अभिनेत्री रेणुका शहाणे यांनी नुकताच एक धक्कादायक खुलासा केला आहे, ज्यात एका विवाहित निर्मात्याने त्यांना सोबत राहण्यासाठी पगाराची ऑफर दिली होती. त्यांनी ही ऑफर नाकारली आणि चित्रपटसृष्टीतील अभिनेत्रींच्या सुरक्षेच्या मुद्द्यावरही भाष्य केले.
लग्न झालं तरीही माझ्यासोबत राहा, मी पगार देतो; 'या' निर्मात्याच्या मागणीने रेणुका यांना फुटला दरदरून घाम
अभिनेत्री रेणुका शहाणे या कायमच माध्यमांच्या चर्चांमध्ये राहत असतात. आपण त्यांच्याबद्दलच्या अनेक गोष्टी सोशल मीडियामधून ऐकल्या असतील. त्यांची सर्कस या मालिकेतील भूमिका सर्वात जास्त गाजली होती.
26
आता अभिनेत्री परत एकदा आली चर्चेत
आता परत एकदा अभिनेत्री चर्चेत आली आहे. तिने केलेल्या वक्तव्यामुळे ती माध्यमांमध्ये झळकताना दिसून येत आहे. त्यांनी एका निर्मात्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं आहे.
36
रेणुका शहाणे यांना काय आला अनुभव?
रेणुका शहाणे यांना अतिशय वाईट अनुभव आला. त्यांना एका निर्मात्याने माझं लग्न झालं आहे, तू माझ्यासोबत राहा तुला चांगला पगार देतो अशी ऑफर दिली होती. त्यांनी ही ऑफर नाकारली.
निर्मात्याचा लग्न झालं होतं असं यावेळी बोलताना रेणुका यांनी सांगितलं आहे. हे ऐकून मी आणि माझी आई दोघेही आश्चर्यचकित झालो.” हे ऐकून दोघीही चकित झाल्याचं रेणुकाने सांगितलं आहे.
56
ऑफर नाकारल्यावर झाला होता त्रास
ऑफर नाकारल्यावर अनेक जणींना मोठ्या प्रमाणावर त्रास जाणवला. त्यांना अनेक ठिकाणी प्रोजेक्ट भेटले नाही किंवा पैसे मिळाले नाहीत असं त्यांनी यावेळी बोलताना सांगितलं आहे.
66
सुरक्षेसाठी घेतली मोठी जबाबदारी
सुरक्षेसाठी मोठ्या प्रमाणावर खबरदारी घेतल्याचं यावेळी रेणुका यांनी बोलताना म्हटलं आहे. “रवीना मला म्हणाली की जेव्हा जेव्हा ती बाहेरच्या शूटिंगला जायची तेव्हा तिला आणि तिच्या टीमला दररोज हॉटेलच्या खोल्या बदलाव्या लागत होत्या जेणेकरून ती कोणत्या खोलीत राहत आहे हे कोणालाही कळू नये. रात्रीच्या वेळी कोणत्याही व्यक्तींनी त्रास देऊ नये म्हणून हे केले गेले.”