स्वप्नील जोशीचा 'Tesla Cybertruck' सोबत फोटो व्हायरल, चाहते म्हणतात...

Published : May 23, 2025, 12:17 PM IST
Swapnil Joshi

सार

स्वप्नील जोशीचा 'Tesla Cybertruck' सोबतचा फोटो व्हायरल झाला आहे. यावरुन आता चाहत्यांनी त्याच्या पोस्टखाली वेगवेगळ्या प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे. 

Swapnil Joshi shared photos with Tesla Cybertruck : मराठी अभिनेता स्वप्नील जोशी याने नुकताच त्याच्या इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर करत सोशल मीडियावर खळबळ उडवून दिली आहे. या फोटोमध्ये तो Tesla Cybertruck या गाडीसमोर उभा असल्याचे दिसते. "This one's for you Raaghav! Tesla Cybertruck!" असे कॅप्शन देत त्याने हा फोटो शेअर केला आणि चाहत्यांमध्ये उत्सुकता निर्माण झाली. अनेक चाहत्यांनी लगेच विचारणा केली की, "ही कार तुझी आहे का?"

मात्र, तपासणीअंती समजते की ही Cybertruck प्रत्यक्षात गुजरातमधील सूरत येथील एका उद्योजकाची आहे. स्वप्नील जोशी त्या उद्योजकाला भेटण्यासाठी गेला होता आणि त्याच भेटीदरम्यान हा फोटो काढला गेला असावा, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. सध्या भारतात Tesla Cybertruck अधिकृतपणे विक्रीसाठी उपलब्ध नाही, त्यामुळे ही कार आयात करून भारतात आणण्यात आली आहे.

 

स्वप्नील जोशी याने याआधी डिसेंबर 2024 मध्ये Land Rover Defender ही लक्झरी SUV खरेदी केली होती. त्याने ही गाडी आपल्या वडिलांसाठी घेतल्याचं त्यावेळी सांगितलं होतं. या गाडीची किंमत सुमारे 1.2 कोटी ते 1.89 कोटी रुपये दरम्यान आहे.

Tesla Cybertruckसोबतचा स्वप्नीलचा फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला असून, चाहत्यांनी भन्नाट प्रतिक्रिया दिल्या आहेत. काहींनी अभिनंदन करत त्याची नवी कार समजून शुभेच्छा दिल्या, तर काहींनी मजेशीर कमेंट्स केल्या. "घेतली का भावा? एक चक्कर देना", "सर पत्ता द्या, लगेच येतो", "वाटतं भाऊ सूरतला आले आहेत" अशा प्रतिक्रिया पाहायला मिळाल्या.

PREV
Read more Articles on

Recommended Stories

700 कोटींची मालकीण अभिनेत्री, 10 वर्षांनी लहान मुलाशी केले लग्न, वाचा बेडरुम सिक्रेट?
10 भाषांमध्ये 90 चित्रपट, पण 50 वर्षांनीही सर्वांना आवडणारी अविवाहित अभिनेत्री कोण?