Published : May 14, 2025, 07:00 AM ISTUpdated : May 14, 2025, 10:50 PM IST

14th May 2025 Live Updates: बलुच नेत्यांकडून पाकिस्तानपासून 'स्वतंत्र बलुचिस्तान'ची घोषणा, सोशल मीडियावर ट्रेंड

सार

ऑपरेशन सिंदूरच्या यशाचा आनंद देशभरात दिसून येत आहे. मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अगरताला बंकर येथील सैनिकांची भेट घेतली. याशिवाय मुंबईतील सीएसएमटी स्थानकाला तिरंग्याची रोषणाई करण्यात आली. आजच्या ताज्या आणि ठळक बातम्यांचे लाइव्ह अपडेट्स एशियानेट न्यूजवर नक्की वाचा. 

Balochistan

10:50 PM (IST) May 14

बलुच नेत्यांकडून पाकिस्तानपासून 'स्वतंत्र बलुचिस्तान'ची घोषणा, सोशल मीडियावर ट्रेंड

बलुच नेत्यांनी बलुचिस्तानच्या पाकिस्तानपासून स्वातंत्र्याची घोषणा केली आहे आणि भारताकडे दिल्लीत दूतावास उघडण्याची परवानगी मागितली आहे. 'ऑपरेशन सिंदूर'नंतर भारत आणि पाकिस्तानमधील तणावाच्या पार्श्वभूमीवर ही घोषणा आली आहे.
Read Full Story

10:00 PM (IST) May 14

देवस्थान जमिनींच्या व्यवहारांना ब्रेक!, महसूल मंत्र्यांचा मोठा निर्णय

महाराष्ट्र सरकारने देवस्थान वतन जमिनींच्या खरेदी-विक्री व्यवहारांवर तात्काळ बंदी घातली आहे. नवीन धोरण येईपर्यंत सर्व व्यवहार थांबवण्याचे निर्देश देण्यात आले असून, केवळ न्यायालयीन आदेश किंवा अधिकृत मंजुरी असलेल्या जमिनींचेच दस्त स्वीकारले जातील.
Read Full Story

09:10 PM (IST) May 14

दु:खावर दु:ख! वडिलांच्या अंत्यविधीनंतर परतीच्या वाटेवर मुलाचाही अपघातात मृत्यू, सोलापुरातील हृदयद्रावक घटना

सोलापूर जिल्ह्यातील वरकुटे गावाजवळ वडिलांच्या अंत्यविधीनंतर परतणाऱ्या ३५ वर्षीय हर्षद झंकर यांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. या अपघातात चार जण गंभीर जखमी झाले असून, त्यातील दोघांची प्रकृती चिंताजनक आहे.
Read Full Story

09:05 PM (IST) May 14

‘ऑपरेशन सिंदूर’च्या यशानंतर भारतीय सेनेच्या सन्मानार्थ तिरंगा यात्रा, CM फडणवीस यांच्या उपस्थितीत गिरगाव चौपाटीवर भव्य आयोजन

मुंबईतील गिरगाव चौपाटीवर ‘ऑपरेशन सिंदूर’च्या यशस्वी कारवाईनंतर भारतीय सेनेच्या शौर्याचा गौरव करण्यासाठी तिरंगा यात्रा पार पडली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती दर्शवली आणि भारतीय सशस्त्र दलांना मानवंदना दिली. 

Read Full Story

07:51 PM (IST) May 14

"वय नाही, जिद्द महत्त्वाची!", ६५ वर्षीय आजी आणि नातवाने एकत्र दिली दहावीची परीक्षा; दोघांनाही मिळाले घवघवीत यश!

मुंबईच्या ६५ वर्षीय प्रभादेवी जाधव आणि त्यांच्या नातू सोहम जाधव यांनी एकत्र दहावीची परीक्षा दिली आणि उत्तीर्ण झाले. प्रभादेवी यांनी ५२% तर सोहमने ८२% गुण मिळवले.
Read Full Story

07:23 PM (IST) May 14

"शत्रूला मदत करणाऱ्या देशांना नाही म्हणायची वेळ आलीय!", हर्ष गोयंका यांची तुर्किये व अझरबैजानवर संतप्त प्रतिक्रिया

भारतीय उद्योगपती हर्ष गोयंका यांनी तुर्किये आणि अझरबैजानने पाकिस्तानला समर्थन दिल्याने भारतीय पर्यटकांना या देशांवर बहिष्कार टाकण्याचे आवाहन केले आहे. अनेक पर्यटन कंपन्यांनीही या आवाहनाला पाठिंबा दर्शवला आहे.
Read Full Story

