अमिता बच्चन यांना लता दीननाथ मंगेशकर पुरस्कार प्रदान, एआर रहमान आणि रणदीप हु्ड्डाचाही करण्यात आला सन्मान

Published : Apr 25, 2024, 09:10 AM IST
Amitabh Bachchan

सार

Entertainment : बॉलिवूडमधील दिग्गज अभिनेते अमिताभ बच्चन यांना लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार प्रदान करण्यात आला. उषा मंगेशकर यांच्या हस्ते अमिताभ बच्चन यांना पुरस्कार दिला गेला. 

Entertainment News : बॉलिवूडमधील दिग्गज अभिनेते अमिताभ बच्चन यांना बुधवारी (25 एप्रिल) लता दीनानाथ मंगेशकर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. पाच भावडांमध्ये सर्वाधिक मोठी बहीण लता मंगेशकर यांचे वर्ष 2022 मध्ये निधन झाले होते. लता दीदींच्या निधनानंतर परिवार आणि ट्रस्टने त्यांच्या आठवणीत सन्मान सोहळ्याचे आयोजन केले होते. काही दिवासांपूर्वीच समोर आले होते की, अमिताभ बच्चन यांना लता दीनानाथ मंगेशकर पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे. याशिवाय प्रसिद्ध गायक एआर रहमान यांना मास्टर दीनानाथ पुरस्कार आणि अभिनेता रणदीप हुड्डाला विशेष पुरस्काराने गौरवण्यात आले.

अमिताभ बच्चन यांची प्रतिक्रिया
अमिताभ बच्चन यांनी पुरस्काराने गौरवण्यात आल्यानंतर म्हटले की, "मी स्वतःला अशा पुरस्कारासाठी कधीच पात्र मानले नाही, पण हृदयनाथ जी यांनी मी येथे येण्यासाठी खूप प्रयत्न केलाय. त्यांनी गेल्या वर्षीही या पुरस्कार सोहळ्यासाठी आमंत्रित केले होते. याआधी पुरस्कारासाठी आलो नाही म्हणून माफी मागतो. कारण त्यावेळी प्रकृती बिघडल्याचे कारण दिले होते. खरंतर मी ठणठणीत होतो. पण मला येथे यायचे नव्हते. यावेळी माझ्याकडे कोणते कारण नव्हते. अखेर मला पुरस्कारासाठी यावे लागले."

एआर रहमान याचे ट्विट 
एआर रहमान याने ट्विट करत म्हटले की, दीनानाथ मंगेशकर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या ट्विटमध्ये एआर रहमान याने गायिका आशा भोसले यांना टॅगही केले आहे. 

आशा भोसले यांची कार्यक्रमाला अनुपस्थिती
मंगेशकर कुटुंबातील भावंडांमधील तिसरी बहीण म्हणजेच उषा मंगेशकर यांनी अमिताभ बच्चन यांना पुरस्कार प्रदान केला. खरंतर, आशा भोसले यांच्या हस्ते पुरस्कार दिला जाणार होता. पण आशा भोसले यांची प्रकृती बिघडली असल्याने त्या कार्यक्रमासाठी अनुपस्थितीत होत्या.

आणखी वाचा : 

दोन लग्न करूनही अमीर खान करणार तिसरे लग्न, कपिल शर्माच्या शोमध्ये दिली कबुली

'ड्रीम गर्ल 3'मधून अनन्या पांडेचा पत्ता कट ? दुसऱ्या कोणत्या अभिनेत्रीची लागली वर्णी ?

PREV
Entertainment News (मनोरंजन बातम्या): Get Entertainment News & Live updates in Marathi. Stay updated with Marathi Celeb gossips and Marathi Cinema news, Matahi movie trailers, reviews, and TV shows in Marathi at Asianet Marathi News.

Recommended Stories

Ramayana: ४ हजार कोटींच्या 'रामायण'ची अ‍ॅडव्हान्स बुकिंगमध्ये हवा! रिलीजआधीच बॉक्स ऑफिसवर धमाका
Jailer 3: रजनीकांतचा स्वॅग, बालय्या आणि विजय सेतुपतीची एन्ट्री; 'जेलर 3' चा मेगा प्लॅन ठरला?