सैफ अली खान आणि करीना कपूर: सैफ अली खान आणि करीना कपूर यांच्या आंतरधर्मीय लग्नामुळे 'लव्ह जिहाद' सारखा वाद निर्माण झाला होता, ज्यामुळे त्यांना मोठ्या प्रमाणात ट्रोलिंगचा सामना करावा लागला.
सैफ अली खान आणि करीना कपूरच्या लग्नावेळी लव्ह जिहादच्या सुरु होत्या बातम्या, सोहा अली खानने केला धक्कादायक दावा
बॉलिवूडमधील काही सेलिब्रेटींचे लग्न हे कायमच चर्चेत राहत असते. त्यामध्ये खासकरून सैफ अली खान आणि करीना कपूर यांचे लग्न हे कायमच चर्चेत राहत आले आहे. या जोडीला लग्नानंतर अनेक चाहत्यांनी ट्रोल केलं होतं.
26
सैफ अली खान आणि करीना कपूरच्या लग्नावेळी झाला होता वाद
सैफ अली खान आणि करीना कपूरच्या लग्नाच्यावेळी वाद झाला होता. दोघांचे लग्न आंतरधर्मीय पद्धतीने करण्यात आले. त्यावेळी त्यांच्यावर दोनही बाजूंनी मोठ्या प्रमाणावर टीका झाली होती.
36
सोहा अली खान काय म्हणाली?
यावेळी बोलताना सोहा अली खान म्हणाली की, सैफ आणि करीनाच्या लग्नाच्या वेळी अनेक विचित्र बातम्या समोर आल्या होत्या. सोहा म्हणाली, “जेव्हा करिना आणि माझ्या भावाचे लग्न झाले तेव्हा ‘लव्ह जिहाद’ आणि ‘घर वापसी’ सारख्या विचित्र बातम्या येत होत्या.”
सोहाने यावेळी बोलताना सांगितलं की, तिने ज्या वेळी कुणालशी लग्न केलं त्यावेळी तिला ट्रोलिंगचा मोठ्या प्रमाणावर सामना करावा लागला होता. तिला अशाच प्रकारे लोकांच्या द्वेषाचा मोठ्या प्रमाणावर सामना करावा लागला.
56
सोहा काय म्हणाली?
यावेळी बोलताना सोहा म्हणाली की, “अनेक लोक द्वेषपूर्ण टिप्पण्या करतात, अनेक आवाज उठवले जातात आणि ते ठीक आहे. मला प्रत्येकाच्या मतांची पर्वा नाही. मी ज्या लोकांवर प्रेम करते, ज्यांची काळजी घेते आणि ज्यांचा आदर करते ते माझ्यासोबत आहेत हे माझ्यासाठी महत्त्वाचे आहे.”
66
भाईने फोन करून गर्लफ्रेंडबद्दल काय सांगितलं?
भाईने सोहाला फोन केला आणि म्हटलं की, “मला आठवतंय की मी कुठेतरी शूटिंग करत होतो तेव्हा भाईने मला फोन केला आणि म्हणाला, ‘मला तुला सांगायतं आहे की माझी गर्लफ्रेंड तुझ्यापेक्षा दोन वर्षांनी लहान आहे.’मी म्हणाले, ‘ठीक आहे, छान.’ हा त्याचा माझ्याशी संवाद झाला होता.”