22nd May 2025 Live Updates : तमिळनाडू येथे शासकीय बस आणि खासगी टेम्पोमध्ये धडक बसल्याने अपघात झाला. यामध्ये पाच जणांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. अशातच काही ताज्या आणि लाइव्ह घडामोडींसाठी एशियानेट न्यूज मराठीचे अपडेट्स वाचत रहा...

10:50 PM (IST) May 22
Indian Football: भारताचा कोणत्याही स्तरावरील फुटबॉल संघ अद्याप थेट विश्वचषक (FIFA World Cup) पात्रता मिळवू शकलेला नाही. यजमान देश म्हणून भारताने १७ वर्षांखालील विश्वचषक खेळला आहे.
10:28 PM (IST) May 22
१३ वर्षांच्या अविस्मरणीय प्रवासानंतर लुका मॉड्रिचने रियल माद्रिदमधून निघण्याची पुष्टी केली आहे. त्यांनी चाहत्यांसाठी एक भावनिक निरोपाचा पत्र लिहिला आहे.
10:09 PM (IST) May 22
महाराष्ट्र गृह विभागाने २१ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी केले आहेत. १३ जिल्ह्यांमध्ये नवीन पोलीस अधीक्षकांची नेमणूक करण्यात आली असून, अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांचा यामध्ये समावेश आहे.
08:01 PM (IST) May 22
धुळे येथील शासकीय विश्रामगृहात अंदाज समितीच्या दौऱ्यानंतर कोट्यवधींची रोकड सापडली. या प्रकरणी समितीचे अध्यक्ष अर्जुन खोतकर यांच्यावर संशय व्यक्त होत असून, त्यांनी विरोधकांवर आरोप केले आहेत.
07:39 PM (IST) May 22
उत्तर प्रदेशच्या दहशतवादविरोधी पथकाने (यूपी एटीएस) पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली वाराणसी येथील एका व्यक्तीला अटक केली आहे. त्याच्यावर संवेदनशील माहिती परदेशी एजंटसोबत शेअर करण्याचा आरोप आहे.
07:22 PM (IST) May 22
५६ व्या वर्षी, बरेच लोक त्यांच्या आयुष्यावर चिंतन करतात. भारतातील चेन्नई येथे राहणारे निवृत्त अभियंता श्रीराम राजगोपालन यांच्यासाठी, त्या चिंतनामुळे प्रार्थना ऐकली गेली... एमिरेट्स ड्रॉसह २३१ कोटी रुपयांचा जॅकपॉट जिंकला.
07:01 PM (IST) May 22
06:55 PM (IST) May 22
शिवसेना नेते संजय शिरसाट यांच्या मते शरद पवार लवकरच दुसऱ्या पक्षात प्रवेश करू शकतात आणि सुप्रिया सुळे केंद्रात मंत्री होऊ शकतात. रोहित पवारांना शरद पवारांच्या वेगळ्या दिशेची जाणीव असल्याचेही त्यांनी म्हटले. शिरसाटांच्या मते मविआ फार काळ टिकणार नाही.
06:34 PM (IST) May 22
06:14 PM (IST) May 22
बॉलीवूड अभिनेता सलमान खान यांच्या बांद्रा येथील गॅलेक्सी अपार्टमेंट्समधील घरात बेकायदेशीरपणे प्रवेश करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुरुवारी सकाळी मुंबई पोलिसांनी एका महिलेला ताब्यात घेतले आहे.
06:05 PM (IST) May 22
बीडमध्ये सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर पोलिसांच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते. या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलिस अधीक्षक नवनीत काँवत यांनी 600 पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचा मोठा निर्णय घेतला आहे.
06:01 PM (IST) May 22
डोनाल्ड ट्रम्प यांनी 'गोल्डन डोम' नावाची १७५ अब्ज डॉलर्सची स्पेस मिसाइल डिफेन्स योजना सुरू केली आहे जी रोनाल्ड रेगन यांच्या स्टार वॉर्स योजनेची आधुनिक आवृत्ती मानली जात आहे. चीन आणि रशियाने यावर तीव्र प्रतिक्रिया दिली आहे.
05:38 PM (IST) May 22
वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात आरोपी कुटुंबातील दुसऱ्या सुनेवरही अत्याचार झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. मयुरी जगताप हिच्यावर तिचा पती शशांक हगवणे आणि सासरच्यांकडून मारहाण आणि मानसिक छळ होत असल्याचा आरोप आहे.
04:46 PM (IST) May 22
मुंबई इंडियन्सच्या विजयानंतर नीता अंबानी यांनी खेळाडूंना सॅनिटायझर लावून हस्तांदोलन केले. कोविड प्रकरणे वाढत असल्याने ही खबरदारी घेतल्याचे म्हटले जात आहे.
