धर्मेंद्र यांची मुलगी ईशाचा 'या' कारणामुळं झाला घटस्फोट, वाचून म्हणाल बरं झालं लवकर समजलं

Published : Nov 11, 2025, 11:45 AM IST

अभिनेत्री ईशा देओल पती भरत तख्तानीसोबत घटस्फोट घेतल्यामुळे चर्चेत आहे. घटस्फोटानंतर तिने प्रेमाबद्दल तिचे मत व्यक्त केले असून, ती सध्या तिच्या दोन मुलींचा सांभाळ करत आहे. नुकतेच तिने वडील धर्मेंद्र यांच्याबद्दलच्या अफवांवरही स्पष्टीकरण दिले.

PREV
16
धर्मेंद्र यांची मुलगी ईशाचा 'या' कारणामुळं झाला घटस्फोट, वाचून म्हणाल बरं झालं लवकर समजलं

धर्मेंद्र यांच्या मृत्यूच्या अफवा असून माझे वडील व्यवस्थित असल्याची इंस्टाग्राम पोस्ट ईशा देओलने टाकली आणि ती माध्यमांमध्ये चर्चेत आली. ती काही महिन्यांपूर्वीच घटस्फोटाच्या बातम्यांवरून चर्चेत आली होती.

26
अभिनेत्री ईशा देओल घटस्फोटावरून आली होती चर्चेत

अभिनेत्री ईशा देओल घटस्फोटावरून चर्चेत आली होती. १२ वर्षाचा संसार झाल्यानंतर ईशाने भरत तख्तानीसोबत घटस्फोट घेतला होता. घटस्फोटानंतर ईशा मुलींचा सांभाळ करत असून भरतच्या आयुष्यात एका मुलीची इंट्री झाली आहे.

36
ईशा काय म्हणाली होती?

यावेळी बोलताना ईशाने तिचं प्रेमाबद्दलच मत व्यक्त केलं होतं. तिनं म्हटलं होतं, ‘मी कायम प्रेमावर विश्वास ठेवला आहे. आयुष्यात प्रेम केलं पाहिजे… पण आयुष्यात प्रेम आणि सोबत कायम असली पाहिजे… पण सर्वकाही आयुष्यात मिळत नाही..’

46
मुलींबद्दल केलं होतं वक्तव्य

मुलींबद्दल ईशा देओल हिने वक्तव्य केलं होतं. तिने म्हटलं होतं की, ‘बॉलिवूडमध्ये माझ्या मुली पदार्पण करतील की नाही मला माहिती नाही. कारण त्या लहान आहेत आणि शिकत आहेत. त्यांना त्यांच्या आजीच्या गाण्यांवर डान्स करायला प्रचंड आवडतं. दोघी ‘धूम मचाले’ आणि ‘दिलबरा’ गाण्यावर डान्स करत असतात. मोठ्या मुलीला माझ्या आईचं ‘भूत राजा बाहर आजा’ हे गाणं प्रचंड आवडतं. ईशा सोशल मीडियावर देखील मुलींसोबत फोटो पोस्ट करत असते.

56
ईशा आणि भरत यांचं कधी झालं लग्न?

अनेक वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर भरत आणि ईशा यांनी घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला. 2 मुलींच्या जन्मानंतर ईशा आणि भरत विभक्त झाले. पण घटस्फोटाच्या जवळपास 18 महिन्यांनंतर भरत याने दुसऱ्या प्रेमाची कबुली दिली आहे.

66
ईशा सोशल मीडियावर असते सक्रिय

ईशा सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर तिला फॉलो करणाऱ्या चाहत्यांची संख्या मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते.

Read more Photos on

Recommended Stories