सुरज चव्हाणच्या बायकोचा फोटो आणि नाव वाचलं का, पाहून म्हणाल अप्सराच मिळाली!

Published : Nov 10, 2025, 12:35 PM IST

बिग बॉस मराठी ५ चा विजेता सूरज चव्हाण लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे. त्याचा विवाहसोहळा २९ नोव्हेंबर रोजी पुण्याजवळील जेजुरी येथे होणार असून, त्याची होणारी पत्नी संजनाला तो लहानपणापासून ओळखतो. 

PREV
16
सुरज चव्हाणच्या बायकोचा फोटो आणि नाव वाचलं का, पाहून म्हणाल अप्सराच मिळाली!

बिग बॉस मराठी ५च्या ट्रॉफीवर सुरज चव्हाणने आपलं नाव कोरलं. त्यानंतर तो माध्यमांमध्ये कायम चर्चेत राहिला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्याला घर बांधून दिलं.

26
सगळ्या महाराष्ट्राने सुरज चव्हाणला घेतलं डोक्यावर

सगळ्या महाराष्ट्राने सुरज चव्हाणला डोक्यावर घेतलं. अशातच गेल्या काही दिवसांपासून 'सूरज लग्न कधी करणार?' या चर्चा रंगलेल्या. अशातच आता याचं उत्तर सर्वांना मिळालंय. झापुक झुपूक स्टार सूरज चव्हाणची सध्या लगीनघाई सुरू आहे.

36
सुरजच्या पत्नीचा चेहरा आणि नाव आलं समोर

सुरजच्या पत्नीचा चेहरा आणि नाव समोर आलं आहे. त्यामुळे आता चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. कोकण हर्टेड गर्ल अंकिता वालावलकर हिने खुलासा केला आहे.

46
अंकिता काय म्हणाली?

अंकिता यावेळी बोलताना म्हणाली की, सूरज चव्हाणचा लग्नसोहळा 29 नोव्हेंबर रोजी पार पडणार आहे. त्यांचा हा पारंपरिक विवाह सोहळा पुण्याजवळील जेजूरी, सासवड इथे होणार आहे. लग्नाच्या मुख्य समारंभापूर्वीचे विधी 28 नोव्हेंबरपासून सुरू होणार आहेत. या समारंभात हळद, मेहंदी आणि संगीत यांसारखे पारंपरिक समारंभ पार पडतील.

56
घरी केळवण घातलं जेवण

गंमत म्हणजे, सूरज आणि संजनाचं अरेंज मॅरेज नसून लव्ह मॅरेज आहे. सूरज आणि संजना एकमेकांना लहानपणापासून ओळखतात. काही दिवसांपूर्वीच अंकितानं सूरज आणि संजयनाचं तिच्या घरी 'केळवण' केलं आणि दोघांना भेटवस्तूही दिल्यात. त

66
दोघांनाही लग्नाची खरेदी करायला केली मदत

दोघांना लग्नाची खरेदी करायला अंकिताने मदत केली. या खास व्लॉग अंकितानं तिच्या चॅनलवर शेअर केलाय.

Read more Photos on

Recommended Stories