06:57 PM (IST) May 14

‘भार्गवास्त्र’: भारताची नवी शस्त्रसज्जता!, स्वदेशी काउंटर ड्रोन प्रणालीची यशस्वी चाचणी

भारताने 'भार्गवास्त्र' या स्वदेशी काउंटर ड्रोन प्रणालीची यशस्वी चाचणी घेतली आहे. ही प्रणाली एकाच वेळी अनेक ड्रोन लक्ष्यांवर हल्ला करू शकते आणि भविष्यातील ड्रोन हल्ल्यांना रोखण्यास मदत करेल.
Read Full Story

06:32 PM (IST) May 14

मुकेश अंबानी ट्रम्प आणि कतारच्या अमीरांसोबत डिनरसाठी दोहाकडे रवाना

मुकेश अंबानी आणि त्यांच्या पत्नी नीता अंबानी २० जानेवारी २०२५ रोजी डोनाल्ड ट्रम्पच्या दुसऱ्या शपथविधी सोहळ्याला उपस्थित असलेल्या खास पाहुण्यांमध्ये होते.

Read Full Story

06:28 PM (IST) May 14

मराठमोळ्या नीरज चोप्राला लेफ्टनंट कर्नलची मानद पदवी, नियुक्ती 16 एप्रिलपासून लागू

दोन वेळा ऑलिंपिक पदक विजेते नीरज चोप्रा यांना प्रादेशिक सेनेत लेफ्टनंट कर्नलचा मानद पदवी देण्यात आली आहे, असे संरक्षण मंत्रालयाने बुधवारी, 14 मे रोजी सांगितले. ही नियुक्ती 16 एप्रिलपासून लागू झाली आहे, असे एका निवेदनात म्हटले आहे.

 

Read Full Story

06:19 PM (IST) May 14

पुणे विमानतळावर 10.3 कोटींचा हायड्रोपोनिक गांजा, हशिश जप्त, बँकॉकहून आला होता प्रवासी

बँकॉकहून आलेल्या दोन भारतीय प्रवाशांकडून पुणे विमानतळावर तब्बल १० कोटी रुपयांचे अंमली पदार्थ जप्त करण्यात आले आहे.

Read Full Story

04:37 PM (IST) May 14

पाकिस्तान देणार मसूद अजहरला १४ कोटी, IMF कर्जाचा गैरवापर?

Operation Sindoor: IMF कडून कर्ज मिळाल्यानंतरही पाकिस्तान दहशतवाद्यांना मदत करत आहे. ऑपरेशन सिंदूरमध्ये मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांच्या कुटुंबियांना नुकसान भरपाई दिली जात आहे, ज्यामध्ये मसूद अजहरचाही समावेश आहे.

Read Full Story

04:17 PM (IST) May 14

सैंधव मीठापासून कडुलिंबापर्यंत: या 5 गोष्टी पुसण्याच्या पाण्यात मिसळा, घर स्वच्छ आणि शुभ होईल

सकारात्मकतेसाठी पोछ्याच्या पाण्यात काय घालावे: घरात सकारात्मकता आणि लक्ष्मीचा वास हवा आहे? जाणून घ्या पोछ्याच्या पाण्यात कोणत्या ५ गोष्टी मिसळल्याने घर स्वच्छ होईलच, शिवाय नकारात्मकताही दूर होईल.

Read Full Story

04:08 PM (IST) May 14

ट्रम्प यांना कतारकडून ४०० दशलक्ष डॉलर्सचे विमान भेट

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना कतारचे सत्ताधारी कुटुंब ४०० दशलक्ष डॉलर्स किमतीचे बोईंग ७४७-८ जंबो जेट भेट देणार आहे. हे विमान अतिशय आलिशान असून त्यात बेडरूम, मीटिंग हॉल, खाजगी सुइट्स आणि आधुनिक सुरक्षा व्यवस्था आहेत.
Read Full Story

04:06 PM (IST) May 14

ऑपरेशन सिंदूर: अस्पर्श युद्धनीतीतील यश; मोदींचे कौतुक

पाकिस्तानी क्षेपणास्त्रांचा भारतीय सैन्याने सहजपणे नाश केल्याचे एस. गुरुमूर्ती यांनी आपल्या लेखात म्हटले आहे.