04:36 PM (IST) May 22
काहीवेळा फक्त विमानाने किंवा रोडनेच नाही तर रेल्वे प्रवासही खूप सुंदर असतो. अशाच काही रेल्वे मार्गांबद्दल येथे सांगितले आहे जे तुम्हाला एक वेगळाच अनुभव देतील.
03:59 PM (IST) May 22
03:49 PM (IST) May 22
03:34 PM (IST) May 22
03:24 PM (IST) May 22
पुण्यातील वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात दररोज नवे खुलासे होताना दिसून येत आहे. अशातच आत्महत्येपूर्वी वैष्णवीने मामाला काय सांगितले याबद्दलची चर्चा सुरू झाली आहे.
03:23 PM (IST) May 22
02:28 PM (IST) May 22
अंडे उकळताना फुटणार नाही आणि सोलताना त्रासही होणार नाही. परफेक्ट उकडलेले अंडे बनवण्यासाठी आणि त्यांचे साल सहज काढण्यासाठी काही जबरदस्त टिप्स जाणून घ्या. स्वयंपाकघरातील काम आता सोपे होईल.
02:22 PM (IST) May 22
लग्नाच्या एकाच मंचावर दोन पद्धतीने विवाहसोहळा पार पडल्याची चर्चा सध्या रंगली आहे. याचे फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. नक्की काय आहे प्रकरण जाणून घेऊया…
01:48 PM (IST) May 22
सोनू निगम यांच्या नावाने व्हायरल झालेल्या ट्विट्समुळे मीडियामध्ये खळबळ उडाली आहे, पण खरी गोष्ट वेगळीच आहे. वकील सोनू निगम सिंह यांनी तेजस्वी सूर्यांवर निशाणा साधला आहे.
12:33 PM (IST) May 22
पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपांखाली अटकेत असलेली युट्युबर ज्योती मल्होत्रा हिच्याविरोधात रोज नवे धक्कादायक खुलासे होत आहेत.
11:35 AM (IST) May 22
Pune Monsoon : पुण्यात झालेल्या अति मुसळधार पावसाने गेल्या दहा वर्षांचा रेकॉर्ड ब्रेक केला आहे. पुण्यामधील पावसाची सरासरी नोंद 31.4 मिमी केली जाते. पण यंदा तिप्पटीहून अधिक पाऊस पडला गेला.
10:40 AM (IST) May 22
Todays Weather Update : महाराष्ट्रात मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावताच हवामान विभागाने पुढील पाच दिवसांसाठी जोरदार पावसाचा इशारा दिला आहे.यामुळे नागरिकांनी घराबाहेर पडण्यापूर्वी काळजी घ्यावी असे आवाहन हवामान खात्याकडून करण्यात आले आहे.
10:26 AM (IST) May 22
Vaishnavi Hagawane Case : राज्यात सध्या पुणे येथील वैष्णवी हगवणे हिच्या आत्महत्येचे प्रकरण गाजत आहे. चित्रा वाघ यांच्यासह अन्य राजकीय नेत्यांनी या प्रकरणावर तीव्र संताप व्यक्त केला आहे. अशातच आता काही धक्कादायक खुलासे या प्रकरणात झाले आहेत.
10:14 AM (IST) May 22
वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे. या प्रकरणात अजूनही आरोपींवर कठोर कारवाई न झाल्याने अनेक सामाजिक कार्यकर्ते आणि राजकीय नेते आक्रमक झाले आहेत.
10:13 AM (IST) May 22
त्यांना केवळ हृद्यविकारांशी व हृद्यशस्त्रक्रियांशी संबंधित सर्व आधुनिक व अद्ययावत सोयी सुविधांनी व आपत्कालीन यंत्रणांनी सुसज्ज असलेले सुपर स्पेशॅलिटी रूग्णालय बांधायचे होते. पण त्यांचे हे स्वप्न अधुरेच राहिले.
09:56 AM (IST) May 22
इंदोरच्या रस्त्यावर एका मुलीने आपल्या प्रियकराला चपलांनी मारहाण केली, पँटही काढून टाकली! कारण होतं दुसऱ्या मुलीसोबत त्याचं भेटणं. व्हिडिओ व्हायरल होताच सगळेच थक्क झाले. पण ही गोष्ट जितकी दिसते तितकी साधी नाहीये…
08:55 AM (IST) May 22
भारतीय संघाचा माजी क्रिकेटपटू शिखर धवनने अलीकडेच तो रिलेशनशिपमध्ये असल्याचे जाहीर केले. यानंतर आता शिखरने कोट्यावधी रुपयांचा आलिशान फ्लॅट खरेदी केल्याची चर्चा आहे.
08:53 AM (IST) May 22
दिल्ली-श्रीनगर इंडिगो विमानाला हवाई थरकापाचा सामना करावा लागला. या थरकापामुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. विमानाने आपत्कालीन लँडिंग केले आणि सर्व प्रवासी सुखरूप आहेत.
08:43 AM (IST) May 22
08:35 AM (IST) May 22