सलमान खान: बिग बॉस १९ च्या मंचावर सलमान खानने गायक अरिजित सिंहसोबतच्या वादावर अखेर मौन सोडले आहे. आमच्यात गैरसमज झाला होता आणि आता आम्ही चांगले मित्र आहोत असे स्पष्टीकरण सलमानने दिले.
'या' कारणावरून सलमान खान आणि अरिजित सिंहचे झालं होतं भांडण, वाचून तळाची आग जाईल मस्तकात
बिग बॉस १९ च्या मंचावर सलमान खानने अरिजित सिंहबद्दल प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी विकेंड का वारमध्ये अभिनेत्याने स्पष्टीकरण दिले आहे. या वादावर तो काय बोलला ते जाणून घेऊयात.
26
बिग बॉस १९ च्या सेटवर काय झालं?
बिग बॉस १९ च्या सेटवर कॉमेडियन रवी गुप्ताने हजेरी लावली आणि त्यानं सलमानने गंमतीने बोलून गेला. तो म्हणाला की, मी अरिजितसारखा दिसतो म्हणून मला येथे यायला भीती वाटत होती. त्यावर सलमानने हसत हसत स्पष्टीकरण दिल आहे.
36
सलमान खान काय म्हणाला?
सलमान खान यावेळी बोलताना म्हणाला की, आता ते दोघे चांगले मित्र आहेत. आमच्यात गैरसमज झाला होता आणि खासकरून माझ्याकडून तो झाला होता. त्यानंतर त्यानं माझ्यासाठी गाणी गायली आहेत.
आता तो सलमानच्या कोणत्या चित्रपटासाठी गाणं लिहीत आहे?
आता अरिजित सिंह हा सलमान खानच्या बॅटल ऑफ गलवान या चित्रपटासाठी गाणे लिहीत आहे. त्यानं टायगर ३ या माझ्या चित्रपटात गाणं लिहिलं होतं.
56
दोघांमध्ये नेमकं काय झालं होतं?
अरिजित सिंह आणि सलमान खान या दोघांमध्ये नेमकं काय झालं होत हे अनेकांना अजूनही माहिती नाही. २०१४ मध्ये फ्री प्रेस जर्नलच्या कार्यक्रमात एक किस्सा घडला होता.
66
सलमान खान अरिजितला काय म्हणाला?
सलमान खान अरिजित सिंहसोबत बोलत होता. यावेळी अरिजित सलमानने तू झोपेत होतास का असं विचारलं होतं. त्यावर अरिजितने तुम्ही लोकांनी मला झोपवलं होत असं म्हटलं होत. हे उत्तर सलमानला आवडलं नव्हतं.