Published : May 12, 2025, 07:29 AM ISTUpdated : May 12, 2025, 11:00 PM IST

12th May 2025 Live Updates: IPL 2025 Revised Schedule सुधारित वेळापत्रक जाहीर, 3 जूनला होणार फायनल

सार

भारत-पाकिस्तान तणावाची स्थिती सध्या निवळली गेली आहे. पण तिन्ही दलाकडून काल घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ऑपरेशन सिंदूरची संपूर्ण माहिती देण्यात आली. अशातच आजच्या (12 मे) ताज्या आणि ढळक घडामोडींचा आढवा एशियानेट न्यूजवर नक्की वाचा…

11:00 PM (IST) May 12

IPL 2025 Revised Schedule सुधारित वेळापत्रक जाहीर, 3 जूनला होणार फायनल

सीमापार तणावामुळे एका आठवड्याच्या स्थगितीनंतर, बीसीसीआयने उर्वरित आयपीएल २०२५ सामन्यांचे सुधारित वेळापत्रक जाहीर केले आहे. १७ मे पासून हंगाम पुन्हा सुरू होईल, ज्यामध्ये दोन डबलहेडर नियोजित आहेत आणि अंतिम सामना ३ जूनला होणार आहे.
Read Full Story

10:52 PM (IST) May 12

पाकिस्तानी ड्रोन सांबामध्ये पाडला

दोन्ही देशांच्या डीजीएमओंमधील चर्चेनंतर काही तासांतच पाकिस्तानचा ड्रोन सांबामध्ये भारताने पाडला.

Read Full Story

10:21 PM (IST) May 12

पंतप्रधान मोदींच्या भाषणातील ३० मोठे मुद्दे: 'दहशतवाद्यांनी आमच्या बहिणींचे सिंदूर नष्ट केले, आम्ही दहशतवादाचे मुख्यालय उखडून टाकले'

PM Modi Speech: पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानला दहशतवादावरून चांगलेच धारेवर धरले. 'ऑपरेशन सिंदूर'ची माहिती देताना त्यांनी सांगितले की भारताने पाकिस्तानातील दहशतवादी तळ कसे उद्ध्वस्त केले आणि जगाला भारताच्या ताकदीची जाणीव करून दिली.

Read Full Story

10:01 PM (IST) May 12

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे राष्ट्राला उद्देशून संबोधन, वाचा प्रत्येक शब्द जसाचा तसा

गेल्या काही दिवसांत आपण सर्वांनी आपल्या देशाची ताकद आणि संयम दोन्ही पाहिले आहेत. सर्वप्रथम, भारतीय जनतेच्या वतीने, मी भारताच्या शूर सैन्याला, सशस्त्र दलांना, आपल्या गुप्तचर संस्थांना आणि आपल्या शास्त्रज्ञांना सलाम करतो.

Read Full Story

10:01 PM (IST) May 12

आंध्र प्रदेश हादरले! प्रेमाचा भयावह शेवट, नुडल्स-आईस्क्रीम आणि नंतर गळा चिरला!

विशाखापट्टणममध्ये जळालेल्या अवस्थेत सापडलेल्या महिलेच्या मृतदेहाचे रहस्य पोलिसांनी उलगडले आहे. चेहरा ओळखता येत नसला तरी, मोबाईल कॉल डिटेल्स आणि सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने पोलिसांनी आरोपी क्रांती कुमारला अटक केली.
Read Full Story

08:54 PM (IST) May 12

'...तर मी फरहान अख्तरचा भाऊ असतो!', प्रतीक बब्बरच्या आयुष्यातील अनकही गोष्ट

स्मिता पाटील यांच्या निधनानंतर त्यांचा मुलगा प्रतीक बब्बर यांनी आपल्या आयुष्यातील काही अज्ञात प्रकरण उघड केले आहेत. जावेद अख्तर आणि शबाना आझमी यांनी त्यांना दत्तक घेण्याचा विचार केला होता आणि आता ते 'प्रतीक स्मिता पाटील' या नावाने ओळखले जातात.
Read Full Story

08:37 PM (IST) May 12

बीडमध्ये ईडीची धडक कारवाई: १८८ कोटींची मालमत्ता जप्त, कुटे ग्रुपच्या गैरव्यवहारांचा पर्दाफाश!

