पुण्यात गौतमी पाटीलच्या कारने एका रिक्षाला धडक दिल्याने भीषण अपघात झाला, ज्यात रिक्षाचालक गंभीर जखमी झाला. या प्रकरणी गौतमी पाटीलला अटक करण्याची मागणी जोर धरत असून, पोलीस आणि गौतमीवर गंभीर आरोप केले जात आहेत.
गौतमी पाटीलने महाराष्ट्राचा बिहार केला, 'या' प्रसिद्ध अभिनेत्याच्या वक्तव्याने उडाली खळबळ
गौतमी पाटीलच्या कारचा पुण्यात भीषण अपघात झाला. तिच्या गाडीने एका रिक्षाचालकाला धडक दिली आणि त्यात तो जखमी झाला होता. यावेळी कारमध्ये गौतमी पाटील उपस्थित नव्हती.
26
गौतमीला अटक करण्याची केली जातेय मागणी
गौतमी पाटीलला या अपघाताला जबाबदार धरून अटक करण्यात यावी अशी मागणी करण्यात येत आहे. अपघात झाला त्या ठिकाणचा सीसीटीव्ही रेकॉर्डिंग पोलिसांकडून मागितलं जात आहे.
36
अपघात कसा झाला?
३० सप्टेंबर रोजी रिक्षाचालक रिक्षाची वाट पाहत उभा होता. त्यावेळी अचानक मागून एक कार आली आणि रिक्षाला ठोकून पुढं निघून गेली. ही धडक एवढी भयानक होती की त्यानंतर रिक्षाच्या तीन पलटी झाल्या. त्यानंतर रिक्षाचालकाला गंभीर दुखापत झाली.
ही घटना घडल्यानंतर रिक्षाचालकांच्या नातेवाईकांनी सिंहगड पोलीस ठाण्यात झालेला किस्सा सांगितला. त्यानंतर पोलिसांनी टोईंगच्या मदतीने गौतमीच्या गाडीला घेऊन गेले पण रिक्षाचालकाकडे साधं लक्ष देण्यात आलं नाही.
56
अभिनेता पवन चौरे काय म्हणतो?
“गौतमी पाटील तू महाराष्ट्राचा बिहार केलाच आहे. मग तु काय गोरगरीब जनतेला ही त्रास द्यायचा ठेका घेतलाय का ?….तुझी कार एका रिक्षाला उडवते आणि तिथून तू पळून जातेस , परत तुझ्या गाडीत कोण कोण होत हे ही तुलाच माहीत.
66
पोलीस सहभागी असल्याचा केला दावा
पोलीस या घटनेत सहभागी असल्याचा दावा यावेळी अभिनेत्याने केला आहे. पवन चौरे व मुळशी येथील रहिवाशांनी सिंहगड पोलीस स्टेशनच्या बाहेर ठिय्या आंदोलन केलं होतं. गौतमी पाटील जोपर्यंत येत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील असं सांगण्यात आलं आहे.