Chiranjeevi Wedding : मेगास्टार चिरंजीवी | लग्नाची भन्नाट गोष्ट | ३ दिवस सुट्टी

Jaywant Patil   | ANI
Published : Jul 08, 2026, 11:34 AM IST
Chiranjeevi Wedding : मेगास्टार चिरंजीवी | लग्नाची भन्नाट गोष्ट | ३ दिवस सुट्टी

सार

मेगास्टार चिरंजीवी यांनी त्यांच्या लग्नाचा एक भन्नाट किस्सा सांगितला आहे. 'मनवूरी पांडवुलू' या सिनेमाच्या वेळेपासूनच अल्लू रामलिंगय्या यांची चिरंजीवीवर नजर होती.

मुंबई : मेगास्टार चिरंजीवी आणि सुरेखा हे गेल्या चार दशकांपासून एक आदर्श जोडपं म्हणून ओळखले जातात. त्यांच्या लग्नाचे आणि लव्हस्टोरीचे किस्से नेहमीच व्हायरल होत असतात. पण तुम्हाला माहिती आहे का, की स्वतःच्या लग्नासाठी चिरंजीवीला किती खटपट करावी लागली होती? खुद्द चिरंजीवी यांनीच हा मजेशीर किस्सा एका कार्यक्रमात सांगितला आहे. 'मनवूरी पांडवुलू' या सिनेमाच्या शूटिंगवेळीच अल्लू रामलिंगय्या यांनी चिरंजीवीला हेरलं होतं.

चिरंजीवी सांगतात की, अल्लू अरविंद, निर्माते जयकृष्णा आणि अल्लू रामलिंगय्या यांनी मिळून 'या मुलाला आपला जावई कसा बनवायचा' याचा प्लॅन आखला होता. त्यानंतर जयकृष्णा यांनी चिरंजीवींकडे लग्नाचा प्रस्ताव ठेवला. त्यावर चिरंजीवी म्हणाले, 'अहो, मी आता कुठे सेटल होतोय, इतक्यात लग्न कशाला?'

यावर त्यांनी चिरंजीवींच्या वडिलांना जाऊन समजावलं, 'हा मुलगा कमल हासनसारखा मोठा स्टार बनेल, मुली त्याच्या मागे लागतील, त्यामुळे आताच याचं लग्न लावून टाका.' चिरंजीवी पुढे गमतीने सांगतात, 'सुरेखाला बघायला गेलो, तिने दिलेली कॉफी प्यायल्यावर मला 'हो' म्हणावंच लागलं. तिने काय जादू केली होती कुणास ठाऊक. लोक म्हणायचे की तोंडात बोट घातलं तरी चावणार नाही, पण नंतर तर ती माझा गळाच धरायला आली होती.'

सुट्टी द्यायला निर्मात्याचा नकार

चिरंजीवी गंमतीने सांगतात, 'सुरेखासोबत लग्न करण्यासाठी मला बळीच्या बकऱ्यासारखं हार घालून नेण्यात आलं. तेव्हा मी खूप बिझी होतो. माझे निर्माते मला वेळच देत नव्हते. सिनेमाचं शूटिंग जोरात सुरू होतं. लग्नासाठी सुट्टी मागितली, तर त्या सिनेमाचे निर्माते एम. एस. रेड्डी यांनी सुट्टी द्यायलाच नकार दिला.' चिरंजीवी यांनी आठवण करून दिली की, लग्नासाठी सुट्टी मागितल्यावर ते म्हणाले, 'फक्त एक दिवस मिळेल.'

पण शूटिंग दुसऱ्या ठिकाणी सुरू होतं. तिथून हैदराबादला येऊन, लग्न करून परत जाणं शक्यच नव्हतं. अखेरीस, चिरंजीवी यांनी खूपच हट्ट धरल्यावर निर्मात्यांनी फक्त तीन दिवसांची सुट्टी दिली. 'एक दिवस नवरदेव बनायला, दुसरा दिवस लग्नासाठी आणि तिसरा दिवस... तुम्हाला माहीतच आहे कशासाठी असतो तो,' असं चिरंजीवी यांनी सांगताच एकच हशा पिकला. अल्लू रामलिंगय्या यांच्या शताब्दी सोहळ्याच्या कार्यक्रमात मेगास्टारने हे किस्से शेअर केले होते.

PREV
Entertainment News (मनोरंजन बातम्या): Get Entertainment News & Live updates in Marathi. Stay updated with Marathi Celeb gossips and Marathi Cinema news, Matahi movie trailers, reviews, and TV shows in Marathi at Asianet Marathi News.
Read more Articles on

Recommended Stories

नाना पाटेकरांच्या दानशूरपणावर मधुर भांडारकर
Nana Patekar : नाना पाटेकर 'अभिनयाचं पुस्तक'; कॅमेऱ्यापुढचा जादूगार गमावला