मुंबई - १४ ऑगस्टला रिलीज झालेल्या 'वॉर २' आणि 'कुली' या दोन मोठ्या बजेटच्या चित्रपटांच्या कमाईत सतत घट होत आहे. रविवारीही, म्हणजेच चौथ्या दिवशीही, या चित्रपटांना अपेक्षित वाढ मिळाली नाही. दोन्ही चित्रपटांनी किती कमाई केली ते जाणून घ्या...
ऋतिक रोशन आणि ज्युनियर एनटीआर स्टारर 'वॉर २' ला रविवारी अपेक्षित उसळी मिळाली नाही. चित्रपटाचे कलेक्शन वाढण्याऐवजी कमी झाले. रविवारी या चित्रपटाने सुमारे २८.१८ कोटी रुपयांचे कलेक्शन केले. लॉन्ग विकेंडमधील या चित्रपटाचे हे सर्वात कमी कलेक्शन होते.
27
'वॉर 2' चे एकूण कलेक्शन किती?
अयान मुखर्जी दिग्दर्शित 'वॉर २' ने पहिल्या दिवशी ५२ कोटी, दुसऱ्या दिवशी ५७.३५ कोटी, तिसऱ्या दिवशी ३३.२५ कोटी कमावले. चौथ्या दिवसाच्या कलेक्शननंतर, चित्रपटाचे पहिल्या वीकेंडचे कलेक्शन १७०.७८ कोटी रुपये झाले आहे. आता पाहणे हे आहे की पहिल्या आठवड्यात या चित्रपटाचे कलेक्शन कुठे जाऊन थांबते.
रजनीकांत स्टारर 'कुली'ची कमाई चौथ्या दिवशी घटून ३० कोटींच्या आसपास पोहोचली. रविवारी चित्रपटाच्या कलेक्शनमध्ये वाढ होईल अशी अपेक्षा होती. पण तसे झाले नाही. रविवारी चित्रपटाने सुमारे २८.९५ कोटी रुपयांची कमाई केली.
लोकेश कनगराज दिग्दर्शित 'कुली'ला बंपर ओपनिंग मिळाली होती. पहिल्या दिवशी या चित्रपटाने ६५ कोटी रुपये कमावले. दुसऱ्या आणि तिसऱ्या दिवशी अनुक्रमे ५४.७५ कोटी आणि ३९.५ कोटी रुपये कमाई केली. चौथ्या दिवसाच्या कमाईनंतर चित्रपटाचे पहिल्या वीकेंडचे कलेक्शन सुमारे १८८.२ कोटी रुपये झाले आहे.
57
'कुली' आणि 'वॉर 2' चे वर्ल्डवाइड कलेक्शन
दोन्ही चित्रपटांचे चौथ्या दिवसाचे परदेशातील आकडे अद्याप येणे बाकी आहे. पण असा अंदाज आहे की चार दिवसांत 'कुली'ने ३६० कोटी रुपये आणि 'वॉर २' ने २४५ कोटी रुपयांची कमाई जागतिक स्तरावर केली आहे.
67
कुलीचे १ हजार कोटींची स्वप्न तसेच राहणार?
रजनीकांत यांचा कुली रिलीज झाला तेव्हा प्रचंड महोल तयार झाला होता. हा चित्रपट १ हजार कोटींची मजल मारेल असे सांगितले जात होते. त्यासाठी तशी वातावरण निर्मितीही करण्यात आली होती. पण चित्रपट अपेक्षांवर उतरला नाही. या चित्रपटाने इतरांचे रेकॉर्ड मोडले असले तरी १ हजार कोटी हे स्वप्नच राहणार असे दिसते.
77
वॉर २ चे पद्धतशीर नियोजन
कुली या चित्रपटासोबत वॉर २ रिलिज करण्यात आला होता. या चित्रपटाने कुलीच्या कमाईचा बराचसा हिस्सा आपल्या नावावर केला. या चित्रपात हृतिक रोशनसोबत ज्युनिअर एनटीआर हा साऊथचा हिरो होता. त्यामुळे या चित्रपटाला दक्षिण भारतातही प्रामुख्याने तेलुगुत मोठी कमाई करता आली.