Oscars 2024: 96 व्या ऑस्कर पुरस्कारासाठी या सिनेमांना मिळालेय नामांकन, पाहा यादी

Entertainment : वर्ष 2024 च्या ऑस्कर पुरस्कारासाठी नामांकन मिळालेल्या सिनेमांची यादी जाहीर करण्यात आली आहे. यासाठी 10 श्रेणींमध्ये नामांकन मिळालेल्या सिनेमांमध्ये हॉलिवूडमधील ‘बार्बी’ आणि ‘ओपेनहाइमर’ सारख्या सिनेमांना स्थान मिळाले आहे.

Chanda Mandavkar | Published : Dec 23, 2023 5:02 AM IST / Updated: Dec 23 2023, 10:46 AM IST

Oscars 2024 : अकादमी ऑफ मोशन पिक्चर आर्ट अ‍ॅण्ड सायन्सेसने (Academy of Motion Picture Arts and Sciences) वर्ष 2024च्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यासाठी 10 श्रेणीसाठी नामांकन मिळालेल्या सिनेमांच्या नावांची घोषणा केली आहे. यामध्ये हॉलिवूडमधील 'बार्बी' (Barbie) सिनेमाला पाच श्रेणीत नामांकन मिळाले आहे. 

याशिवाय हॉलिवूडच्या 'ओपेनहायमर' (Oppenheimer) सिनेमानेही सर्व 10 श्रेणींमध्ये विशेष स्थान मिळवले आहे. या सिनेमाला तीन श्रेणीत नामांकन मिळाले आहे. वर्ष 2024 मध्ये होणाऱ्या 96व्या अकादमी ऑस्कर पुरस्कार सोहळ्यासाठी एकही भारतीय सिनेमाला कोणत्याही श्रेणीत नामांकन मिळालेले नाही. 

'बार्बी' सिनेमा पाच वेळा झालायं शॉर्टलिस्ट

21 जुलै 2023 रोजी प्रदर्शित झालेला हॉलिवूडमधील सिनेमा 'बार्बी' ला सर्वोत्कृष्ट संगीत (मूळ गाणे) श्रेणीत तीन एण्ट्री मिळाल्या आहेत. यामध्ये दुआ लिपा (Dua Lipa) हिने गायलेले गाणे 'डान्स द नाइट', बिली एलिशने (Billie Eilish) गायलेले गाणे 'व्हॉट वॉज आय मेड फॉर' आणि रयान गोसलिंगने (Ryan Gosling) गायलेले 'आय एम जस्ट केन' या गाण्याचा समावेश आहे.

तसेच सर्वोत्कृष्ट संगीत (मूळ स्कोअर), उत्तम आवाज यासाठी देखील ‘बार्बी’ सिनेमाला नामांकन  मिळाले आहे. या सिनेमाचे दिग्दर्शन ग्रेटा गेरविग (Greta Gerwig) हिने गेले आहे. यामध्ये मार्गोट रॉबी, रियान गॉसलिंगसारखी स्टार कास्ट आहे.

ओपेनहाइमर तीन श्रेणीत शॉर्टलिस्ट

दिग्दर्शक ख्रिस्तोफर नोलन (Christopher Nolan) यांचा सिनेमा 'ओपेनहाइमर' ला तीन श्रेणीत नामांकन मिळाले आहे. सिलियन मर्फी स्टारर असणाऱ्या या सिनेमाला सर्वोत्कृष्ट संगीत (मूळ स्कोअर), सर्वोत्तम मेकअप आणि केशरचनाच्या कॅटेगरीत शॉर्टलिस्ट करण्यात आले आहे.

नामांकन मिळालेले सिनेमे

2024 Oscars Music (Original Score) Shortlist

2024 Oscars Music (Original Song) Shortlist

2024 Oscars Documentary Feature Film Shortlist

2024 Oscars Documentary Short Film Shortlist

2024 Oscars Makeup and Hairstyling Shortlist

2024 Oscars Animated Short Film Shortlist

2024 Oscars Live Action Short Film Shortlist

2024 Oscars Sound Shortlist

2024 Oscars Visual Effects Shortlist

आणखी वाचा: 

Salaar Twitter Review: प्रभासच्या 'सालार' सिनेमाचा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ, सोशल मीडियावर युजर्सने दिल्या अशा प्रतिक्रिया

Year Ender 2023 : यंदाच्या वर्षातील फ्लॉप बॉलिवूड सिनेमे

OTT प्लॅटफॉर्मवर भारतातील सर्वाधिक महागडी वेब सीरिज माहितेय का?

Share this article