राखी सावंतच्या हेल्थबद्दल एक्स-पती रितेशने दिली मोठी अपडेट, म्हणाला...

Published : May 16, 2024, 07:35 AM IST
Rakhi Sawant Health Update

सार

Rakhi Sawant Health :  राखी सावंतला रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची बातमी समोर आली होती. तिचे रुग्णालयातील फोटोही व्हायरल झाले होते. अशातच काहींनी राखी सावंत ड्रामा करतेय असे म्हटले होते. पण राखीच्या हेल्थबद्दल एक्स-पती रितेशने मोठी अपडेट दिली आहे.

Rakhi Sawant Health Update :  राखी सावंतला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यानंतर बहुतांशजण राखी रुग्णालयात दाखल झाल्याचा ड्रामा करतेय असे वाटत होते. पण राखी सावंतचा एक्स पती रितेशने तिच्या हेल्थबद्दल एक मोठी अपडेट दिली आहे. रितेशने म्हटले की, अभिनेत्री रुग्णालयात असून तिची प्रकृती नाजूक आहे. यामुळे चाहत्यांनी तिच्यासाठी प्रार्थना कराव्यात.

खरंतर, सोशल मीडियावर राखी सावंतचे रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचा फोटो व्हायरल झाला. यानंतर युजरने वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्नही उपस्थितीत केले होते. आता खुद्द रितेशने राखीच्या हेल्थबद्दलच्या काही गोष्टी स्पष्ट केल्या आहेत.

रितेशने नक्की काय म्हटलेय?
राखी सावंतचा एक्स पती रितेशने म्हटले की, तिची प्रकृती खरंच बिघडली आहे. राखीने स्वत:ची सर्वांसमोर अशी ओखळ बनवलीय की, त्यांना वाटते ती ड्रामा करते. राखीची प्रकृती खरंच नाजूक आहे. पण लवकरच राखी सावंत बरी होईल.

दरम्यान, याआधीही काहीवेळा राखीला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. काही काळाआधी राखीच्या पोटातील गाठीवर शस्रक्रिया करण्यात आली होती. ही शस्रक्रिया चार तास चालली असे सांगण्यात आले होते. यावेळी राखीला खूप त्रास सहन करावा लागला होता.

नक्की काय झालेय राखीला?
राखी सावंतचे व्हायरल झालेल्या फोटोंमध्ये ती रुग्णालयातील एका बेडवर झोपल्याचे दिसून आले. तिचे डोळेही बंद होते. डाव्या बोटांवर एक पल्स ऑक्सीमीटर लावण्यात आला असून एक नर्स तिची काळजी घेताना दिसून आली. 

एक्स पतीसोबत सातत्याने स्पॉट
काही काळ दुबईत राहिल्यानंतर राखी सावंत मुंबईत परतली आहे. अभिनेत्रीने म्हटले होते की, दुबईत नोकरीसाठी गेली होती. तेथे टिकटॉक व्हिडीओ तयार करते. खरंतर, राखी सावंत आपल्या तडफदार स्वभावासाठी ओखळली जाते. दरम्यान, राखी सावंत आणि एक्स-पती आदिल दुर्रानी यांच्यामध्ये सध्या वाद सुरु आहेत. दोघांमधील प्रकरण कोर्टापर्यंत जाऊन पोहोचले आहे. अशातच राखी एक्स पती रितेशसोबत सातत्याने स्पॉट होतेय.

आणखी वाचा : 

Rakhi Sawant ची बिघडली प्रकृती, अभिनेत्री हृदयाच्या गंभीर आजारने ग्रस्त? जाणून घ्या प्रकरण

तब्बूची अमेरिकन टीव्ही सीरिजमध्ये एण्ट्री, मिळाला हा मोठा प्रोजेक्ट

PREV

Recommended Stories

कार्तिक आर्यनने या व्यक्तीच्या लग्नातील फोटो शेअर करत लिहिली भावनिक पोस्ट, वाचून डोळ्यातून येईल पाणी
7.45 लाख कोटींचा करार, Netflix ने हॉलीवूडच्या Warner Bros चे साम्राज्यच घेतले ताब्यात..!