ज्ञानराधा मल्टिस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या २,४६७ कोटी रुपयांच्या गुंतवणूक फसवणूक प्रकरणात ईडीने कुटे ग्रुपच्या १८८ कोटींच्या मालमत्ता जप्त केल्या आहेत. यात जमीन, इमारती, औद्योगिक प्लांट आणि यंत्रसामग्रीचा समावेश आहे.

Read Full Story

08:24 PM (IST) May 12

Operation Sindoor फक्त स्थगित, पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानला खणकावले

ऑपरेशन सिंदूरनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्राला उद्देशून भाषण केले आणि पाकिस्तानला पुढील चिथावणी देण्याविरुद्ध इशारा दिला. ते म्हणाले, 'मी आमच्या सुरक्षा दलांचे अभिनंदन आणि सलाम करू इच्छितो.'

 

Read Full Story

08:12 PM (IST) May 12

नागपूर हादरले! एकाच कुटुंबातील पाच जणांचा खदानित अंत, गूढ कायम

नागपूरजवळील कुही तालुक्यातील सुरगाव येथील एका खदानीत एकाच कुटुंबातील पाच जणांचे मृतदेह आढळून आले. मृतांमध्ये दोन महिला, दोन मुले आणि एक पुरुष आहेत. ते रविवारी फिरायला गेले होते आणि बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवण्यात आली होती.
Read Full Story

07:20 PM (IST) May 12

पिंपरी चिंचवडच्या १८ वर्षीय तरुणीवर भररस्त्यात सपासप वार, शेजाऱ्यानेच खून केल्याचे उघडकीस

अवघ्या १८ वर्षांच्या कोमल भरत जाधव या तरुणीची तिच्या राहत्या परिसरातच भररस्त्यात धारदार शस्त्राने हत्या करण्यात आली. विशेष म्हणजे, या घटनेत तिच्याच शेजाऱ्याचा हात असल्याचे उघडकीस आले आहे.

Read Full Story

07:07 PM (IST) May 12

ऑफिसमध्ये ब्लेझरला द्या 6 स्टायलिश लूक, मिळवा बॉस लेडीचा स्वॅग

ब्लेझर आता फक्त औपचारिक पोशाख नाही! या ६ सोप्या स्टायलिंग टिप्स वापरून ऑफिसमध्ये बॉस लेडी लुक मिळवा. ड्रेस, साडी, स्कर्ट किंवा जीन्स, प्रत्येक पोशाखाबरोबर ब्लेझर स्टाईल करा आणि कमाल दिसा.

Read Full Story

05:44 PM (IST) May 12

भारताच्या हवाई संरक्षण यंत्रणेत प्रवेश करणे अशक्य, जाणून घ्या किती थर आहेत आणि प्रत्येकाचे काम काय?

Operation Sindoor: रक्षा मंत्रालयाने ऑपरेशन सिंदूरच्या यशावर प्रकाश टाकला. भारताच्या मजबूत एअर डिफेन्स सिस्टीमने शत्रूच्या हवाई हल्ल्यांना निष्प्रभ केले. मल्टी-लेयर सुरक्षेने ड्रोनपासून ते क्षेपणास्त्रांपर्यंत सर्वकाही रोखले.

Read Full Story

05:20 PM (IST) May 12

हे आहेत कर्नाटकातील Top 5 श्रीमंत जिल्हे, जाणून घ्या त्यांची माहिती

कर्नाटकात एकूण ३१ जिल्हे आहेत. या ३१ जिल्ह्यांपैकी कोणता जिल्हा सर्वात श्रीमंत आहे हे तुम्हाला माहिती आहे का? कर्नाटकातील टॉप ५ श्रीमंत जिल्ह्यांची यादी येथे आहे. 
 

Read Full Story

05:12 PM (IST) May 12

धर्मेंद्र vs जितेंद्र: जाणून घ्या नेट वर्थ, मूव्हिज, उत्पन्न आणि Relationship ची तुलना

धर्मेंद्र आणि जितेन्द्र, दोन दिग्गज अभिनेत्यांच्या फिल्मी प्रवासाची आणि यशाची गोष्ट. सुपरहिट चित्रपटांपासून ते त्यांच्या संपत्तीपर्यंत, जाणून घ्या काही अनोखे किस्से.

Read Full Story

05:07 PM (IST) May 12

पंतप्रधान मोदी आज रात्री ८ वाजता करणार भाषण, नेमकं काय बोलणार?

