प्राजक्ता माळीचं आईनं ठेवलं होत दुसरंच नाव, नंतर दारातल्या 'या' गोष्टीवरून नाव पडलं प्राजक्ता

Published : Oct 04, 2025, 11:28 AM IST

लोकप्रिय अभिनेत्री प्राजक्ता माळीच्या नावाची एक खास गोष्ट समोर आली आहे. तिच्या आईला तिचे नाव अभिनेत्री लीना चंदावरकर यांच्यावरून 'लीना' ठेवायचे होते, पण एका कारणामुळे ते शक्य झाले नाही. 

PREV
16
प्राजक्ता माळीचं आईनं ठेवलं होत दुसरंच नाव, नंतर दारातल्या 'या' गोष्टीवरून नाव कस पडलं?

प्राजक्ता माळी हि मराठी सिनेसृष्टीतील एक लोकप्रिय अभिनेत्री आहे. ती कायमच कोणत्या न कोणत्या मुद्यावरून चर्चेत राहत असते. आता परत एकदा नावावरून ती चर्चेत आली आहे.

26
प्राजक्ता माळी लोकप्रिय अभिनेत्री

मराठी सिनेमासृष्टीतील अभिनेत्री प्राजक्ता माळी कायमच चर्चांमध्ये राहत असते. तिने ‘रानबाजार’, ‘फुलवंती’, ‘हंपी’, ‘चंद्रमुखी’ यासारख्या चित्रपटांमध्ये दमदार भूमिका निभावल्या आहेत. तिने सिनेमांमध्ये नाही तर मालिकांमध्ये काम केलं आहे.

36
तीच नाव प्राजक्ता कसं पडलं?

प्राजक्ताचे नाव तिची आई लीना ठरवणार होती, पण तीच नाव प्राजक्ता कसं पडलं याबद्दलची माहिती जाणून घेऊयात. ती म्हणाली की, आईच आणि माझं नातं फार जवळच आहे. माझी आई माझ्यापेक्षा दहापट एनर्जेंटीक आणि जिद्दी आहे… माझ्या आईला माझं नाव लीना ठेवायचं होतं…

46
माझ्या आईला लीना नावाची अभिनेत्री आवडायची

माझ्या आईला … माझ्या आईला माझं नाव लीना ठेवायचं होतं… कारण माझ्या आईला लीना चंदावरकर नावाची अभिनेत्री प्रचंड आवडायची… मी तिच्यासारखीच दिसते… असं आईचं म्हणणं होतं… त्यामुळे माझ्या आईला माझं नाव लीना ठेवायचं होतं…’

56
प्राजक्ता पुढे काय म्हणाली?

आम्ही राहत असलेल्या पोलीस लाईनमध्ये एका मुलीचा जन्म झाला आणि तीच नाव लीना ठेवलं. त्यामुळे माझी आई प्रचंड चिडली, तिला माझं नाव लीना ठेवायचं होतं. त्यानंतर माझं नाव काय ठेवायचं यावर विचार सुरु झाला.

66
आमच्या दारात प्राजक्ताचा सडा पडायचा

आमच्या दारात त्यावेळी प्राजक्ताचा सडा पडायचा, त्यामुळे माझ्या आईने माझं नाव प्राजक्ता ठेवलं. मला घरी सोनी म्हणतात असं तिने यावेळी सांगितलं. प्राजक्ता तिच्या खाजगी आयुष्यातील अनेक गोष्टी शेअर करत असते.

Read more Photos on

Recommended Stories