कर्माची शिक्षा आठवली म्हणून रामरक्षा म्हटले, उपमुख्यमंत्री शिंदे यांनी ठाकरेंना केलं टार्गेट

Published : Jul 10, 2026, 08:15 PM IST
uddhav Thackeray

सार

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शरद पवार यांची भेट घेतल्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले. ही भेट बेळगाव प्रश्नासंदर्भात होती असे स्पष्टीकरण शिंदे यांनी दिले. तसेच, या भेटीवरून टीका करणाऱ्यांना आणि आपल्यात व देवेंद्रजींमध्ये भांडण लावण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना त्यांनी प्रत्युत्तर दिले.

सध्याच्या घडीला राजकारणात एकमेकांवर टीका केली जाते. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शरद पवार यांची भेट घेतली. त्यानंतर संजय राऊत यांनी पवारांवर टीका केली होती. त्यानंतर जितेंद्र आव्हाड यांनी पक्षाच्या वतीने स्पष्टीकरण दिलं. शिंदे यांनी किती मिरच्या आणि जाळ लागला असं म्हटलं आणि परत त्यावर चर्चा सुरु झाल्या.

पवार साहेब बेळगाव प्रश्नी बैठकीला आले होते 

शरद पवार हे बेळगाव प्रश्नी बैठकीला आले होते. त्यावेळी ते माझ्या केबिनमध्ये आले. हे मला वर असताना समजलं, त्यावेळी मी कॅबिनेटमध्ये आलो होतो. त्यानंतर ते आल्याचं मला समजलं, मी तिथं गेलो. तिथं गेल्यानंतर त्यांना श्रीफळ आणि शाल देऊन सत्कार केला. त्यानंतर देवेन्द्रजी आणि माझ्यात भांडण लावण्याचा प्रयत्न केला असं शिंदे यांनी म्हटलं आहे.

जो रामाचा झाला नाही तो कोणाचाच होणार नाही 

जो रामाचा झाला नाही तो कोणाचा होणार नाही. कर्माची शिक्षा आठवली म्हणून रामरक्षा म्हणायला लागले. काही लोकांनी नवीन शोध लावलाय कि हनुमान मशालीच्या लंका जाळली. आता त्यांच्या पक्षाची निशाणी जर लायटर असते तर त्यानं जाळलं असं म्हटलं असत. उद्धवजी दादांना भेटून आले होते पण त्याचा आम्ही चुकीचा अर्थ काढला नाही असं शिंदे यांनी म्हटलं आहे.

PREV
Entertainment News (मनोरंजन बातम्या): Get Entertainment News & Live updates in Marathi. Stay updated with Marathi Celeb gossips and Marathi Cinema news, Matahi movie trailers, reviews, and TV shows in Marathi at Asianet Marathi News.
Read more Articles on

Recommended Stories

नाना पाटेकरांच्या दानशूरपणावर मधुर भांडारकर
Nana Patekar : नाना पाटेकर 'अभिनयाचं पुस्तक'; कॅमेऱ्यापुढचा जादूगार गमावला