Read Full Story

03:55 PM (IST) May 14

Solo Trip: गोवा नाही, आता ही ५ नवीन ठिकाणे बनली आहेत सोलो ट्रॅव्हलर्सची पहिली पसंती

Solo travel destinations: एकाकी प्रवास करण्याचा विचार करत असाल, पण सुरक्षित, शांत आणि सुंदर ठिकाणाचा शोध असेल तर काळजी करू नका. भारतातील ५ अशी ठिकाणे आहेत जिथे तुम्ही एकटेही आनंदाने फिरू शकता.

Read Full Story

03:50 PM (IST) May 14

HBD Madhuri Dixit ७८ वर्षे, १ शीर्षक, ३ चित्रपटांनी ६ कलाकारांना स्टार बनवले, वाचा कसे

‘साजन’ या शीर्षकाने ७८ वर्षांत तीन चित्रपट प्रदर्शित झाले, ज्यात सहा कलाकारांनी मुख्य भूमिका साकारल्या. माधुरी दीक्षित, सलमान खान आणि संजय दत्त यांच्या ‘साजन’ चित्रपटाशी संबंधित रंजक माहिती येथे वाचा.
Read Full Story

03:50 PM (IST) May 14

पाकिस्तानचा दहशतवादाला पाठींबा — मसूद अझहरच्या कुटुंबाला १४ कोटींची भरपाई

आयएमएफकडून कर्ज मिळाल्यानंतर पाकिस्तान दहशतवादी मसूद अझहरला भरपाई देणार आहे. भारताच्या ऑपरेशन सिंदूरमध्ये मृत्युमुखी पडलेल्या अझहरच्या कुटुंबियांना ही भरपाई दिली जाणार आहे.
Read Full Story

03:41 PM (IST) May 14

ऑपरेशन सिंदूर: मेणबत्त्यांपासून ब्रह्मोसपर्यंतचा प्रवास

पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पंधरा दिवसांनी नरेंद्र मोदी सरकारने 'ऑपरेशन सिंदूर' या नावाने दहशतवाद्यांवर कारवाई केली. पाकिस्तानसह पाकव्याप्त काश्मीरमधील ९ दहशतवादी तळांवर हवाई हल्ले करण्यात आले. यात १०० हून अधिक दहशतवादी ठार झाले.

Read Full Story

03:26 PM (IST) May 14

Zealandia सुमारे ४०० वर्षांपूर्वी हरवलेला पृथ्वीवरील खंड शोधण्यात शास्त्रज्ञांना यश

४०० वर्षांपासून प्रशांत महासागराच्या तळाशी असलेल्या झीलँडिया या हरवलेल्या खंडाचे शास्त्रज्ञांनी पूर्णपणे मॅपिंग केले आहे. यामुळे त्याची भूगर्भीय रहस्ये उलगडली आहेत आणि पृथ्वीच्या इतिहासात त्याचे स्थान निश्चित झाले आहे.

Read Full Story

03:15 PM (IST) May 14

एस. जयशंकर यांची सुरक्षा आता झेड श्रेणीत, ताफ्यात एक नवीन बुलेटप्रूफ वाहन सामील

पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानमध्ये ऑपरेशन सिंदूर सुरू केले आणि परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांच्या सुरक्षेत वाढ केली आहे. सीमेवरील तणाव लक्षात घेता, त्यांच्या ताफ्यात आणखी एक बुलेटप्रूफ वाहन जोडण्यात आले आहे.
Read Full Story

03:02 PM (IST) May 14

ठाण्यात एकनाथ शिंदे यांचा 'तिरंगा यात्रेत' सहभाग

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यात तिरंगा यात्रेत सहभाग घेतला आणि भारतीय सशस्त्र दलांचे कौतुक केले. ऑपरेशन सिंदूरच्या यशानंतर सैन्याच्या सन्मानार्थ ही यात्रा आयोजित करण्यात आली होती.
Read Full Story

02:14 PM (IST) May 14

मुख्यमंत्री फडणवीस यांनी मेट्रो मार्ग ९ चे केले तांत्रिक निरीक्षण

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांनी दहिसर (पूर्व) ते काशीगाव मेट्रो मार्ग ९ चे तांत्रिक निरीक्षण केले. फडणवीस म्हणाले की, मेट्रो मार्गाचा मिरा भाईंदर आणि मुंबईहून येणाऱ्या प्रवाशांना मोठा फायदा होईल. 

