अभिनेता गोविंदा आणि पत्नी सुनीता आहुजा यांच्या नात्यात एकेकाळी घटस्फोटापर्यंतची वेळ आली होती. सुनीताच्या श्रीमंत वडिलांचा आणि आजोबांचा या लग्नाला विरोध होता, कारण गोविंदा त्यावेळी एक स्ट्रगलिंग अभिनेता होता.
गोविंदाची बायको सुनीता लहान मुलासारखी लागली वागायला, अभिनेत्यानं घेतला तोंडावर हात मारून
अभिनेता गोविंदा आणि सुनीता आहुजा हे अनेकदा कोणत्या न कोणत्या कारणाने चर्चेत राहत असतात. गोविंदा आणि त्याची पत्नी सुनीता हे दोघे घटस्फोट घेणार होते अशा चर्चा सुरु झाल्या होत्या.
26
सुनीताचे वडील होते नाखूष
सुनीताचे वडील या नात्यावर नाखूष असल्याचं दिसून आलं. सुनीताने यावेळी सांगितलं की, तिचे आजोबा गोविंदा आणि सुनीता यांच्या लग्नाला उपस्थितही नव्हते. यावेळी सुनीताने सगळे अनुभव शेअर केले आहेत.
36
गोविंदाची मुलगी टीना काय म्हणाली?
गोविंदाची मुलगी टीना बोलली की, 'माझी आई हॉट पँट घालायची. ती पाली हिलमध्ये राहत होती. ती एका श्रीमंत घराण्यातून आली होती. माझे वडील इतके श्रीमंत नव्हते. माझे वडील स्ट्रगल करायचे तर आजोबा खूप श्रीमंत होते.
माझे आजोबा या लग्नाबद्दल खुश नव्हते. ते आई वडिलांच्या लग्नाला उपस्थित राहिले नाही. गोविंदा हा 'टू मच विथ काजोल अँड ट्विंकल खन्ना' या शोमध्ये काही दिवसांपूर्वीच आला होत्या, त्यावेळी त्यानं बायकोबद्दल आपलं मत व्यक्त केलं.
56
सुनीता एखाद्या मुलासारखी आहे
सुनीता ही माझ्या घरात मुलासारखी आहे. माझी मुलं तिच्यासोबत लहान मुलासारखी वागतात. पण ती तिच्या जबाबदाऱ्या खूप चांगल्या प्रकारे पार पाडते. ती संपूर्ण घर सांभाळते. ती एक प्रामाणिक मुलगी आहे.
66
पुरुष अशापद्धतीने विचार करू शकत नाही
पुरुष अशापद्धतीने विचार करू शकत नाही असं यावेळी गोविंदाने म्हटलं आहे. तो पुढं सांगतो की, पुरुष जर घर चालवत असतील तर महिला संपूर्ण जग चालवतात. सुनीताने खूप चुका केल्या. तिला आणि तिच्या कुटुंबीयांना मी अनेकदा माफही केलं आहे. तुमची आई नसते तेव्हा तुम्ही बायकोवर जास्त अवलंबून असता आणि तुमची पत्नीदेखील काही वेळाने आईसारखंच तुम्हाला समजावते आणि तुम्हाला ओरडतेही'