Amazon Prime Video: लैंगिक संबंधांच्या सीनमध्ये लहान मुलाला दाखावल्या प्रकरणी प्राईम व्हिडिओवर कारवाई, ओटीटीवरून काढावा लागला हा चित्रपट

ब्रिटनमध्ये पहिल्यांदाच ॲमेझॉनवर ऑफकॉमच्या नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोप करण्यात आला आहे. हा उल्लंघन 2022 च्या फिलिपिनो चित्रपट पमासाहेशी संबंधित आहे, जो काही महिन्यांपूर्वी प्राइमवर प्रदर्शित झाला होता.

ब्रिटनमध्ये पहिल्यांदाच ॲमेझॉनवर ऑफकॉमच्या नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोप करण्यात आला आहे. हे उल्लंघन 2022 च्या फिलिपिनो चित्रपट पमासाहेशी संबंधित असून हा चित्रपट काही महिन्यांपूर्वीच प्राइमवर व्हिडिओवर प्रदर्शित झाला होता. चित्रपटाची कथा एका गरीब आईची आहे जी तिच्या पतीचा शोध घेण्यासाठी मनिलाला जाते. परंतु तिला तिच्या ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी तिच्या शरीराचा वापर करावा लागतो.मात्र आता यामुळे नवीन वाद सुरु झाला असून हा चित्रपट आता यूकेमध्ये प्राईम व्हिडीओवरून काढून टाकण्यात आला आहे.

काय आहे संपूर्ण प्रकरण ?

त्याचे झाले असे की, प्राइम व्हिडिओने 18+ रेटिंग दिलेला हा चित्रपट असून मात्र यात एका अल्पवयीन मुलाचा लैंगिक व्हिडिओचा समावेश यात करण्यात आला असल्याचं म्हंटल जात आहे. या चित्रपटाबाबत एका दर्शकाने ऑफकॉमला याबाबत तक्रार केली होती. यात चित्रित केलेल्या लैंगिक दृश्यात मुलाचा सहभाग असल्याचे स्पष्ट झाले आहे. ऑफकॉमच्या म्हणण्यानुसार, एका दर्शकाने यापूर्वी एक पत्र पाठवले होते, परंतु त्याला प्रतिसाद मिळाला नाही आणि फोनवर देखील समाधानकारक प्रतिसाद मिळाला नव्हता. त्यामुळे त्यांनी आपली तक्रार थेट नियामकाकडे केली आहे.

ऑफकॉमचे काय म्हणणे ?

ऑफकॉमने सांगितले की, या दर्शकाने ब्रिटिश बोर्ड ऑफ फिल्म क्लासिफिकेशनकडे तक्रार दिली असून आम्ही याबाबत नियमकाकांकडून सल्ला मागितला होता.त्यानुसार त्यांनी आम्हाला सल्ला दिला आहे की, "या दृश्यात एक फ्रेम आहे जी मुलांचे संरक्षण कायदा 1978 चे उल्लंघन करत आहे". त्या आधारावर ते लैंगिक समान फ्रेममध्ये मुलाला दाखवत आहे.या चित्रपटाबाबत बीबीएफसीने ॲमेझॉनशी संपर्क साधल्यानंतर हा चित्रपट यूकेमध्ये काढून टाकण्यात आला आहे. याविषयी Amazon म्हणाले, "ते या प्रकारचा अभ्यास करून तसेच हे धोरण जवळून समजून घेणार आहेत. तसेच याविषयी अधिक काटेकोर पणे पालन करून यानंतर अशा प्रकारचे काही घडणार याची त्यांनी शाश्वती दिली आहे.

#national #amazon prime video #pamasahe

Share this article