महेश मांजरेकर यांच्या 'पुन्हा शिवाजीराजे भोसले' या आगामी चित्रपटाविरोधात मुंबई उच्च न्यायालयात दावा दाखल करण्यात आला आहे. या दाव्यात कराराचे आणि कॉपीराइट उल्लंघनाचे गंभीर आरोप आहेत.
छत्रपती शिवाजी महाराज 1680 नंतर पुन्हा एकदा महाराष्ट्रभूमीवर अवतरणार, 'या' दिग्दर्शकाने अशी काय जादू केली?
महेश मांजरेकर यांच्या पुन्हा शिवाजीराजे भोसले या चित्रपटावरून वाद निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या चित्रपटाच्या निर्मात्यांविरोधात आणि दिग्दर्शक मांजरेकरांच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात दावा दाखल केला आहे.
26
कोणते आरोप करण्यात आले?
या दाव्यात बंधनकारक कराराचं उल्लंघन, कॉपीराइट्सचं उल्लंघन आणि जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केल्याच गंभीर आरोप करण्यात आला आहे. या आरोपांवर महेश मांजरेकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
36
महेश मांजरेकर काय म्हणाले?
यावेळी या आरोपांवर महेश मांजरेकर यांनी म्हटलं आहे की, “‘पुन्हा शिवाजीराजे भोसले’ हा आमचा चित्रपट केवळ एक ऐतिहासिक कथा नाही, तर ती महाराष्ट्राच्या आत्म्याला स्पर्श करणारी भावना आहे. या चित्रपटाचा कोणत्याही पूर्वी प्रदर्शित झालेल्या चित्रपटाशी थेट किंवा अप्रत्यक्ष संबंध नाही. हा सीक्वेल, प्रीक्वेल किंवा दुसरा भाग नाही. हा चित्रपट पूर्णपणे स्वतंत्र, मौलिक आणि आमच्या मनातून, आमच्या श्रद्धेतून जन्माला आलेला आहे,”
आम्ही हे सर्व आमच्या प्रसिद्धी उपक्रमांमधून, माध्यमांमधून आणि संवादातून स्पष्टपणे सांगितलं आहे. मराठी प्रेक्षक हे सुजाण, जाणकार आणि संवेदनशील आहेत. इतिहासाविषयी त्यांचं प्रेम आणि अभिमान आम्हालाही प्रेरणा देतो. त्यामुळं प्रेक्षकांची दिशाभूल केली जाणार नाही.
56
छत्रपती शिवाजी महाराज परत महाराष्ट्रभूमीवर अवतरणार
छत्रपती शिवाजी महाराज 1680 नंतर पुन्हा एकदा या पवित्र महाराष्ट्रभूमीवर अवतरतात. ही केवळ कल्पना नाही, तर प्रत्येक मराठी माणसाच्या अंतःकरणात पेटलेली एक ज्वाला आहे.
66
छत्रपती शिवाजी महाराज आमचे प्रेरणास्थान, आमचा अभिमान आणि आमचा श्वास
छत्रपती आमच्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ ऐतिहासिक व्यक्तिमत्त्व नाहीत, ते आमचे प्रेरणास्थान, आमचा अभिमान आणि आमचा श्वास आहेत. त्यांच्या पराक्रमाची गाथा, त्यांच्या विचारांचा वारसा आणि त्यांच्या नेतृत्वाची जाणीव आजच्या पिढीपर्यंत पोहोचवणे हे आमचं कर्तव्य आणि सौभाग्य आहे.” असं मांजरेकर यांनी म्हटलं आहे.