Read Full Story

01:29 PM (IST) May 14

Cyclone Shakti Update : बंगालच्या खाडीत शक्ती चक्रीवादळ निर्माण, IMD कडून या राज्यांसाठी अ‍ॅलर्ट जारी

आयएमडीकडून बंगालच्या खाडीमध्ये पुन्हा नवे चक्रीवादळ निर्माण होत आहे. या चक्रीवादळाला शक्ती असे नाव देण्यात आले आहे.

Read Full Story

01:21 PM (IST) May 14

"तणावानं हरवली अजून एक जीवनगाथा; पॉलिटेक्निक विद्यार्थिनीने घेतला जीवनाला विराम"

छत्रपती संभाजीनगरमध्ये एका १७ वर्षीय पॉलिटेक्निक विद्यार्थिनीने अभ्यासाच्या तणावामुळे आत्महत्या केली. आई-वडील कामावर असताना तिने घरी गळफास घेतला. ही घटना शिक्षण व्यवस्थेतील मानसिक आरोग्याच्या दुर्लक्षित बाजूवर प्रकाश टाकते.
Read Full Story

12:53 PM (IST) May 14

पहलगाम हल्ल्यात वडील गमावलेल्या हेमंत जोशींचा मुलगा दहावीत 78 टक्के गुणांनी उत्तीर्ण

डोंबिवलीमध्ये राहणाऱ्या हेमंत जोशींना पहलगाम हल्ल्यामध्ये जीव गमवावा लागला. यामुळे संपूर्ण कुंटुबावर दु:खाचा डोंगर कोसळला गेला.

Read Full Story

12:34 PM (IST) May 14

मुंबईत पोलिस दलाला काळीमा; शिवाजीनगरचा अधिकारी अडकला लाचखोरीत

मुंबईतील शिवाजीनगर पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षक शिवाजी भोसले यांना २५ हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले. गुन्हा नोंदवण्यासाठी लाचेची मागणी केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली.
Read Full Story

12:27 PM (IST) May 14

मध्य प्रदेशचे मंत्री विजय शाह यांची कर्नल सोफिया कुरेशी यांच्यावर आक्षेपार्ह टिप्पणी, वादाला फुटले तोंड

मध्य प्रदेशचे मंत्री विजय शाह यांनी कर्नल सोफिया कुरेशी यांच्यावर केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे राजकीय वादळ निर्माण झाले आहे. शाह यांनी कर्नलला दहशतवाद्यांशी जोडले. 

Read Full Story

12:18 PM (IST) May 14

परळीत प्रियकराकडून प्रेयसीची कोत्याने वार करत निघृण हत्या, स्वत:लाही संपवले

रायगडमधील परळी येथील एका तरुणाने प्रेयसीवर कोत्याने वार करत तिची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

Read Full Story

12:14 PM (IST) May 14

पाकिस्तानी रेंजर्सने ताब्यात असलेल्या बीएसएफ जवानाची केली सुखरुप सुटका

२३ एप्रिल २०२५ रोजी चुकून पाकिस्तान सीमेत गेल्यामुळे पाकिस्तान रेंजर्सने ताब्यात घेतलेल्या बीएसएफ कॉन्स्टेबल पूर्णम कुमार शॉ (पीके शॉ) यांना आज भारतात सुपूर्द करण्यात आले आहे.

Read Full Story

11:38 AM (IST) May 14

अकोल्याच्या मातीने दिले बुद्धपौर्णिमेचे मोठे गिफ्ट, न्यायमूर्ती भूषण गवई यांनी घेतली सरन्यायाधीशपदाची शपथ

न्यायमूर्ती भूषण रामकृष्ण गवई यांनी भारताचे ५२ वे सरन्यायाधीश म्हणून राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडून शपथ घेतली.

Read Full Story

11:18 AM (IST) May 14

रोहित शर्माने घेतली मुख्यमंत्री फडणवीसांची भेट, निवृत्तीची घोषणा केल्यावर पहिलीच भेट

निवृत्तीच्या आठवड्यानंतर रोहितने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ‘वर्षा’ निवासस्थानी भेट घेतली.

Read Full Story

11:04 AM (IST) May 14

अकोल्यातील तरुणाचा चित्रपट कान्स महोत्सवात झळकणार, ‘अ डॉल मेड अप ऑफ क्ले’ आंतरराष्ट्रीय स्तरावर

विदर्भातील अकोल्यात जन्मलेला आणि आपल्या मेहनतीच्या जोरावर सिनेसृष्टीत वेगळी ओळख निर्माण करणारा साहिल इंगळे याने साकारलेला ‘अ डॉल मेड अप ऑफ क्ले’ हा लघुपट आता थेट जगप्रसिद्ध कान्स चित्रपट महोत्सवात (Cannes Film Festival) झळकणार आहे.

