बिग बॉस फेम सुरज चव्हाणच्या लग्नाच्या चर्चांना उधाण आले आहे. त्याची मानलेली बहीण अंकिता आणि मित्र डी पी दादा यांनी त्याच्या होणाऱ्या बायकोबद्दल संकेत दिले असून, तिचे नाव 'छकुली' असल्याचे म्हटले आहे.
सूरज चव्हाणच्या होणाऱ्या बायकोचा फोटो पाहून व्हाल थक्क, धनंजय पवारने नाव दिलं सांगून
सुरज चव्हाणला बिग बॉसमुळे संपूर्ण महाराष्ट्रात ओळख मिळाली. आता त्याच्या लग्नाची चर्चा सोशल मीडियावर सुरु झाली आहे. बिग बॉसच्या पाचव्या पर्वातील अभिनेत्री आणि सुरजची मानलेली बहीण अंकिताने सुरजच्या बायकोबद्दल पोस्ट टाकून त्याच्या लग्नाच्या चर्चा खऱ्या असल्याचं सांगितलं होतं.
26
डीपी दादा काय म्हणाला?
डीपीने एका पोस्टवर कमेंट करून त्याचे सूत कोणासोबत जुळले आहेत याबद्दलची माहिती दिली आहे. सुरजने इंस्टाग्रामवर त्याच्या चाहत्यांची गंमत करणारा एक व्हिडीओ शेअर केला आहे.
36
सुरजने व्हिडिओत काय म्हटलं?
सुरजने व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये बोलताना म्हटलं आहे की, हा व्हिडिओ केवळ 'टाइमपास' आहे, त्याची होणारी खरी पत्नी कोण आहे याबद्दल तो लवकरच खुलासा करेल. या व्हिडिओवर डिपी दादाने कमेंट केली आहे.
डीपी दादाने पोस्टवर कमेंट करून धमाल उडवून दिली आहे. त्याने कमेंट करताना म्हटलं आहे की, धनंजयने सूरजच्या व्हिडिओवर कमेंट करत म्हटले की, 'मला माहित हाय मी बघितलोय, थांब आता तुझा फोटो मीच व्हायरल करणार. थांब तुझ्या छकुलीचा फोटो टाकतो.
56
सुरजच्या होणाऱ्या बायकोचे नाव काय आहे?
सुरजच्या होणाऱ्या बायकोचे नाव छकुली आहे. त्यानेच म्हणजे सुरजने आता छकुलीसोबतच फोटो पोस्ट शेअर करावा असं चाहत्यांनी म्हटलं आहे. चाहत्यांनी सूरजला खूप आग्रह केल्याचं दिसून आलं आहे.
66
या व्हिडिओवर अभिजित सावंतने कमेंट केली
या व्हिडिओवर अभिजित सावंतने कमेंट केली आहे. अभिजीतने 'तुला खूप खूप शुभेच्छा सूरज', असे म्हणत हार्ट इमोजीची कमेंट केली आहे. सुरुवातीला सुरजचे लग्न ठरलय अशी अफवा उठली होती पण आता सगळ्या सेलिब्रेटींच्या कमेंट पाहून त्यावर शिक्कामोर्तब केलं आहे.