Rinku Rajguru Monsoon Trip : सैराट सिनेमातून प्रसिद्ध झालेली अभिनेत्री रिंकू राजगुरूची नेहमीच चर्चा होत असते. अशातच रिंकू मान्सून सुरू झाल्यानंतर एका ठिकाणी ट्रिपसाठी गेल्याचे फोटो तिने सोशल मीडियावरील प्लॅटफॉर्म इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत.
सैराट सिनेमातून प्रसिद्ध झालेली आर्ची म्हणजेच रिंकू राजगुरू सध्या मान्सून ट्रिपवर आहे. अभिनेत्रीने सोशल मीडियावरील प्लॅटफॉर्म इंस्टाग्रामवर ट्रिपचे काही खास फोटोज शेअर केले आहेत.
26
निसर्गाच्या प्रेमात
रिंकूने हार्ट पोजमध्ये फोटो क्लिक करत ती तेथील निसर्गाच्या प्रेमात पडल्याचे दाखवून देत आहे. सध्याच्या मान्सून सीझनमध्ये सर्वत्र हिरवागार निसर्ग पाहून कोणीही त्याच्या प्रेमात पडू शकतो.
36
वातावरणाचा मनसोक्त आनंद
रिंकू ज्या ठिकाणी ट्रिपसाठी गेली आहे ते महाराष्ट्रातील असल्याचे वाटत नाही. पण धबधब्याजवळ तेथील वातावरणाचा मनसोक्त आनंद घेताना रिंकू दिसत आहे.
46
पावसाळा आणि ट्रिप
रिंकू तिची पावसाळ्यातील ट्रिप एन्जॉय करण्यासाठी झारखंडला गेली आहे. या फोटोंसाठी खास कॅप्शनही रिंकूने इंस्टाग्रामवर लिहिले आहे.
56
खास कॅप्शन
रिंकू राजगुरूने या फोटोंखाली कॅप्शन देत असे म्हटले आहे की, "Every new place you visit adds a new layer to your story." आता याच फोटोंखाली चाहत्यांकडून वेगवेगळ्या कमेंट्स केल्या जात आहेत.
66
रिंकूच्या कामाबद्दल
रिंकू राजगुरू लवकरच ‘बेटर हाफ ची लव्ह स्टोरी’ सिनेमातून झळकणार आहे. याआधी रिंकू झिम्मा-2, सैराट, मेकअप, कागर अशा सिनेमांमध्ये झळकली होती.