रितेश देशमुख: मराठी अभिनेते विद्याधर जोशी हे फुफ्फुसांच्या गंभीर आजारातून बरे झाले आहेत. या कठीण काळात 'वेड' चित्रपटाचा दिग्दर्शक आणि अभिनेता रितेश देशमुख त्यांच्या पाठीशी उभा राहिला.
हा माणूस माझ्याकरता खूप महत्वाचा, त्याला काही झालं तर... रितेश देशमुखसाठी 'हा' अभिनेता खूप जिवाभावाचा
आपल्या टीव्ही मालिका आणि सिनेमांमध्ये उत्तम अभिनयासाठी रितेश देशमुखला खासकरून ओळखलं जात. त्याच्या अभिनयाने तो चित्रपट खऱ्या अर्थाने खुलवण्याचं काम करत असतो. मराठी सिनेसृष्टीतील अभिनेते विद्याधर जोशी हे नुकतेच मोठ्या आजारातून बरे झाले.
26
आठ दहा महिन्यांच्या संघर्षानंतर कामाला केली सुरुवात
विद्याधर जोशी हे आठ दहा महिन्यांच्या संघर्षानंतर त्यांनी पुन्हा कामाला सुरुवात केली आहे. त्यांना दोन वेळा कोरोनाने ग्रासलं होतं. पण जेव्हा ताप बरा होत नव्हता तेव्हा सिटीस्कॅन केल्यावर समजलं की फुफ्फुसांमध्येच जखम झाली आहे.
36
फुप्फुस केली होती रिकामी
विद्याधर यांचे फुप्फुस रिकामी झाली होती. त्यांच्यावर लंग्स ट्रान्सप्लांट करण्यात आलं. हे ऑपरेशन खूप खर्चिक होतं, पण घरच्यांनी साथ दिल्यामुळं ते शक्य झालं आहे.
विद्याधर जोशी यांनी रितेश आणि जेनेलियासोबत केलं होत काम
विद्याधर जोशी यांनी रितेश देशमुख आणि जेनेलिया देशमुख यांच्यासोबत वेड या चित्रपटात काम केलं होत. त्यामुळे रितेश साठी विद्याधर फार महत्त्वाचे होते. अमोल परचुरेंना नुकत्याच दिलेल्या मुलाखतीमध्ये विद्याधर जोशी यांनी रितेश देशमुखची त्यांच्यासाठीची धडपड सांगितली.
56
विद्याधर जोशी काय म्हणाले?
विद्याधर जोशी यांनी रितेश देशमुख आणि जेनेलिया देशमुख यांच्यासोबत वेड या चित्रपटात काम केलं होत. त्यामुळे रितेश साठी विद्याधर फार महत्त्वाचे होते. अमोल परचुरेंना नुकत्याच दिलेल्या मुलाखतीमध्ये विद्याधर जोशी यांनी रितेश देशमुखची त्यांच्यासाठीची धडपड सांगितली.
66
तो माझ्या बायकोशी संपर्क ठेवून होता
"माझ्या बायकोशी तो संपर्क ठेवून होता. आणि त्याच्या पलीकडे जाऊन रिलायन्सच्या इंटेन्सिव्ह केअर युनिटमध्ये तुम्हाला स्वतःचा म्हणजे आपला मोबाईल सुद्धा घेऊन जाता येत नाही त्या तिथे त्याने हॉस्पिटलवाल्यांची खास परवानगी काढून त्याने आत मध्ये मला वेड पिक्चर दाखवला.