महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यांना दिला अतिवृष्टीचा इशारा, नदीकाठच्या नागरिकांचा संसार जाणार मोडून

Published : Oct 29, 2025, 12:49 PM IST

दिवाळीपासून राज्यात पाऊस सक्रिय झाला असून, मुंबईतही पावसाने हजेरी लावली आहे. हवामान विभागाने मुंबईसाठी येलो अलर्ट, तर विदर्भातील चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया आणि यवतमाळ या जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.

PREV
16
महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यांना दिला अतिवृष्टीचा इशारा, नदीकाठच्या नागरिकांचा संसार जाणार मोडून

राज्यात दिवाळीपासून पाऊस सक्रिय झाल्याचं दिसून आलं आहे. राजधानी मुंबईत पावसाने हजेरी लावली असून शहरातील विविध भागांमध्ये त्यानं चांगली हजेरी लावली आहे. त्यामुळं कामावर जाणाऱ्या नोकरदार लोकांची तारांबळ उडाली आहे.

26
सकाळची सुरुवात झाली आल्हाददायक

सकाळची सुरुवात थंड वातावरणात झाली. मुंबई आणि आसपासच्या जिल्ह्यांमध्ये आज पुन्हा पावसाच्या हलक्या सरी बरसतील असं हवामान विभागाच्या वतीने सांगण्यात आलं आहे. त्यामुळं येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

36
आकाश ढगाळ राहणार

आज दुपारनंतर आकाश ढगाळ राहण्याची शक्यता असून, मुंबईसह आसपासच्या जिल्ह्यांतील काही भागांमध्ये पाऊस कोसळण्याची शक्यता आहे.

46
तापमान किती राहणार?

हवामान विभागाच्या ताज्या अंदाजानुसार, मुंबईत कमाल तापमान 33 अंश सेल्सिअसच्या आसपास राहील, तर किमान तापमान 25 अंश सेल्सिअसपर्यंत खाली येऊ शकते.

56
उष्ण्ता झाली कमी

मुंबईत पावसाने उष्णता कमी झाली असून वातावरण थंडावा तयार झाली आहे. तर गेल्या काही आठवड्यांपासून हवेची गुणवत्ता खालावली होती. वाऱ्याची गती कमी असल्याने आणि दिवाळी काळात झालेल्या प्रदूषणामुळे ही समस्या निर्माण झाली होती.

66
कोणत्या जिल्ह्यात पाऊस पडणार?

महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया आणि यवतमाळ या विदर्भातील चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून राज्यातील उर्वरित जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

Read more Photos on

Recommended Stories