Published : Jun 26, 2025, 07:35 PM ISTUpdated : Jun 26, 2025, 07:46 PM IST
प्राप्ती रेडकर ही 'सावली' मालिकेतून घराघरात पोहोचली. केवळ उत्तम अभिनेत्रीच नाही तर उत्तम डान्सर आणि ब्लॅक बेल्ट कराटे मास्टर देखील आहे. वयाच्या २१ व्या वर्षीच तिने अनेक क्षेत्रात आपली छाप पाडली आहे.
‘किती सांगायचंय मला’, ‘तू माझा सांगाती’, ‘मेरे साई’ आणि ‘काव्यांजली’ यांसारख्या मालिकांमधूनही तिने आपली छाप सोडली आहे.
59
वय फक्त २१!
प्राप्तीचा जन्म ४ एप्रिल रोजी झाला. यंदाच्या वाढदिवसाला तिने “21 already?” असं कॅप्शन देत वय उघड केलं आणि चाहत्यांना थक्क केलं!
69
ट्रॅडिशनल ते वेस्टर्न, सगळ्यांतच खुलून दिसते
प्राप्तीचे इंस्टाग्रामवरील फोटोज पाहिले तर कधी साडीत पारंपरिक, तर कधी वेस्टर्न लुकमध्ये अगदी आत्मविश्वासानं झळकताना दिसते.
79
सोशल मीडियावरही स्टार
इंस्टाग्रामवर तिचे ९३ हजारहून अधिक फॉलोअर्स आहेत. तिच्या प्रत्येक पोस्टवर चाहत्यांचा लाईक्सचा आणि कमेंट्सचा पाऊस असतो.
89
मल्टी टॅलेंटेड स्टार
अभिनेत्री, डान्सर, किकबॉक्सर अशा विविध ओळखी तिच्या व्यक्तिमत्त्वात मिसळलेल्या आहेत. तिचं टॅलेंट हे केवळ ऑन-स्क्रीनपुरतं मर्यादित नाही.
99
प्राप्ती रेडकर एक प्रेरणादायी तरुणी
प्राप्ती रेडकर ही केवळ नायिका नाही, तर ती एक प्रेरणादायी तरुणी आहे. जी स्वप्न पाहते आणि त्यासाठी मेहनतही घेत असते. वयाच्या केवळ २१ व्या वर्षी असा ठसा उमटवणं ही मोठी गोष्ट आहे!