त्रिचूर ब्रदर्स यांचे 'मेरा राम मेरा प्राण' संगीताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून कौतुक (Watch Video)

Published : Apr 19, 2024, 09:43 AM ISTUpdated : Apr 19, 2024, 10:04 AM IST
Mere Ram Mere Pran Song

सार

Trichur Brothers New Song : त्रिचूर ब्रदर्स यांचे मेरा राम मेरा प्राण नावाचे एक गाणे नुकतेच प्रदर्शित झाले आहे. या गाण्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्विट करत कौतुक केले आहे.

Trichur Brothers New Song : त्रिचूर ब्रदर्स यांचा संगीताच्या कार्यक्रमाचा अनुभव नेहमीच आनंददायी असतो. यांच्याद्वारे सुंदर कर्नाटकातील संगीत उत्तमपणे सादर केले जाते. अशातच त्रिचूर ब्रदर्स यांचे नुकतेच एक गाणे प्रदर्शित झाले आहे. 'मेरा राम मेरा प्राण' (Mera Ram Mera Pran) नावाने त्रिचूर ब्रदर्स यांनी गाणे प्रदर्शित केले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून कौतुक
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडियावरील प्लॅटफॉर्म 'X' वर त्रिचूर ब्रदर्श यांच्या नव्या गाण्याचे कौतुक केले आहे. पंतप्रधानांनी ट्विट करत म्हटले की, हा एक सर्वोत्कृष्ट प्रयत्न आहे. प्रभू श्रीराम चिरंतन धार्मिकता आणि शौर्याला मूर्त रूप देतात. याशिवाय पंतप्रधानांनी म्हटलेय की, प्रभू श्रीरामांची महानता काळाच्या पलीकडे आहे. ते आपल्याला दैवी प्रकाश आणि बुद्धीने आपल्याला मार्गदर्शन करतात.

मेरे राम मेरा प्राण गाण्यात नक्की काय आहे?
त्रिचूर ब्रदर्स यांनी ‘मेरे राम मेरा प्राण’ गाणे हिंदी भाषेत प्रदर्शित करण्यात आले आहे. या गाण्याच्या सुरूवातीला राम नामाचा जप केला जातोय. यानंतर राम भारताचा आधार, विचार, चेतना असे म्हटले जातेय. यामुळे राम नामाचा आपण जप करावा अशा आशयाचे गाण्याचे बोल आहेत. त्रिचूर ब्रदर्स यांचे मेरे राम मेरा प्राण प्रत्येक रामभक्ताला मंत्रमुग्ध करणारे आहे.

त्रिचूर ब्रदर्स यांच्याबद्दल थोडक्यात
संगीत क्षेत्रात त्रिचूर ब्रदर्स यांना त्यांचे वडील मृदंगम विदवान त्रिचूर यांनी आणले. याबद्दल त्रिचूर ब्रदर्स यांनी सांगताना म्हटले होते की, आमच्याकडे खुप संगीत होते. आम्ही ज्या प्रकारचे संगीत ऐकायचो त्यावर कोणतीही बंधन नव्हते. आम्ही सर्व शैलीतील संगीत ऐकून मोठे झालो आहेत. खरंतर, सर्वाधिक लोकप्रिय संगीत भक्तीचे होते. जे केजे येसुदास आणि पी जयचंद्रयन यांनी लोकप्रिय करण्याचे काम केले. केरळात संगीताबद्दल बोलायचे झाल्यास सिनेमातील असो किंवा भक्ती संगीत, त्यामध्ये कर्नाटकाची झलक दिसते.

आणखी वाचा : 

अयोध्याच्या राम मंदिरातील 'सूर्य टिळक' कार्यक्रम पाहिलात का? त्यामागील विज्ञान घ्या समजून

सूर्य तिलकच्या आधी राम लल्लाच्या चेहऱ्यावर कोणता लावला लेप?

PREV

Recommended Stories

Dhurandhar X Review : अ‍ॅक्शन पॅक्ड, मास एंटरटेनर.. 'धुरंधर' पाहून प्रेक्षक काय म्हणाले?
सुंदर कविता आणि रचना अपूर्ण राहिल्या, हेमा मालिनी यांनी धर्मेंद्र यांच्या निधनाबद्दल केला पश्चाताप