Kangana Ranaut : मंडित धाकड गिर्ल्सचा जळवा जवळपास 46 हजार मतांनी पुढे

बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत हिने भाजपकडू हिमाचल प्रदेशातील मंडी लोकसभा मतदार संघातून पहिल्यांदाच निवडणूक लढवली आहे. तिने विद्यमान खासदारांच्या पुत्राला चांगल्याच मताधिक्याने मागे टाकले आहे. जाणून घ्या सविस्तर…

Ankita Kothare | Published : Jun 4, 2024 6:20 AM IST

बॉलिवूडची धाकड गर्ल अर्थात कंगना रनौत हिने भाजपकडून हिमाचल प्रदेशातील मंडी लोकसभा मतदार संघातून पहिल्यांदाच निवडणूक लढवली आहे. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत हिमाचल प्रदेशातील मंडीमध्ये काय होणार याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे. मंडीमध्ये एकीकडे बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत आहे, तर दुसरीकडे तिच्या विरोधात माजी मुख्यमंत्री वीरभद्र सिंह आणि सध्याच्या खासदार प्रतिभा सिंह यांचा मुलगा विक्रमादित्य सिंह निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहे.या ठिकाणचे मतदान 1 जून रोजी पार पडले.मात्र आता याठिकाणी चुरशीची लढत पाहायला मिळत आहे.

हिमाचल प्रदेशातील मंडीमध्ये नेहमीच काँग्रेस आणि भाजपामध्ये चुरशीची लढत पाहायला मिळाली.मात्र आता या दोन्ही पक्षांतील दोन तरुण चेहरे यंदा निवडणुकीच्या मैदानात उतरले असल्याने कोण बाजी मारणार याकडे लक्ष आहे,. सध्या या मतदार संघातील चित्र काहीसे बदलेले दिसत असून अभिनेत्रीने आघाडी कायम राखली आहे. सध्या कंगना ४६ हजार मताधिक्याने पुढे चालत आहे. तर तिचे एकूण मतदान ३ लाख ५६ हजार आहे.

याविषयीचे इतर अपडेट आम्ही तुम्हाला लवकरात लवकर देत राहू

 

Share this article