Read Full Story

10:33 AM (IST) May 14

भारतीय वंशाच्या अनीता आनंद यांची कॅनडाच्या परराष्ट्रमंत्रीपदी नियुक्ती

कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी मंत्रिमंडळात फेरबदल करत भारतीय वंशाच्या अनीता आनंद यांची परराष्ट्रमंत्रीपदी नियुक्ती केली आहे. भारत-कॅनडा संबंधांमध्ये तणाव असताना त्यांनी भारतासोबतचे संबंध पूर्ववत करण्याला प्राधान्य देण्याचे म्हटले आहे.
Read Full Story

10:30 AM (IST) May 14

मुंबईतील दांपत्याने विदेशवारी रद्द करुन शहिदाच्या कुटुंबीयाला केली मदत, निर्माण केला देशप्रेमाचा नवा आदर्श

गेले अनेक महिने परदेशवारीची तयारी करत असलेल्या या जोडप्याने, देशासाठी लढणाऱ्या जवानांच्या बलिदानाचा आदर म्हणून आपली फॉरेन ट्रीप रद्द केली आहे. त्यांनी पिकनिकसाठीची रक्कम – तब्बल ₹1,09,001 – शहीद मुरली नाईक यांच्या कुटुंबीयांना मदतीसाठी दिली आहे.

Read Full Story

10:27 AM (IST) May 14

न्या. भुषण आर. गवई यांची भारताचे नवे सरन्यायाधीश म्हणून निवड

न्यायमूर्ती भुषण रामकृष्ण गवई यांनी बुधवारी भारताचे ५२ वे सरन्यायाधीश म्हणून शपथ घेतली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी न्या. गवई यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. ते सरन्यायाधीश संजीव खन्ना यांच्यानंतर हे पद भूषवणार आहेत. 

Read Full Story

10:10 AM (IST) May 14

Pune : गुंडाला पोलीस व्हॅनमध्ये बिर्याणी दिल्याप्रकरणी सहाय्यक निरीक्षकासह 4 कॉन्स्टेबल निलंबित

3 मार्च रोजी येरवडा मध्यवर्ती कारागृहातून सांगली जिल्हा कारागृहात हलवताना गुंड गजानन उर्फ ​​गजा मारणे याला पोलिस व्हॅनमध्ये मटण बिर्याणी दिल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. 

Read Full Story

09:10 AM (IST) May 14

सिंधू जल करार निलंबित – पाकिस्तानच्या शेतीवर मोठा परिणाम

भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर, भारताने पाकिस्तानवर आर्थिक दबाव वाढवण्यासाठी अनेक उपाययोजना केल्या आहेत. यामध्ये सिंधू जल कराराचे निलंबन, व्यापार बंदी, आणि पोस्टल सेवा बंद करणे यांचा समावेश आहे.

Read Full Story

08:55 AM (IST) May 14

माजी संरक्षण सचिव अजय कुमार यांची यूपीएससी अध्यक्षपदी नियुक्ती

माजी संरक्षण सचिव अजय कुमार यांची केंद्रीय लोकसेवा आयोगाचे (UPSC) अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी त्यांच्या नियुक्तीला मान्यता दिली आहे

Read Full Story

08:02 AM (IST) May 14

राजनैतिक संघर्षाची नवी फेज: पाकिस्तानने भारतीय राजनयिकाला देश सोडण्याचे आदेश

भारताने पाकिस्तान उच्चायोगातील एका अधिकाऱ्याला जासूसीच्या आरोपावरून निष्कासित केल्यानंतर, पाकिस्ताननेही भारतीय उच्चायोगातील एका अधिकाऱ्याला 'पर्सोना नॉन ग्राटा' घोषित करून देश सोडण्याचा आदेश दिला आहे.

Read Full Story

07:46 AM (IST) May 14

Cannes 2025: उर्वशी रौतेलाची कान्समध्ये 4 लाखांची बॅग अन् अंतरंगी फॅशन, पाहा PHOTOS

कान्स फिल्म फेस्टिवल २०२५ ची सुरुवात झाली आहे. पहिल्याच दिवशी बॉलीवूड अभिनेत्री उर्वशी रौतेलाने रेड कार्पेटवर आपल्या जलव्याने सर्वांना भुरळ घातली. इतरही अनेक सेलिब्रिटी उपस्थित होते.

Read Full Story