पंतप्रधान मोदी आज रात्री ८ वाजता देशाला संबोधित करणार आहेत. ऑपरेशन सिंधूर, भारत-पाकिस्तान युद्धबंदी, आर्थिक विकास यासह अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर ते भाषण करणार असल्याची अपेक्षा आहे.

Read Full Story

05:04 PM (IST) May 12

सनी V/S संजू: जाणून घ्या नेट वर्थ, हिट मुव्हिज आणि उत्पन्नाची तुलना

सनी देओल आणि संजय दत्त, दोघेही बॉलीवुडमधील दिग्गज कलाकार. अॅक्शन आणि ड्रामानं भरलेल्या त्यांच्या करिअरमध्ये अनेक चढ-उतार आले. पण दोघांच्या संपत्तीचे आणि यशाचे रहस्य वेगळे आहेत.
Read Full Story

04:52 PM (IST) May 12

साऊथस्टार राय लक्ष्मीने महेंद्र धोनीसोबतच्या Past Relationship चा केला धक्कादायक खुलासा

धोनीसोबतच्या त्यांच्या नातेसंबंधाबद्दल राय लक्ष्मी यांनी उघडपणे भाष्य केले आहे. ते नाते एक जखम असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

 

Read Full Story

04:27 PM (IST) May 12

Operation Sindoor: एअर मार्शलने चौपाई म्हणत पाकिस्तानला दिला इशारा, जाणून घ्या याचा अर्थ काय?

Operation Sindoor: सोमवारी पाकिस्तानविरुद्ध ऑपरेशन सिंदूरबाबत भारतीय सैन्याने पत्रकार परिषद घेतली. यावेळी एअर मार्शल अवधेश कुमार भारती यांनी रामचरित मानसातील एक चौपाई सुनावली.

 

Read Full Story

03:52 PM (IST) May 12

भारतीय लष्कराचा व्हिडिओ पुरावा: पाकिस्तानी मिराज विमानाचा अचूक खात्मा

भारतीय लष्कराने 'ऑपरेशन सिंदूर' अंतर्गत पाकिस्तानी मिराज लढाऊ विमानाचा नाश केल्याचा व्हिडिओ पुरावा सादर केला आहे. पाकिस्तानने भारताच्या पाच लढाऊ विमानांना पाडल्याचा दावा केला होता.

Read Full Story

03:49 PM (IST) May 12

Operation Sindoor: इस्रोच्या देखरेखीमुळे दहशतवाद्यांचा अंत कसा झाला?, येथे जाणून घ्या

पहलगाममध्ये झालेल्या हल्ल्यानंतर इस्रोच्या १० उपग्रहांनी देशाच्या सीमा सांभाळल्या! ऑपरेशन सिंदूरअंतर्गत पाकिस्तानात लपलेल्या दहशतवाद्यांवर गुप्त कारवाई झाली—जाणून घ्या कसे आकाशातून दहशतवादाची नजर ठेवण्यात आली आणि त्यांचा नाश केला गेला.

 

Read Full Story

03:35 PM (IST) May 12

'ऑपरेशन सिंदूर'मागे फक्त हल्ला नव्हे, तर अचूक संरक्षणशक्तीचं प्रदर्शन!

‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये भारताने पाकिस्तानच्या आत हल्ला करून अत्याधुनिक संरक्षण व्यवस्थेचे प्रदर्शन केले. MR-SAM, Akash, Spyder, आणि Barak-8 यांसारख्या प्रगत एअर डिफेन्स सिस्टम्सचा वापर करून शत्रूच्या प्रतिहल्ल्यांना निष्प्रभ केले.
Read Full Story

03:24 PM (IST) May 12

भारताचा नूर खान एअरबेसवर अचूक हल्ला: अण्वस्त्र सुरक्षेवर पाकिस्तानची घाबरगुंडी

भारताने 'ऑपरेशन सिंदूर' अंतर्गत पाकिस्तानच्या नूर खान एअरबेसवर अचूक हल्ला केला, ज्यामुळे पाकिस्तानची अण्वस्त्र सुरक्षा धोक्यात आली. अमेरिकेच्या मध्यस्थीने दोन्ही देशांमध्ये युद्धविराम झाला.
Read Full Story

03:16 PM (IST) May 12

१० वी निकालाची घोषणा १३ मेला, निकाल कधी आणि कुठे पाहता येणार?

