रिचा चड्ढा-अली फजलच्या घरी गोड चिमुकलीचे आगमन, चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव

Published : Jul 18, 2024, 03:54 PM IST
Richa Chadha Maternity Photoshoot

सार

बॉलिवूड अभिनेत्री रिचा चड्ढा आणि अली फजलच्या घरी आनंदाची बातमी आहे. कपलला मुलगी झाली असल्याची गोड बातमी समोर आल्याने चाहत्यांकडून दोघांना शुभेच्छा दिल्या जात आहेत. याशिवाय दोघांच्या घरातील मंडळीही आनंदीत झाली आहेत.

Richa Chadha and Ali Fazal welcome a baby girl : मिर्झापूरमधील गुड्डू पंडितची भूमिका साकारलेला अली फजल बाबा झाला आहे. अभिनेत्री रिचा चड्ढाने चिमुकल्या मुलीला 16 जुलैला जन्म दिला आहे. या बातमीने चाहते आनंदी झाले असून कपलवर शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत. याशिवाय दोघांच्या घरातील मंडळी अत्यानंदीत झाले आहेत.

ऋचा चड्ढाने आनंदाची बातमी देत म्हटले की, आम्हाला तुम्हाला सांगताना आनंद होतोय होतोय 16 जुलैला आमच्या घरी एका चिमुकलीचे आगमन झाले आहे. चिमुकली अत्यंत ठणठणीत आहे. आमचा संपूर्ण परिवार खूप आनंदात आहे. तुमच्या शुभेच्छांसाठी धन्यवाद. तुम्ही दिलेल्या प्रेम आणि आशीर्वादाचेही आभार.

ऋचा चड्ढाची इंस्टाग्राम पोस्ट
अभिनेत्री ऋचा चड्ढाने आपला बेबी बंप फ्लॉन्ट करत सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले होते. या फोटोंखाली भावूक कॅप्शन लिहित म्हटले की, ऐवढे शुद्ध, निर्मळ प्रेम जगात प्रकाशाच्या किरणाशिवाय काय आणू शकते? या अविश्वसनीय प्रवासात माझ्यासोबत कायम राहिल्याने अली फजल तुझे आभार. ऋचाने फोटोशूटसाठी रिड बर्मन याचेही आभार मानले आहेत. ऋचाने बेबी बंपचे फोटो शेअर करताना कमेंट ऑफ केल्याचेही सांगितले होते. यामागील कारण म्हणजे अभिनेत्रीने हे आमचे खासगी फोटो असल्याचे स्पष्टपणे पोस्टच्या मेसेजमध्ये म्हटले होते. 

फेब्रुवारी महिन्यात दिली होती गोड बातमी
ऋचा चड्ढा आणि अली फजलने यंदाच्याच वर्षातील 9 फेब्रुवारीला आमच्या घरी लवकरच चिमुकले बाळ येणार असल्याची गोड बातमी दिली होती. या दोघांनी दोन फोटो शेअर केला होता. त्यापैकी एका फोटोमध्ये 1+1= 3 आणि दुसऱ्या फोटोमध्ये ऋचा आणि अली फजलसह एक प्रेग्नेंट महिलेचा इमोजी शेअर केला होता. याशिवाय एक सुंदर कॅप्शनही अली फजलने लिहिले होते.

ऋचा चड्ढा आणि अली फजल यांचा विवाह
ऋचा चड्ढा आणि अली फजलने वर्ष 2022 मध्ये लग्नगाठ बांधली होती. लग्नाआधी कपलने एकमेकांना दीर्घकाळ डेट केले होते. दोघांची भेट ‘फुकरे’ सिनेमाच्या सेटवर वर्ष 2012 मध्ये झाली होती. तेव्हापासून दोघे एकमेकांच्या खूप जवळीक आले. दरम्यान, दीर्घकाळ दोघांनी आपले रिलेशनशिप सिक्रेट ठेवले होते.

आणखी वाचा : 

बाथरुम व्हिडीओ लीक झाल्याने भडकली उर्वशी, मॅनेजरला सुनावत असल्याचा Audio व्हायरल

अभिषेक बच्चनने ऐश्वर्या रायपासून विभक्त होण्याची दिली हिंट

PREV
Entertainment News (मनोरंजन बातम्या): Get Entertainment News & Live updates in Marathi. Stay updated with Marathi Celeb gossips and Marathi Cinema news, Matahi movie trailers, reviews, and TV shows in Marathi at Asianet Marathi News.

Recommended Stories

Bigg Boss 20: ब्लँकेटखाली मसाज! रोहित शेट्टीने काढली स्काऊटओपी आणि लव्ह गिलची शाळा
Shah Rukh Khan: स्लोव्हाकियाच्या राजदूतांनाही भुरळ, DDLJ चा डायलॉग व्हायरल