Pushpa 2 अखेर ओटीटीवर होणार रिलीज, सिनेमा कुठे-कधी पाहू शकता घ्या जाणून

Published : Dec 17, 2024, 09:52 AM ISTUpdated : Dec 17, 2024, 09:53 AM IST
allu arjun pushpa 2 ott date

सार

बॉक्स ऑफिसवर धमाकेदार कमाई करणारा पुष्पा 2 सिनेमा आता ओटीटीवर रिलीज होण्यास सज्ज आहे. रिपोर्ट्सनुसार, सिनेमा वर्ष 2025 रोजी नेटफ्लिक्सवर रिलीज होऊ शकतो.

Pushpa 2 Movie OTT Release : साउथ अभिनेता अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदाना यांचा पुष्पा 2 सिनेमा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. सिनेमाची कमाई दिवसागणिक वाढत चालली आहे. Sacnilk.com च्या रिपोर्ट्सनुसार, सिनेमाने भारतातील बॉक्स ऑफिसवर आतापर्यंत 929.85 कोटी रुपयांची कमाई केली आहे. याशिवाय प्रेक्षकांचाही सिनेमाला भरभरुन प्रतिसाद मिळत आहे. अशातच सिनेमा आता ओटीटीवर रिलीज होण्यास सज्ज असल्याचे सांगितले जात आहे. जाणून घेऊया पुष्पा 2 सिनेमा ओटीटीवर कधी आणि कुठे रिलीज होणार याबद्दल सविस्तर...

ओटीटीवर पाहता येणार पुष्पा 2

रिपोर्ट्सनुसार, सिनेमागृहांमध्ये धमाका केल्यानंतर पुष्पा 2 सिनेमा ओटीटीवर रिलीज होणार आहे. मीडियामध्ये सुरु असणाऱ्या वृत्तांनुसार, पुष्पा 2 सिनेमा नव्या वर्षात म्हणजेच 2025 मध्ये नेटफ्लिक्सवर काही भाषांमध्ये रिलीज होणार आहे. दरम्यान, निर्मात्यांकडून सिनेमा ओटीटीवर रिलीज करण्यासंदर्भात अधिकृत घोषणा केलेली नाही.

500 कोटींचे बजेट

दिग्दर्शक सुकुमार यांनी पुष्पा 2 सिनेमा 500 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये तयार केला आहे. सिनेमातील सस्पेंस, अ‍ॅक्शन सीनने प्रेक्षकांच्या मनावर छाप पाडली आहे. सिनेमात अल्लू अर्जुन, रश्मिका मंदानासह फहद फासिल, सुनील, राव रमेश आणि जगपति बाबू मुख्य भूमिकेत आहेत. सिनेमाने रिलीजच्या अवघ्या दोन ते तीन दिवसात बजेटची रक्कम वसूल केली होती. Sacnilk.com नुसार सिनेमाने 12 दिवसात 929.85 कोटी रुपयांची कमाई केली आहे. याशिवाय जगभरात सिनेमा धमाका करत असून आतापर्यंत 1414 कोटी रुपयांचे कलेक्शन केले आहे.

आणखी वाचा : 

अल्लू अर्जुन नव्हे तर हा स्टार बनणार होता 'पुष्पा'!

बॉलीवुड vs साउथ: 2024 मध्ये कोणी गाजवले बॉक्स ऑफिस?

PREV

Recommended Stories

कार्तिक आर्यनने या व्यक्तीच्या लग्नातील फोटो शेअर करत लिहिली भावनिक पोस्ट, वाचून डोळ्यातून येईल पाणी
7.45 लाख कोटींचा करार, Netflix ने हॉलीवूडच्या Warner Bros चे साम्राज्यच घेतले ताब्यात..!