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ (MSBSHSE) उद्या १३ मे रोजी १०वीचा निकाल जाहीर करणार आहे. १६ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली असून, निकाल हा केवळ आकड्यांची गोष्ट नसून विद्यार्थी, पालक आणि स्पर्धेच्या चाहुलीचा संगम आहे

Read Full Story

03:06 PM (IST) May 12

पाकिस्तानी हेराने संरक्षण मंत्रालयाचा अधिकारी बनून पत्रकारांना फसवलं

पाकिस्तानचा एक गुप्तचर भारतीय संरक्षण मंत्रालयाचा अधिकारी असल्याचे भासवत, देशातील पत्रकारांकडून संवेदनशील माहिती गोळा करण्याचा प्रयत्न करत होता. भारतीय गुप्तचर संस्थांनी वेळीच हस्तक्षेप करून ही कारवाई उघडकीस आणली आहे. 

Read Full Story

02:56 PM (IST) May 12

मुंबईत सुरक्षेबाबत महत्त्वाची बैठक उपमुख्यमंत्री शिंदे यांनी सैन्याचे आभार मानले

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पाकिस्तानला दिलेल्या योग्य उत्तराबद्दल सैन्य दलांचे आभार मानले आहेत. मुंबई हे आर्थिक केंद्र असल्याने राज्य सरकारला सतर्क राहण्याची गरज असल्याचे त्यांनी म्हटले आहे. 

Read Full Story

02:48 PM (IST) May 12

"भारताने पुरावे दिले, पाकिस्तानकडे काहीच नाही" – पाक पत्रकाराचा व्हिडिओ व्हायरल

पाकिस्तानी पत्रकार अहमद नूरानी यांनी भारताविरुद्ध पाकिस्तानकडे कोणतेही पुरावे नसल्याचे म्हटले आहे. भारताने मात्र आपले सर्व पुरावे जगासमोर मांडले आहेत. यामुळे पाकिस्तानच्या दाव्यांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
Read Full Story

02:32 PM (IST) May 12

India-Pakistan Tensions : महाराष्ट्र सरकारची संरक्षण दलासोबत बैठक, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती

India-Pakistan Tensions : भारत-पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी संरक्षण दल आणि महाराष्ट्र राज्य सरकार यांच्यात एक महत्त्वाची बैठक झाली. 

Read Full Story

02:25 PM (IST) May 12

पाकिस्तानात 4.6 रिश्टर स्केल भूकंपाचे धक्के

पाकिस्तानात 4.6 रिश्टर स्केल भूकंपाचे धक्के जाणवल्याची माहिती नॅशनल सेंटर ऑफ सिस्मोलॉजीकडून देण्यात आली आहे. 

 

 

02:23 PM (IST) May 12

नागपुरातील 9 प्रसिद्ध खाण्याचे पदार्थ, जिभेवर आणेल वेगळीच चव, वाढेल लज्जत

नागपूर हे खवय्यांचा स्वर्ग आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असो, केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी असो, प्रसिद्ध गझलकार सुरेश भट असो खाण्याच्या सुरस कथा मोठ्या चविने चर्चिल्या जातात. आज आपण नागपुरातील खास ९ पदार्थांची माहिती जाणून घेणार आहोत.

Read Full Story

02:07 PM (IST) May 12

पहलगामच्या हल्ल्यापासून युद्धाच्या उंबरठ्यापर्यंत: भारत-पाक संघर्षाचा उलगडा

पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये तणाव वाढला, ज्यामुळे लष्करी कारवाया, क्षेपणास्त्र हल्ले आणि युद्धबंदीचे उल्लंघन झाले. अमेरिकेच्या मध्यस्थीमुळे युद्धबंदी झाली, तरीही तणाव कायम आहे आणि सिंधू जल करार स्थगित आहे.
Read Full Story

01:17 PM (IST) May 12

महाबळेश्वरच्या विहिरीतून सापडल्या मराठ्यांच्या 'फिरंगी' तलवारी!

महाबळेश्वरमधील एका जुन्या विहिरीत ब्रिटिश राजवटीपासून लपवलेली मराठा धोप प्रकारच्या तलवारी सापडल्या आहेत. इतिहास अभ्यासक आणि स्थानिक जाणकारांच्या मदतीने हा शोध लागला असून, या तलवारी छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील असल्याचे मानले जात आहे.
Read Full Story

01:10 PM (IST) May 12

ऑपरेशन सिंदूरनंतर बंद केलेली ३२ विमानतळ पुन्हा सुरू, नागरी विमान वाहतुकीला परवानगी

भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावामुळे काही दिवसांपूर्वी उत्तर आणि उत्तर-पश्चिम भारतातील ३२ विमानतळ नागरी विमान वाहतुकीसाठी तात्पुरते बंद करण्यात आले होते. मात्र आता ही सर्व विमानतळे पुन्हा उघडण्यात आली आहेत.

