रामानंद सागर यांच्या 'रामायण' मालिकेत रामाची भूमिका साकारणारे अभिनेते अरुण गोविल हे धूम्रपान करायचे. एका चाहत्याने त्यांना सिगारेट ओढताना पाहिले आणि म्हणाला, "आम्ही तुम्हाला देव मानतो.
रामायणाला सुरुवात केल्यावर सिगारेट ओढणं केलं बंद, रामायणातील रामाच्या बाबतीत 'या' अभिनेत्यानं केला धक्कादायक दावा
रामानंद सागर यांच्या रामायण या मालिकेत अरुण गोविल यांनी रामाची भूमिका साकारून प्रचंड लोकप्रियता मिळवली होती. त्यांनी साकारलेली राम भूमिका लोकांच्या मनात आजही असल्याचं दिसून येत आहे.
27
टेलिव्हिजनवर साकारली होती रामाची भूमिका
अरुण गोविल यांनी साकारलेली भूमिका लोकप्रिय झाली असून ते घराघरात जाऊन पोहचले. अशातच आता अरुण गोविल यांची एक जुनी मुलाखत व्हायरल होतेय. या मुलाखतीमध्ये अरुण यांनी त्यांच्या सिगारेट ओढण्याच्या सवयीबद्दल सांगितलं होतं.
37
सिगारेट ओढण्याच्या सवयीबद्दल काय म्हणाले?
अरुण गोविल यांनी मुलाखत दिली त्यामध्ये त्यांनी आपलं मत व्यक्त केलं आहे. त्यावेळी बोलताना त्यांनी म्हटलं आहे की, 'मी सिगारेट ओढायचो, पार्टी करायचो. कारण, मी ज्या प्रोफेशनमध्ये होतो तिथे हे सगळं नॉर्मल होतं. पण, जेव्हा मी रामायण करायला सुरुवात केली, तेव्हा मी हे सगळं बंद केलं.
रामायण सुरु झाल्यावर सिगारेट ओढणे बंद केल्याचं अरुण यांनी यावेळी सांगितलं. मी हे सगळं बंद केलं पण लपूनछपून मी सिगारेट ओढत असायचो. यावेळी त्यांनी त्याबद्दलचा एक किस्सा शेअर केला आहे.
57
मी लपून छपून सिगारेट ओढायचो
त्यांनी यावेळी किस्सा शेअर करताना म्हटलं की, 'मी बालाजी देवाची भूमिका करत होतो, दाक्षिणात्य सिनेमामध्ये, तामिळ आणि तेलगू सिनेमा. खूप मोठा सेट होता आणि सेटच्या चारही बाजूंना पडदा लावला होता. मग मी, जेवण झाल्यांनतर एकदम कोपऱ्यात सिगारेट ओढत होतो आणि तेवढयात तिथे एक साऊथ इंडियन माणूस आला, त्याला रामला भेटायचं होतं.
67
आम्ही तुम्हाला देव मानतो आणि तुम्ही असं करता
अरुण गोविल यांना त्यांचा एक चाहता म्हणाला की, 'आम्ही तुम्हाला देव मानतो आणि तुम्ही हे असं करताय.' त्यांना तो असं बोलल्यावर त्यावेळीच लाज वाटल्याचं त्यांनी यावेळी बोलताना कबूल केलं आहे.
77
अरुण गोविल काय म्हणाले?
मला त्यावेळी स्वतःचीच लाज वाटायला लागली की, हा माणूस आपल्याबद्दल काय विचार करतोय आणि जर हा माणूस विचार करतोय तर बाकीचे पण आपल्याबद्दल विचार करत असतील. तेव्हापासून मी सिगारेट आजपर्यंत ओढली नाही'