का विकला विजय देवरकोंडाने पहिला फिल्म फेअर पुरस्कार? काय केले त्या पैश्यांचे जाणून घ्या

Published : Apr 01, 2024, 07:39 PM ISTUpdated : Apr 01, 2024, 07:40 PM IST
Vijay Devarkonda

सार

दाक्षिणात्य सुपरस्टार अभिनेता विजय देवरकोंडाने त्याला मिळालेला पहिला फिल्मफेअर पुरस्कार का विकला? हे जाणून घेऊया...

एंटरटेनमेंट डेस्क : तेलगू आणि भारतातील आघाडीचा अभिनेता विजय देवरकोंडा याने आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे. जगभरात त्याचे लाखो चाहते आहेत. विजयला त्याच्या अभिनयासाठी आजवर अनेक पुरस्कार मिळाले आहेत. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत विजयने पहिल्या पुरस्काराचा लिलाव केला असल्याचा खुलासा केला आहे.

नुकतंच तो ख़ुशी चित्रपटातून झळकला होता होता. अभिनयासाठी मिळालेल्या पहिल्या फिल्मफेअर पुरस्काराचा त्याने लिलाव केला होता, असं विजय देवरकोंडाने सांगितलं. त्याने हे पैसे दान केले होते आणि ती आयुष्यातील एक चांगली आठवण आहे, असंही तो म्हणाला. “मला प्रमाणपत्रं आणि पुरस्कारांमध्ये फारसा रस नाही. काही पुरस्कार माझ्या ऑफिसमध्ये असतील तर काही माझ्या आईने कुठेतरी ठेवले असतील. मी काही पुरस्कार दुसऱ्यांना दिले. त्यातला एक पुरस्कार मी संदीप रेड्डी वांगा यांना दिला होता,”

पुढे तो म्हणाला की, या सगळ्या गोष्टी विजयने नुकतीच दिलेल्या मुलाखतीमध्ये सांगितल्या. यामध्ये त्याने लग्न करून बाबा व्हायचं आहे, असं म्हटलं होतं. विजय रश्मिका मंदानाला डेट करत असल्याची चर्चा आहे, पण दोघांनीही याबाबत कधीच अधिकृत माहिती दिलेली नाही.

त्या पहिल्या पुरस्काराचे काय केले?

मला करिअरच्या सुरुवातीला सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून फिल्म फेअर देण्यात आला होता. पहिल्या पुरस्काराचा मी लिलाव केला होता. त्याच्यातून मला चांगले पैसे मिळाले. मला वाटते दगडाचा तुकडा घरात ठेवण्यापेक्षा ही माझ्यासाठी चांगली आठवण आहे.” विजयने मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये हे पैसे दान केले होते.

आणखी वाचा :

NMACC ने केला विक्रम , एका वर्षात दहा लाख प्रेक्षकांनी दर्शवली उपस्थिती; कलाकारांना मिळणे चांगले व्यासपीठ

साडे सहा वर्षांनी कपिल शर्माच्या शोमध्ये परतली ‘गुत्थी’; पहिल्याच एपिसोडमध्ये केली धमाल

करण जौहरच्या फ्लॅटमध्ये राहणार इमरान खान, दरमहिन्याचे भाडे ऐकून व्हाल हैराण

PREV

Recommended Stories

Dhurandhar X Review : अ‍ॅक्शन पॅक्ड, मास एंटरटेनर.. 'धुरंधर' पाहून प्रेक्षक काय म्हणाले?
सुंदर कविता आणि रचना अपूर्ण राहिल्या, हेमा मालिनी यांनी धर्मेंद्र यांच्या निधनाबद्दल केला पश्चाताप