Read Full Story

12:10 PM (IST) May 12

Virat Kohli Retires १४ वर्षांनंतर विराटचा कसोटी क्रिकेटला अलविदा

विराट कोहलीने १४ वर्षे खेळल्यानंतर कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय आपल्या इंस्टाग्राम हँडलवर जाहीर केला.

Read Full Story

12:03 PM (IST) May 12

डोनाल्ड ट्रंम्प यांना सरपंच कोणी बनवले? आपले सैन्य पुरेसे आहे - संजय राऊत

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत-पाकिस्तानमधील काश्मीर मुद्द्यावर मध्यस्थी करण्याची ऑफर दिल्यानंतर, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते संजय राऊत यांनी ट्रम्प यांना "सरपंच" कोण बनवले असा सवाल केला.

Read Full Story

11:46 AM (IST) May 12

बीड पोलिसांकडून वाल्मिक कराडच्या समर्थकाच्या आणखी एका गँगवर मोक्का

बीड पोलिसांकडून वाल्मिक कराडच्या समर्थकाच्या आणखी एका गँगवर मोक्का लावला आहे. खरंतर, फड गँग असे त्या गँगचे नाव आहे.

Read Full Story

10:34 AM (IST) May 12

सेन्सेक्स-निफ्टीमध्ये जबरदस्त तेजी, शेअर बाजारात तेजीची 5 मोठी कारणे घ्या जाणून

Share Market : भारत-पाकमध्ये शांततेची हवा पसरताच शेअर बाजारात मोठी उसळी आली आहे. सोमवारी सकाळी बाजार उघडताच सेंसेक्स-निफ्टीने वेग पकडला. सेंसेक्स १७५० अंकांनी वाढून ८१२०० च्या वर आणि निफ्टी ५५० अंकांनी वाढून २४५५० पार पोहोचला. 

 

Read Full Story

10:33 AM (IST) May 12

पाकिस्तानच्या कुरघोड्यांवर अवकाशातून नजर, १० उपग्रह २४ तास होते कार्यरत, इस्रोच्या प्रमुखांची माहिती

इस्रोचे प्रमुख व्ही. नारायणन यांनी सांगितले की, देशाची सुरक्षा, ७,००० किमी लांबीच्या किनारपट्ट्यावर लक्ष ठेवण्यासाठी आणि पाकिस्तानसोबतच्या तणावाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी १० उपग्रह २४ तास कार्यरत आहेत.

Read Full Story

10:13 AM (IST) May 12

उज्जैनला दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांचा अपघात, बसची ट्रकला धडक बसल्याने 3 जणांचा मृत्यू

उज्जैनला देवदर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांच्या एका खासगी बसला भीषण अपघात झाल्याची दुर्घटना घडली आहे. यामध्ये तीन जणांचा मृत्यू झाला असून काहीजण जखमी झाले आहेत.

Read Full Story

10:00 AM (IST) May 12

भोपाळच्या एम्समध्ये शिकणाऱ्या बीडच्या वैद्यकीय विद्यार्थ्याची पुण्यात स्वतःचा गळा चिरुन आत्महत्या

भोपाळ येथील एम्समध्ये वैद्यकीय शिक्षण घेत असलेल्या बीडमधील १८ वर्षीय विद्यार्थ्याने पुण्यातील वानवडी भागात राहत्या ठिकाणी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

Read Full Story

09:53 AM (IST) May 12

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शरद पवार एकाच मंचावर येणार

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार 12 मे ला एकाच मंचावर येणार आहेत. खरंतर, राज्य सहकारी बँकेकडून यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये आयोजित करण्यात आलेल्या सहकारचे सक्षमीकरण आणि राज्य सरकारचे धोरण या मुद्दावरील चर्चेमध्ये मुख्यमंत्री आणि शरद पवार आपले मतं व्यक्त करणार आहेत. याशिवाय कार्यक्रमाला नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील सहभागी होणार आहेत.