क्रिकेटपटू युजवेंद्र चहलने आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र पत्नी पोटगी मागू शकत नाही, या उच्च न्यायालयाच्या निर्णयाचा स्क्रिनशॉट स्टोरीवर शेअर केला. यावर त्याने दिलेल्या कॅप्शनमुळे हा धनश्री वर्माला लावलेला टोला आहे का, अशी चर्चा सोशल मीडियावर सुरू झाली आहे.
युजवेंद्र चहल आणि धनश्री वर्मा हे कायमच चर्चांमध्ये राहत असतात. ते दोघे एकमेकांपासून वेगळं झाल्यानंतर त्यांच्याबाबतच्या बातम्या माध्यमांमध्ये झळकत असायच्या. आता परत एकदा ते दोघे चर्चेत आले आहेत.
26
युजवेंद्र चहलने धनश्रीला लावला टोला
युजवेंद्र चहल याने धनश्रीला टोला लावला आहे. त्यानं उच्च न्यायालयाच्या निर्णयाचा स्क्रिनशॉट त्याच्या स्टोरीवर लावला होता आणि त्यावरून हे वादळ उठल्याच दिसून आलं आहे.
36
स्क्रिनशॉटमध्ये काय होतं?
स्क्रिनशॉटमध्ये सरळ सरळ असं म्हटलं आहे की, ‘आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र पत्नी त्यांच्या पतींकडून पोटगी मागू शकत नाहीत.’ त्यामुळं सोशल मीडियावर या निर्णयावरून मोठ्या प्रमाणावर वाद सुरु झाले आहेत.
यावेळी स्टोरीवर युजवेंद्र याने बोलताना म्हटलं आहे की, ‘घ्या आईची शपथ, की या निर्णयावरून पलटी मारणार नाही’,असं त्याने लिहीलं. काही वेळानंतर त्यानं पोस्ट डिलीट केली पण तोपर्यंत ती सोशल मीडियावर व्हायरल झाली होती.
56
या पोस्टमुळे वादविवाद सुरु झाला
या पोस्टमुळे वादविवाद सुरु झाला आहे. ही पोस्ट धनश्री वर्मावर साधलेला निशाणा होता की कायदेशीर निर्णयाचे समर्थन ? असा सवाल अनेक जण विचारू लागले. विभक्त झाल्यानंतर पोस्ट केली आहे.
66
युजर्स काय म्हणाले?
यावर बोलताना युजर्सने आपल्या प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत. अनेकांना चहलची कमेंट म्हणजे त्यांचा चांगला ह्यूमर वाटला,काहींनी त्याचं कौतुक केले. पण काही लोकांनी त्याला सल्ला दिला. हे (घटस्फोटाचं) प्रकरण मागे सोडून तु आता पुढे जा, मूव्ह ऑन कर असा सल्ला लोकांनी दिला.