Miss India Worldwide 2024 ची विजेती ध्रुवी पटेल कोण? वाचा सविस्तर

Published : Sep 20, 2024, 11:28 AM IST
Dhruvi Patel

सार

यंदाच्या वर्षातील मिस इंडिया वर्ल्डवाइड 2024 च्या विजेतीची घोषणा करण्यात आली आहे. अमेरिकेतन कंप्युटर इन्फॉर्मेशन सिस्टिमचे शिक्षण घेतलेल्या ध्रुवी पटेलने मिस इंडिया वर्ल्डवाइडचा पुरस्कार जिंकला आहे.

Miss India Worldwide 2024 : ध्रुवी पटेलने यंदाच्या वर्षातील मिस इंडिया वर्ल्डवाइड 2024 चा पुरस्कार आपल्या नावावर केला आहे. मिस इंडिया वर्ल्डवाइड स्पर्धेचे भारताबाहेर आयोजन केले जाते. ध्रुवीने अमेरिकेतून कंप्युटर इन्फॉर्मेशम सिस्टिमचे शिक्षण घेत आहे. या स्पर्धेचे आयोजन न्यूयॉर्कमधील इंडियन फेस्टिव्हल कमेटीने केले होते. ध्रुवीने मिस इंडिया वर्ल्डवाइडच्या अंतिम फेरीत तिला बॉलिवूडमधील अभिनेत्री आणि UNICEF ची अ‍ॅम्बेसेडर होण्याची इच्छा व्यक्त केली होती.

पुरस्कार जिंकल्यानंतर ध्रुवीने व्यक्त केला आनंद
न्यू जर्सीमध्ये मिस इंडिया वर्ल्डवाइडचा मुकुट मस्तकावर घातल्यानंतर ध्रुवीने आनंद व्यक्त केला. यावेळी ध्रुवीने म्हटले की, मिस इंडिया वर्ल्डवाइड जिंकणे फार मोठा सन्मान आहे. याआधी ध्रुवीने मिस इंडिया न्यू इंग्लंड 2023 चा पुरस्कारही जिंकला होता. ध्रुवी गीस्वॉल्ड कनेक्टिकट येथे राहणारी असून अमेरिकेतील क्विनिपियाक युनिव्हर्सिटीतून शिक्षण घेत आहे.

बालपणापासून ब्युटी पेजेंटची आवड
ध्रुवीला वयाच्या 8 व्या वर्षापासून ब्युटी पेजेंटची खूप आवड होती. ध्रुवीने म्हटले की, बालपणापासून मला ग्लॅमरचे जग आवडत होते. पण शाळेत असल्याने या फिल्डमध्ये काही करता आले नाही. आता आवड आणि शिक्षणाचा समतोल साधत सर्वकाही केले आहे. ध्रुवी चॅरिटीचे देखील काम करते.

आई-वडिलांनी नेहमीच दिलाय पाठिंबा
ब्युटी पेजेंटसोबत ध्रुवीला पेंटिंग्स, मित्रपरिवारासोबत वेळ घालवण्याची फार आवड आहे. परिवाराबद्दल बोलताना ध्रुवीने म्हटले की, माझ्यासाठी माझे वडील प्रेरणास्थान आहेत. त्यांनी नेहमीच माझ्यावर विश्वास ठेवला आणि पाठिंबा दिला. माझ्या आईने देखील माझी साथ दिली. त्यांच्यामुळेच मला स्टेजवर आत्मविश्वास वाढला जातो.

कोणकोण होते रनर-अप
मिस इंडिया वर्ल्डवाइडमध्ये साउथ अफ्रिकेतील सूरीनामातील लिसा अब्देलहक फर्स्ट रनर अप राहिली. याशिवाय नेदरलँडमधील मालविका शर्मा दुसरी रनर अप घोषित करण्यात आले होते. ही स्पर्धा 10 सप्टेंबर ते 16 सप्टेंबरपर्यंत आयोजित केली होती.

आणखी वाचा :

बॉलीवूड स्टार्सना अनंत-राधिकाच्या लग्नात पैसे मिळाले का?

हिमेश रेशमियाच्या वडिलांचे वयाच्या 78 व्या वर्षी निधन

PREV

Recommended Stories

कार्तिक आर्यनने या व्यक्तीच्या लग्नातील फोटो शेअर करत लिहिली भावनिक पोस्ट, वाचून डोळ्यातून येईल पाणी
7.45 लाख कोटींचा करार, Netflix ने हॉलीवूडच्या Warner Bros चे साम्राज्यच घेतले ताब्यात..!