अभिनेत्री कुब्रा सैतने अश्निर ग्रोव्हरच्या शोमध्ये वयाच्या तिसाव्या वर्षी गर्भपात केल्याचा खुलासा केला आहे. त्यावेळी घेतलेला निर्णय योग्य होता असे तिने आत्मविश्वासाने सांगितले.
वन नाईट स्टँडनंतर 'ही' प्रसिद्ध अभिनेत्री राहिली गरोदर, गर्भपात केल्यानंतर मेले का नाही असं गेलं वाटून
बिग बॉसला टक्कर देणारा अश्निर ग्रोव्हरचा शो चांगला प्रसिद्ध झाला. राईज अँड फॉल असं या कार्यक्रमाचं नाव होतं. या शोमुळे एक अभिनेत्री चर्चेत आली आणि तीच नाव कुब्रा सैत होतं.
26
वयाच्या तिसाव्या वर्षी गर्भपात केला होता
कुब्रा हिने यावेळी तिसाव्या वर्षी गर्भपात केल्याच सांगितलं आहे. ज्यावेळी तिने हा निर्णय घेतला त्यावेळी तो बरोबर की चूक हे तिला माहित नव्हतं. यावेळी बोलताना तिने मी त्यावेळी घेतलेला निर्णय बरोबर होता असं म्हटलं आहे.
36
त्यातून बाहेर पडायला मला बराच वेळ लागला
मला त्यातून बाहेर पडायला बराच वेळ लागल्याचं यावेळी तिने बोलताना सांगितलं आहे. तिने यावेळी बोलताना म्हटलं की, "त्या घटनेला अनेक वर्षे झाली आहेत आणि मला त्याबद्दल विचार करण्यासाठी त्यातून बाहेर पडण्यासाठी बराच वेळ मिळाला.
मात्र, तुमच्या आयुष्यात असा क्षण येतो, जेव्हा तुम्ही एका द्विधा मनस्थितीत सापडता, कारण तुमचा विश्वास, तुमच्या जबाबदाऱ्या आणि तुमच्या सभोवतालचं जगही तिथं असतं. तुम्हाला तुमची कर्तव्ये काय आहेत हे माहीत असतं, तुम्हाला माहिती असतं की, समाज तुमच्याकडे कोणत्या नजरेनं पाहतोय.त्यामुळे तुम्हाला चूक आणि बरोबर काय असतं यांच्यात अडकल्यासारखं वाटतं..."
56
मी त्यावेळी घेतलेला निर्णय बरोबर होता
मी त्यावेळी घेतलेला निर्णय बरोबर होता असं आज मी आत्मविश्वासाने म्हणू शकते. कारण मला माहित आहे की जरी मी चूक केली असती तरी देव सगळं बघतोय आणि मला त्याचे परिणाम भोगावे लागले असते.
66
याआधी मला भयंकर त्रास झाला
याआधी मला भयंकर त्रास झाल्याचं तिने सांगितलं आहे. तिने बोलताना म्हटलं की, या घटनेतून बाहेर पडण्यासाठी बराच काळ लागला. एका प्रोजेक्टच्या शूटिंगदरम्यान, तिला अनेकदा अस्वस्थ वाटायचे, खूप रक्तस्त्राव व्हायचा आणि चिडचिड व्हायची, परंतु तिने याबद्दल कोणासोबतही चर्चा केली नाही.