Marathi Actress Gayatri Joshi : बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानच्या संपत्तीबद्दल तुम्ही ऐकले असेलच. पण शाहरुखपेक्षा त्याच्या हिरोईनची संपत्ती साडेतीन पटीने जास्त आहे. चला जाणून घेऊया कोण आहे ही अभिनेत्री आणि तिने कोणता सिनेमा केला होता.
सिनेसृष्टीत नवीन चेहऱ्यांची कमतरता नाही. प्रत्येक सिनेमात नवीन चेहरा दिसतो. आता अशाच एका अभिनेत्रीबद्दल बोलूया, जिने फक्त एकच सिनेमा केला पण आज ती कोट्यवधींची मालकीण आहे. फेमिना मीस इंडियाच्या शेवटच्या पाच स्पर्धेकांपैकी ती एक होती. आशुतोष गोवारीकर यांच्या स्वदेश चित्रपटात तिने काम केले. त्यानंतर ती दिसली नाही.
25
फक्त एकच सिनेमा केलेली अभिनेत्री
ती दुसरी कोणी नसून अभिनेत्री गायत्री जोशी आहे. तिने बी-टाऊनमध्ये फक्त एकच सिनेमा केला आहे. 2005 मध्ये तिने व्यावसायिक विकास ओबेरॉय यांच्याशी लग्न केले. त्यानंतर तिने सिनेमाला रामराम ठोकला.
35
गायत्री जोशीबद्दल काही खास गोष्टी
गायत्रीने 2004 मध्ये 'स्वदेस' सिनेमातून पदार्पण केले. यानंतर ती इंडस्ट्रीपासून दूर झाली आणि विकास ओबेरॉय यांच्याशी लग्न करून स्थायिक झाली. त्यांना दोन मुले आहेत. ती मुळची मुंबईची आहे.
हुरुन रिच लिस्ट 2025 नुसार, विकास ओबेरॉय यांची संपत्ती 42,960 कोटी रुपये आहे. तर शाहरुख खानची संपत्ती 12,490 कोटी रुपये आहे. विकास या यादीत 58 व्या स्थानावर आहेत. म्हणजेच तिचा पती शाहरुख पेक्षा जास्त श्रीमंत आहे.
55
ओबेरॉय रियल्टीचे चेअरमन आणि एमडी
विकास ओबेरॉय हे ओबेरॉय रियल्टीचे चेअरमन आणि एमडी आहेत. मुंबईतील अनेक मोठे रिअल इस्टेट प्रकल्प त्यांच्या कंपनीने केले आहेत. आलिशान वेस्टिन हॉटेलही त्यांच्याच नावावर आहे. ती सध्या बॉलिवूडच्या झगमगाटापासून दूर असून कौटुंबीक जबाबदारी पार पाडत आहे.