साडे सहा वर्षांनी कपिल शर्माच्या शोमध्ये परतली ‘गुत्थी’; पहिल्याच एपिसोडमध्ये केली धमाल

Published : Mar 31, 2024, 02:57 PM ISTUpdated : Mar 31, 2024, 02:59 PM IST
Sunil Grover Birthday

सार

‘गुत्थी’ बनून प्रेक्षकांची मने जिंकणारा सुनील ग्रोव्हर यावेळी कपिलच्या शोमध्ये 'डफली'च्या भूमिकेत दिसला आहे. 

एंटरटेनमेंट डेस्क : अभिनेता-कॉमेडियन कपिल शर्माच्या 'द ग्रेट इंडियन कपिल शो'ची गेल्या काही दिवसांपासून चर्चा रंगली होती. काल अखेर प्रेक्षकांची ती प्रतीक्षा संपली असून नवाकोरा शो अखेर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. कपिल शर्मा पुन्हा एकदा 'द ग्रेट इंडियन कपिल शो'मधून छोट्या पडद्यावर परतला आहे.

यंदाच्या सीझनमध्ये तो एकटा नसून, अभिनेता सुनील ग्रोव्हरलाही पुन्हा एकदा सोबत घेऊन आला आहे. सुनील ग्रोव्हर ६ वर्षांनंतर कपिलच्या शोमध्ये परतला आहे. यामुळे आता कपिलच्या शोमध्ये प्रेक्षकांना कॉमेडीची मेजवानी मिळणार आहे.यावेळी कपिलने टीव्हीऐवजी ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सवर आपला शो ‘द ग्रेट इंडियन कपिल शो’ प्रेक्षकांच्या भेटीस आणला आहे. शोच्या पहिल्याच एपिसोडमध्ये कपिल आणि सुनीलने एकमेकांना टोमणे मारून भरपूर धमाल केल्याचे दिसून आले.

सुनील ग्रोव्हरने साकारली 'डफली' भूमिका :

पहिल्या एपिसोडमध्ये सुनील ग्रोव्हरने शानदार एन्ट्री केली. ‘गुत्थी’ बनून प्रेक्षकांची मने जिंकणारा सुनील ग्रोव्हर यावेळी कपिलच्या शोमध्ये 'डफली'च्या भूमिकेत दिसला आहे. यावेळी सुनील ग्रोव्हरला एका बॉक्समधून थेट स्टेजवर डिलीव्हर करण्यात आलं. तर, कपिल शर्माने तो बॉक्स उघडताच, त्यातून ‘डफली’ची अवतारात सुनील बाहेर आला.

पहिल्याच भागात तुफान धमाल:

यानंतर, सुनील बॉक्समधून बाहेर येताच, तो आणि कपिल जुन्या गोष्टींवरून म्हणजे त्याच्या फ्लाईटमधील वादावरून एकमेकांना विनोदी पद्धतीने टोमणे मारू लागले होते. सुनीलला पाहताच कपिल म्हणाला की, ‘अशी मुलगी मी यापूर्वी कुठेतरी पाहिली आहे, असे का वाटते?’ यानंतर ‘डफली’च्या भूमिकेतील सुनील म्हणतो की, ‘मला वाटतं की मी तुला जेवण डिलिव्हरी करताना पाहिलंय?’ हे ऐकून कपिल म्हणतो की, ‘वाह, याचा अर्थ तू झ्विगॅटोही पाहिला आहे का?’ याला उत्तर देताना ‘डफली’ म्हणते की, ‘नाही, मी तो चित्रपट पाहिलेला नाही.’ दोघांचे बोलणे ऐकून तेथे उपस्थित असलेले सर्वजण जोरजोरात हसू लागले होते.

आणखी वाचा :

करण जौहरच्या फ्लॅटमध्ये राहणार इमरान खान, दरमहिन्याचे भाडे ऐकून व्हाल हैराण

तमिळ सिनेसृष्टीतील अभिनेता डेनियल बालाजी यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

40 कोटींच्या बजेटमध्ये तयार झालेला हा चित्रपट ज्याला बनवायला 16 वर्षे लागली...वाचा सविस्तर

PREV
Entertainment News (मनोरंजन बातम्या): Get Entertainment News & Live updates in Marathi. Stay updated with Marathi Celeb gossips and Marathi Cinema news, Matahi movie trailers, reviews, and TV shows in Marathi at Asianet Marathi News.

Recommended Stories

अमिताभ बच्चन यांना दिल्ली हायकोर्टाचे समन्स, १६ नोव्हेंबरला हजर राहण्याचे आदेश
Sara Ali Khan Home : सारा अली खानच्या आलिशान घराचे खास फोटोज