बॉलिवूड अभिनेत्री रवीना टंडन तिच्या 'नो किसिंग सीन' पॉलिसीसाठी ओळखली जाते. तिच्या कारकिर्दीत एकदा चुकून एका सह-कलाकारासोबत किसिंग सीन घडला होता, ज्यामुळे तिला इतका त्रास झाला की तिला मळमळ होऊन उलट्या झाल्या.
'या' प्रसिद्ध अभिनेत्रीने किस न करण्याचा का घेतला निर्णय, किस्सा जाणून घेतल्यावर अंगावर येईल काटा
सिनेमा म्हटलं की त्याला कायमच मोठ्या प्रमाणावर प्रसिद्धी मिळत असते. वेगवेगळ्या गोष्टी काल्पनिक पडद्यावर दाखवत असले तरी त्या खऱ्या असतातच असं नाही. या सिनेमात काम करणाऱ्या कलाकारांचे किस्से फिल्मी असतात.
27
एका बॉलिवूड अभिनेत्रीसोबत काय घडले?
एका बॉलिवूड अभिनेत्रीसोबत असाच एक किस्सा घडला. ही अभिनेत्री नेहमीच पडद्यावर लिप-लॉक सीन्स टाळत असे, परंतु तिने चुकून तिच्या सह-कलाकाराचे चुंबन घेतले होते.
37
ती अभिनेत्री रविना टंडन
ती अभिनेत्री दुसरी तिसरी कोण नसून रविना टंडन ही आहे. ती आज तिचा ५३ वा वाढदिवस साजरा करत असून आपण तिच्याबद्दलचा किस्सा जाणून घेऊयात. तिने कारकिर्दीच्या सुरुवातीपासून एक अनोखा निर्णय घेतला होता.
कारकिर्दीच्या सुरुवातीपासून किस न करण्याचा घेतला होता निर्णय
तिने तिच्या कारकिर्दीच्या सुरुवातीपासून किस न करण्याचा निर्णय घेतला होता. तिच्या नो किसिंग सीन पॉलिसीचे कारण विचारले असता, तिने एक आश्चर्यकारक गोष्ट सांगितली.
57
चुकून एकमेकांच्या ओठांना झाला होता स्पर्श
रवीना टंडनने पूर्वी नो किसिंग पॉलिसीबद्दल सांगितले होते, "त्या काळात कोणतेही करार किंवा काहीही नव्हते. पण मी ते कधीच केले नाही. मी त्यात कम्फर्टेबल नव्हते.
67
अभिनेत्याने केला ओठांना स्पर्श आणि...
अभिनेत्याने चुकून ओठांना स्पर्श केला आणि त्यानंतर रविनाला मळमळ व्हायला सुरुवात झाली. "मी माझ्या खोलीत गेली आणि मला उलट्या झाल्या कारण मी त्यात कम्फर्टेबल नव्हते. शॉट संपला आणि मी वरच्या मजल्यावर गेले आणि मला मळमळ होत होती.
77
अभिनेत्याने मागितली माफी
अभिनेत्याने यावेळी रविना टंडन हिची माफी मागितली. मला ते सहन झाले नाही. मला दात घासावे आणि शंभर वेळा तोंड स्वच्छ धुवावेसे वाटले. त्यामुळं या घटनेची इंडस्ट्रीत मोठ्या प्रमाणावर चर्चा होताना दिसत आहे.