तेलगू अभिनेत्री हेमाला केंद्रीय गुन्हे शाखेने अटक केली आहे. रेव्ह पार्टी प्रकरणी चौकशी केल्यानंतर तिच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, या पार्टीत जवळपास 86 लोकांनी ड्रग्जचे सेवन केले होते.
एंटरटेनमेंट डेस्क : बेंगळुरू रेव्ह पार्टी प्रकरणी तेलगू अभिनेत्री हेमाच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहे. तिची चौकशी केल्यानंतर केंद्रीय गुन्हे शाखेने (सीसीबी) आज तिला अटक केली आहे.मीडिया रिपोर्ट्सनुसार, या पार्टीत जवळपास 86 लोकांनी ड्रग्जचे सेवन केले होते.
86 जणांनी अंमली पदार्थांचे सेवन :
यापूर्वी सीसीबीने तेलुगू अभिनेत्री हेमासह आठ जणांना नोटीस पाठवली होती. हे संपूर्ण प्रकरण 22 मे रोजी शहराच्या सीमेवर आयोजित करण्यात आलेल्या रेव्ह पार्टीचे आहे. या पार्टीत सहभागी झालेल्या सुमारे 86 लोकांमध्ये अंमली पदार्थांचे सेवन झाल्याची पुष्टी झाली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, या पार्टीला मोठ्या संख्येने लोक उपस्थित होते. वृत्तानुसार, पार्टीत 73 पुरुष आणि 30 महिलांचा समावेश होता. कर्नाटक पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी विभागाने हा छापा टाकला होता. त्यावेळी हेमा देखील या पार्टीत असल्याचे निष्पन्न झाले होते.
या पार्टीत आणखी एका अभिनेत्रीनेही हजेरी लावलेली :
कर्नाटक पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी विभागाने टाकलेल्या छाप्यात दोन तेलुगू अभिनेत्रींसह 73 पुरुष आणि 30 महिलांसह अनेक लोक रेव्ह पार्टीत सहभागी झाले होते. हेमाशिवाय या पार्टीत सहभागी होणारी दुसरी तेलुगू अभिनेत्री आशा रॉय असल्याचे सांगण्यात येत आहे.
पोलिसांनी दिले हे निवेदन :
या प्रकरणी बेंगळुरू शहराचे पोलिस आयुक्त बी दयानंद म्हणाले की, रेव्ह पार्टीत सहभागी झालेल्या लोकांच्या रक्ताचे नमुने चाचणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत. माहिती देताना ते म्हणाले की, "19 मे रोजी रात्री बेंगळुरू पोलिसांच्या सीसीबीने विशिष्ट माहितीच्या आधारे इलेक्ट्रॉनिक सिटी येथील एका फार्महाऊसवर छापा टाकला. यावेळी सुमारे 100 लोक उपस्थित होते. झडतीनंतर ड्रग्ज आणि अंमली पदार्थ जप्त करण्यात आले.
हेमा यांनी अनेकवेळा पोलिसांची केली दिशाभूल :
रिपोर्टमध्ये सूत्रांच्या हवाल्याने असे लिहिले आहे की, हेमाने या संपूर्ण प्रकरणात अनेकदा पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. दोन वेळा नोटीस देऊनही ती सुनावणीला हजर राहिली नाही. शुक्रवारीही ती ओळख लपवण्यासाठी बुरखा घालून सीसीबी कार्यालयात पोहोचली होती. सीसीबीने तिला अटक केल्यानंतर, हेमाला आवश्यक वैद्यकीय तपासणीसाठी केसी जनरल हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. हेमाला मंगळवारी सकाळी अणेकल न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याचे सीसीबीने सांगितले.
काय आहे हेमाच्या रेव्ह पार्टीचे संपूर्ण प्रकरण?
गेल्या महिन्यात बेंगळुरूच्या बाहेरील भागात एका रेव्ह पार्टीचा पर्दाफाश झाला होता. यात सहभागी असलेले लोक अंमली पदार्थांचे सेवन करत असल्याचे समोर आले. अधिकृत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या रेव्ह पार्टीत 103 जण सहभागी झाले होते आणि त्यापैकी 86 जणांनी ड्रग्ज घेतले होते.पार्टीनंतर सहभागी लोकांच्या रक्ताचे नमुने तपासले असता 73 पुरुष आणि 30 मुलींनी एमडीएमए, कोकेन आणि हायड्रो गांजा असे पदार्थ घेतल्याचे आढळून आले. धक्कादायक बाब म्हणजे 73 पैकी 59 पुरुष आणि 30 पैकी 27 मुलींनी ड्रग्ज घेतल्याची पुष्टी झाली. यावरून पार्टीमध्ये अमली पदार्थांचे सेवन मोठ्या प्रमाणात झाल्याचे दिसून येते. पार्टीत सहभागी झालेल्यांमध्ये हेमा आणि आशी रॉय या तेलगू अभिनेत्री होत्या, ज्यांच्या रक्त तपासणीत त्यांनी ड्रग्ज घेतल्याची पुष्टी केली आहे. त्यामुळे या प्रकरणाचे गांभीर्य आणखी वाढले. बेंगळुरू स्थित वासूच्या वाढदिवसानिमित्त ही रेव्ह पार्टी आयोजित करण्यात आली होती..
आणखी वाचा :