यासाठी भारताने ३२ देशांमध्ये सर्वपक्षीय संसदीय शिष्टमंडळे पाठवली आहेत.
03:57 PM (IST) May 23
बंगळुरूतील एका टेक कंपनीच्या संस्थापकांनी कन्नड भाषेच्या वादामुळे आपली कंपनी पुण्याला स्थलांतरित करणार असल्याचे जाहीर केले आहे. त्यांच्या मते, कन्नड न बोलणाऱ्या कर्मचाऱ्यांना भविष्यात कोणत्याही अडचणी येऊ नयेत म्हणून हा निर्णय घेतला आहे.
03:01 PM (IST) May 23
02:34 PM (IST) May 23
देशद्रोही म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ज्योती मल्होत्रा हिचा काँग्रेस नेते राहुल गांधींसोबत असलेला फोटो व्हायरल होत आहे. नेटकऱ्यांना चर्चेचा विषय मिळाला आहे. खरं काय आहे ते पाहूया.
01:37 PM (IST) May 23
उत्तर प्रदेशातील एका 30 वर्षीय तरुण डॉक्टरचा हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाल्याची घटना समोर आली आहे. खरंतर, मृत्यूपूर्वी त्याला मळमळ, उलट्या आणि छातीत दुखण्यास सुरुवात झाल्याचे सांगण्यात आले आहे.
01:21 PM (IST) May 23
लग्न जवळ आले असतानाच नवरीने लग्न करण्यास नकार दिल्याची घटना कर्नाटकातील हासनात घडली आहे. अखेरच्या क्षणी लग्न मोडले गेले. वधूच्या पालकांनी अश्रू ढाळले, तर वराच्या डोळ्यांत पाणी आले.
12:54 PM (IST) May 23
वैष्णवीच्या आत्महत्येप्रकरणात दररोज नवे खुलासे होताना दिसून येत आहेत. अशातच फरार सासरे आणि दिराला अखेर अटक करण्यात आली आहे. यावरच आता वैष्णवीच्या पालकांनी प्रतिक्रिया दिली आहे.
12:17 PM (IST) May 23
स्वप्नील जोशीचा 'Tesla Cybertruck' सोबतचा फोटो व्हायरल झाला आहे. यावरुन आता चाहत्यांनी त्याच्या पोस्टखाली वेगवेगळ्या प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे.
12:04 PM (IST) May 23
प्रवासादरम्यान विमानाला टर्ब्युलन्सचा सामना करावा लागला. सर्व प्रयत्न निष्फळ ठरत असताना, प्रवाशांचे प्राण वाचवण्यासाठी इंडिगोच्या पायलटने पाकिस्तानला विनंती केली. मात्र, पाकिस्तानने ही विनंती फेटाळल्याची माहिती समोर आली आहे.
11:55 AM (IST) May 23
कर्नाटकातील आलमट्टी धरणामुळे महाराष्ट्रातील कोल्हापूर-सांगली परिसरात पूर येत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे.
11:41 AM (IST) May 23
पाकिस्तानविरुद्धच्या लढ्यासाठी पाठिंबा मागण्यासाठी केंद्र सरकारच्या सर्वपक्षीय खासदारांच्या शिष्टमंडळांनी जपान आणि UAE ला भेट देऊन यश मिळवले आहे. यावेळी खा. श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वातील भारतीय शिष्टमंडळाने UAE मध्ये पाकचा पर्दाफाश केला.
11:30 AM (IST) May 23
Harvard University : हार्वर्ड युनिव्हर्सिटी आणि ट्रम्प प्रशासनामध्ये गेल्या काही काळापासून वाद सुरू आहेत. हार्वर्ड युनिव्हर्सिटीने ट्रम्प प्रशासनाच्या विरोधात फेडरल कोर्टात खटला देखील दाखल केला होता.
10:15 AM (IST) May 23
Vaishnavi Hagawane Death : 23 वर्षांची वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात सात दिवसानंतर अखेर सासरे आणि दीराला अटक झाली आहे. यावर अंजली दमानिया यांनी पहिली प्रतिक्रिया दिलीय.
09:57 AM (IST) May 23
Vaishnavi Hagawane Case : वैष्णवी हगवणे प्रकरणात गुन्हा दाखल केलेल्या निलेश चव्हाणची पोलखोल झाली आहे. खरंतर, निलेश चव्हाणही त्याच्या पत्नीचा छळ करायचा हे आता उघड झाले आहे.
08:45 AM (IST) May 23
Cannes 2025 : कान्स फिल्म फेस्टिवलमध्ये उर्वशी रौतेलाने तिच्या बिकिनी डायमंड बॅगसह सर्वांना थक्क केले. तिचा हा अनोखा लुक सध्या चर्चेत आहे.
08:26 AM (IST) May 23
08:02 AM (IST) May 23
व्हाईट हाऊसच्या बाहेर इस्रायली दूतावासातील कर्मचारी यारॉन लिशिन्स्की आणि सारा लिन मिलग्रीम यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.यानंतर बुधवारी रात्री वॉशिंग्टन, डीसी येथील कॅपिटल ज्यूइश म्युझियमबाहेर कपलवर गोळ्या घालून हत्या करण्यात आली.