मोठी बातमी! सलमान खानच्या घरावरील गोळीबार करणाऱ्या एका आरोपीचा उपचार दरम्यान मृत्यू ;आत्महत्येचा केला होता प्रयत्न

बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता सलमान खानच्या घराबाहेरील गोळीबार प्रकरणातील आरोपीनं पोलीस कोठडीत आत्महत्येचा प्रयत्न केला होता. अनुज थापन असं या आरोपीचं नाव आहे. आरोपी अनुज थापनची प्रकृती चिंताजनक होती त्यामुळे त्याला रुग्णालयात दाखल केले होते.

Ankita Kothare | Published : May 1, 2024 9:58 AM IST / Updated: May 01 2024, 03:57 PM IST

बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता सलमान खानच्या घराबाहेरील गोळीबार प्रकरणातील आरोपीनं पोलीस कोठडीत आत्महत्येचा प्रयत्न केला होता.आरोपी अनुज थापनची प्रकृती चिंताजनक होती त्यामुळे त्याला रुग्णालयात दाखल केले होते. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु असताना त्याचा मृत्यू झाला आहे.

अनुज थापन असं मृत्यू झालेल्या आरोपीचं नाव आहे.अनुज 32 वर्षांचा असून सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार करणाऱ्या दोघांना शस्त्रे पुरवल्याचा आरोप त्याच्यावर आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अनुजने पोलीस कोठडीत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. यानंतर त्याला तातडीने मुंबईच्या जीटी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, त्यावेळी त्याची प्रकृती अत्यंत गंभीर होती.डॉक्टरांच्या अथक परिश्रमांना यश मिळाले नसून त्याचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. आरोपी अनुज थापन हा बिष्णोई टोळीशी संबंधीत असून त्याच्याविरोधात खंडणी, शस्त्रास्त्र बाळगल्याप्रकरणीचे गुन्हे दाखल आहेत.

विशेष न्यायालयाने 8 मे पर्यंत सुनावली होती पोलीस कोठडी :

अभिनेता सलमान खानच्या वांद्रे येथील निवासस्थानावर झालेल्या गोळीबारप्रकरणी अटक करण्यात आलेल्या तीन आरोपींना सोमवारी विशेष न्यायालयाने 8 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली, त्यानंतर दोनच दिवसांनी ही घटना घडली आहे. विशेष मकोका न्यायाधीश एएम पाटील यांनी विकी गुप्ता (24), सागर पाल (21), अनुज थापन (32) यांना पोलीस कोठडीत आणि सोनू चंदर बिश्नोई (37) यांना वैद्यकीय कारणास्तव न्यायालयीन कोठडी सुनावली. गुप्ता आणि पाल या कथित नेमबाजांवर पोलिसांनी मकोका लावला आहे. 

गोळीबार केलेली बंदूक तापी नदीत सापडली होती :

सलमानच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारात वापरण्यात आलेली बंदूक सुरतमधील तापी नदीमध्ये सापडली होती. बंदुकीसोबतच काही जिवंतकाडतूसही सापडले होते. सलमानच्या घरावर गोळीबार करणाऱ्या विक्की गुप्ता आणि सागर पाल या तरुणांनी चौकशीदरम्यान सांगितले होते की, सलमानच्या घरावर गोळीबार केल्यानंतर ते मुंबईहून रस्त्याने सुरतला पोहोचले होते. येथून तो रेल्वेने भुजला गेला, तेथे प्रवासादरम्यान त्यांनी रेल्वे पुलावरून पिस्तूल तापी नदीत फेकले होते.

प्रकरण काय ?

सलमान खानच्या मुंबईतील वांद्रे परिसरात असलेल्या गॅलेक्स अपार्टमेंटमधील निवासस्थानाबाहेर 14 एप्रिलच्या पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास दोन अज्ञात व्यक्तींनी गोळीबार केला होता. हल्लेखोर मोटरसायकलवरुन आले होते व त्यांनी सलमानच्या घराच्या दिशेने पाच गोळ्या झाडल्या. यापैकी 2 गोळ्या सलमान खानच्या लिव्हिंग रुमच्या भिंतीला लागल्या होत्या. या घटनेनंतर सलमान व त्याच्या कुटूंबीयांची सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे. मुंबई पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत 16 एप्रिल रोजी गुजरातमधील भूज जिल्ह्यातून गोळीबार करणाऱ्या आरोपींना अटक केली. त्यांच्या चौकशीनंतर त्यांना शस्त्रं पुरवाणाऱ्या 2 आरोपींना पंजाबमधून अटक करण्यात आली. याच दोन आरोपींपैकी एकाने आत्महत्येचा प्रयत्न केला.

आणखी वाचा :

Salman Khan Shooting Case : दोन आरोपींना पंजाब मधून अटक, आज न्यायालयात करणार हजर

Salman Khan Firning Case : सलमान खानच्या घरावरील गोळीबाराची लिंक पोर्तुगालमध्ये? पोलीस अधिकाऱ्यांनी केलाय मोठा खुलासा

सलमान खानची हत्या करायची नव्हती...तरीही का केला गोळीबार आणि किती मिळाले पैसे? आरोपींनी केला हा मोठा खुलासा

Share this article