बॉलिवूडमध्ये काजोलने आपल्या दमदार अभिनयाने नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. पण काजोलची लहान बहीण तनिषा मुखर्जीला सिनेसृष्टीत आपली फारशी जादू चालवता आली नाही. अशातच नेहमीच काजोल आणि तनीषामध्ये तुलना केली जाते. यावरुनच तनीषाने उत्तर दिले आहे.
Entertainment : गेल्या वर्षी टेलिव्हिजनवरील शो ‘झलक दिखला जा सीझन 11’ मध्ये झळकलेली तनिषा मुखर्जीने (Tanishaa Mukerji) नुकत्याच एका मुलाखतीत काजोल(Kajol) आणि तिच्यामध्ये केल्या जाणाऱ्या तुलनेवरुन भाष्य केले आहे. काजोलने रुपेरी पडद्यासह ओटीटी प्लॅटफॉर्मवरही आपल्या अभिनयातून प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. दुसऱ्या बाजूला बहीण तनीषा मुखर्जीला सिनेसृष्टीत आपला ठसा उमटवता आला नाही.
तनीषाने काजोलसोबत केल्या जाणाऱ्या मुद्द्यावर केले भाष्य
करियरच्या सुरुवातीपासूनच काजोल आणि तनीषामध्ये नेहमीच तुलना केली जायची. यावर तनीषा म्हणते, "या गोष्टींचा मला त्रास होत नाही. मी बहीण आणि स्वत: मध्ये कधीच तुलना करू शकत नाही. याशिवाय मी स्वत: ची तुलना अन्य कलाकारांसोबत करत नाही. तर मी स्वत: च्या बहिणीसोबत का करू? प्रत्येक कलाकाराचा स्वत:चा एक प्रवास असतो, असे मला वाटते. खरंतर, बहीण काजोलप्रमाणे माझे करियर उत्तम नव्हते. पण काजोलने वयाच्या 16 व्या वर्षापासून करियरला सुरुवात केली होती."
पुढे तनीषा म्हणते की, "मला काही विशेषाधिकार मिळाले कारण काजोल इंडस्ट्रीमध्ये होती. मी काजोलला तिच्या करियरसाठी धन्यवाद देते. कारण काजोलने मला सर्वकाही दिले ज्याची मला गरज होती. अशातच माझे करियर फार आरामदायक होते. मला काम करावे लागले नाही. याच दृष्टीकोमुळे मी कधीच तुलना करत नाही. मला असे वाटते जगाला नेहमीच एकमेकांसोबत तुलना करण्यास आवडते."
'झलक दिखला जा 11' मध्ये तनीषाने केलेले विधान चर्चेत
गेल्या वर्षी तनीषाने झलक दिखला जा च्या सीझन 11 वेळी एक विधान केले होते. यामुळे तनीषाची जोरदार चर्चा झाली होती. तनीषाने म्हटले होते की, मी कलाकार नाहीये. खरंतर, काजोल आणि भावोजी अजय देवगण यांना प्रसिद्धी मिळाली आहे. खरंतर, काजोल आणि माझ्यामध्ये मजबूत नाते असल्याचे तनीषाने म्हटले. काजोलला माझ्या प्रत्येक बोलण्यामागील अर्थ कळतो. यामुळे माझ्या इमानदारीवर काजोलला गर्व असावा असेही तनीषाने म्हटले.
तनीषाचे करियर
तनीषा मुखर्जीने आपल्या सिनेसृष्टीतील करियरची सुरुवात Ssshhh...सिनेमातून केली होती. याशिवाय ‘टँगो चार्ली’, ‘तुम मिलो तो सही’, ‘कोड नेम अब्दुल’ सारख्या सिनेमांमध्येही काम केलेय. याशिवाय तनीषा बिग बॉस सीझन 7 मध्ये झळकली होती. यामध्ये तनीषा फर्स्ट रनर अप ठरली होती.
आणखी वाचा :
Mr And Mrs Mahi सिनेमाची धिम्या गतीने कमाई, पाहा 5व्या दिवशीचे कलेक्शन
TMKOC मधील लोणचं-पापड विकणाऱ्या माधवी भाभींचा आहे कोट्यावधींचा व्यवसाय