Rashmika Mandanna Vijay Deverkonda: रश्मीका मंदाना आणि विजय देवरकोंडा यांच्या साखरपुड्याच्या चर्चेदरम्यान, त्यांच्या संपत्तीची तुलना केली जात आहे. विजयची संपत्ती ५० ते ७० कोटींच्या घरात आहे, तर रश्मीकाची एकूण संपत्ती ६६ कोटी आहे.
रश्मीका मंदाना आणि विजय देवरकोंडा यांचा साखरपुडा झाल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली. त्यानंतर दोघांबद्दल अनेक गोष्टी सोशल मीडियावर व्हायरल व्हायला सुरुवात झाली. त्यामध्ये आपण आता दोघांच्या संपत्तीबद्दल जाणून घेऊयात.
26
रश्मीका आणि विजय दोघांच्यात कोण जास्त श्रीमंत?
रश्मीका आणि विजय या दोघांच्यात कोण जास्त श्रीमंत आहे याबद्दलची माहिती सोशल मीडियावर विचारायला सुरुवात झाली. एका जवळच्या कार्यक्रमात दोघांनी साखरपुडा केल्याची बातमी व्हायरल झाली आहे.
36
विजयकडे लक्झरी कारचे कलेक्शन
विजयकडे लक्झरी कारचे कलेक्शन आहे. त्यांच्या कलेक्शनमध्ये बीएमडब्ल्यू 5 सिरीजचा समावेश आहे ज्याची किंमत 61-48 लाख रुपये आहे. याशिवाय, त्याच्याकडे 75 लाख रुपयांची फोर्ड मस्टँग,85 लाख रुपयांची व्होल्वो एक्ससी90 आणि 64 लाख रुपयांची रेंज रोव्हर आहे.
विजयची संपत्ती ही ५० ते ७० कोटींच्या दरम्यान असल्याची माहिती देण्यात आली आहे. अभिनेत्याच्या चित्रपटांमधून फॅशन लेबल राऊडी क्लब आणि व्हॉलीबॉल संघाची मालकी याचा समावेश होतो. तो अनेक ब्रँड डील्समधून पैसे कमवतो.
56
रश्मीकाची एकूण संपत्ती ६६ कोटींची
रश्मीका मंदानाची एकूण संपत्ती ६६ कोटींची आहे. ती तिच्या प्रत्येक चित्रपटासाठी ५ ते ८ कोटींच्या दरम्यान पैसे घेत असल्याची माहिती देण्यात आली आहे. पुष्पा २ मध्ये कामासाठी तिला १० कोटी रुपये मिळाले.
66
ब्रँड प्रमोशनमधून कमावते चांगले पैसे
रश्मीका ही ब्रँड प्रमोशनमधून चांगले पैसे कमावते, यामध्ये खासकरून बोट, कल्याण ज्वेलर्स, 7अप आणि मीशो सारख्या ब्रँडचा समावेश होतो. रश्मिका मंदाना हिची रिअल इस्टेटमध्ये चांगली पकड आहे, ज्यामध्ये मुंबई, हैदराबाद, गोवा आणि कूर्गमधील घरांचा समावेश आहे.