Munjya Box Office Collection Day 3 : 'मुंज्या' सिनेमाची प्रेक्षकांवर छाप, 30 कोटींच्या कलेक्शनसाठी एवढे रुपये कमी

Munjya Box Office Collection Day 3 : शर्वरी वाघचा नुकताच प्रदर्शित झालेला सिनेमा 'मुंज्या'ने बॉक्स ऑफिसवर कमाल केली आहे. सिनेमाने दमदार सुरुवातीनंतर विकेंडला धमाकेदार कमाई केलीय.

Chanda Mandavkar | Published : Jun 10, 2024 2:10 AM IST / Updated: Jun 10 2024, 08:21 AM IST

Munjya Box Office Collection Day 3 :  शर्वरी वाघ (Sharvari Wagh) आणि अभय वर्मा (Abhay Varma) यांचा हॉरर कॉमेडी सिनेमा 'मुंज्या' नुकताच सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित झाला. या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर धमाल केली आहे. सिनेमाची सुरुवात उत्तम होती. पण विकेंड्ला धमाकेदार कमाई केली आहे. जाणून घ्या मुंज्या सिनेमाची आतापर्यंतची कमाई किती झालीय याबद्दल सविस्तर...

मुंज्या सिनेमाची तिसऱ्या दिवशीची कमाई
आदित्य सरपोतदार यांनी दिग्दर्शित केलेला मुंज्या सिनेमा मॅडॉक सुपरनॅच्युरल युनिव्हर्सचा स्री, रुही आणि भेडिया सिनेमानंतरचा चौथा सिनेमा आहे. सिनेमाची कथा भारतीय लोककथांवर आधारित आहे. मुंज्या सिनेमात मोना सिंह, सुहास जोशी आणि सत्यराज मुख्य भूमिकेत आहेत. खास गोष्ट अशी की, सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर प्रेक्षकांच्या पसंतीस पडला. अशातच आता विकेडला देखील सिनेमाने धमाकेदार कमाई केली आहे.

मुंज्या सिनेमच्या कमाईबद्दल बोलायचे झाल्यास सिनेमाने प्रदर्शित होण्याआधी 4 कोटी रुपयांची कमाई केली होती. दुसऱ्या दिवशीचे कलेक्शन 81.45 टक्क्यांनी वाढत 7.25 कोटी कमावे. अशातच तिसऱ्या दिवशीच्या कमाईचे सुरुवातीचे आकडे समोर आले आहेत. सॅकनिल्कच्या अर्ली ट्रेण्डनुसार मुंज्या सिनेमाने तिसऱ्या दिवशी 7.75 कोटी रुपयांची कमाई केली आहे. यामुळे सिनेमाचे तिसऱ्या दिवशीचे कलेक्शन 19.00 कोटी रुपये झाले आहे.

सिनेमाचे बजेट
मुंज्या सिनेमाचे बजेट 30 कोटी रुपये आहे. सिनेमाने तिसऱ्या दिवशी दमदार कमाई केली. पण सिनेमाचे बजेट कमाईतून पूर्ण करणे थोडक्यासाठी राहिले आहे. खरंतर, सिनेमाला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे.

सिनेमाचे 50 टक्के बजेट VFX वर खर्च
मुंज्या सिनेमात स्पेशल इफेक्टसाठी ब्रिटिश कंपनी DNEG सोबत कोलॅब्रेशन करण्यात आले आहे. या कंपनीने 'ड्यून', 'जस्टिस लीग' आणि 'अ‍ॅक्वामॅन' सारख्या सिनेमांसाठी स्पेशल इफेक्ट्स तयार केले होते. न्यूज एजेंसी पीटीआयसोबत संवाद साधताना दिग्दर्शक आदित्य सरपोतदार यांनी म्हटले की, "आमच्या सिनेमाचे पंन्नास टक्के बजेट व्हीएफएक्सवर खर्च झाले आहेत. खरंतर ही एक मोठी रक्कम आहे. यावरुन कळते की, सिनेमासाठी व्हीएफएक्स किती महत्त्वाचे आहे. आम्ही सीजीआय आणि व्हीएफएक्सच्या मदतीने क्रिएचर तयार केले आहे. यावर खूप रिसर्च देखील करण्यात आला."

आणखी वाचा : 

विक्रम भट्टच नव्हे या व्यक्तीसोबत होते Ameesha Patel चे रिलेशनशिप

Shilpa Shetty सारख्या सडपातळ कंबरेसाठी केवळ ही 1 ट्रिक येईल कामी

Share this article