मला अजूनही त्याची काळजी वाटते, 'या' प्रसिद्ध अभिनेत्याच्या गळ्यात पडून धनश्री वर्मा झाली भावुक

Published : Oct 08, 2025, 03:34 PM IST

एका रियालिटी शोमध्ये धनश्री वर्माने स्पर्धक अर्जुन बिजलानीसोबत बोलताना यजुवेंद्र चहलसोबतच्या नात्यावर मोठा खुलासा केला आहे. तिने सांगितले की त्यांच्या नात्याची सुरुवात अरेंज्ड मॅरेजने झाली होती.

PREV
16
मला अजूनही त्याची काळजी वाटते, 'या' प्रसिद्ध अभिनेत्याच्या गळ्यात पडून धनश्री वर्मा झाली भावुक

धनश्री वर्मा सोशल मीडियावर कायमच चर्चेत राहत असते. ती अश्निर ग्रोव्हरच्या रियालिटी शोमध्ये सहभागी झाली असून याठिकाणी तिने यजुवेंद्र चहलबद्दल नायाबद्दल अनेक खुलासा केला आहे.

26
लग्नाबद्दल कोणता खुलासा केला?

लग्नाबद्दल धनश्रीने स्पर्धक अर्जुन बिजलानीसोबत बोलताना खुलासा केला आहे. यावेळी तिने यजुवेंद्र चहलबाबत काळजी वाटत असल्याचं म्हटलं आहे. ही गोष्ट सांगताना तिच्या डोळ्यात पाणी दाटून आले होते.

36
शोमधील व्हिडीओ सोशल मीडियावर झाला व्हायरल

शोमधील एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यात अर्जुन बिजलानी स्पर्धक धनश्री वर्माला विचारतो की, तिचं लव्ह मॅरेज होतं की, अरेंज्ड मॅरेज. धनश्री उत्तर देते की, "लव्ह आणि अरेंज्ड मॅरेज दोन्हीही... खरंतर सुरुवात अरेंज्ड मॅरेजपासून झाली होती, म्हणून त्याला डेटिंग न करता लग्न करायचं होतं... माझा कोणताही प्लॅन नव्हता..."

46
तो चांगला माणूस दिसतोय

अर्जुन बिजलानी पुढे म्हणाला, "मी त्याला प्रत्यक्ष भेटलोय. तो एक चांगला माणूस दिसतो आणि जास्त बोलत नाही... पण तुमच्या घटस्फोटाला किंवा भांडणासाठी दुसरं कुणी जबाबदार नव्हतं ना? नाही का?"

56
तुम्ही कधी मित्र होऊ शकाल का?

यावर अर्जुन म्हणतो की, तुम्ही दोघे कधी चांगले मित्र होऊ शकाल का? यावर धनश्रीने उत्तर दिल आहे. तिने म्हटलं आहे की, मला नेहमीच त्याची काळजी असेल, मी एवढेच म्हणू शकते. ही काळजी माझ्याकडून कधीही संपणार नाही..."

66
धनश्रीला यजुवेंद्र चहलची काळजी वाटतेय

धनश्रीला अजूनही यजुवेंद्र चहलची काळजी वाटत असल्याचं दिसून आलं आहे. धनश्रीने नातं वाचवण्यासाठी खूप प्रयत्न केले पण ते वाचलं नाही. या वर्षी मार्चमध्ये धनश्री आणि यजुवेंद्र दोघांनी अधिकृत घटस्फोट घेतला आहे.

Read more Photos on

Recommended Stories